नंदुरबार - ( प्रतिनिधी वैभव करवंदकर ) - -
कोव्हिड १९ विषाणू चे कारण दाखवत इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पाहिले आणि दुसरीचे प्रवेश देणार नाही असा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे त्यामुळे येणाऱ्या शैक्षणिक वर्षात आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षणाच्या बट्याबोल होणार आहे.
कोरोनाचे कारण पुढे करत येत्या शैक्षणिक वर्षात इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पाहिले आणि दुसरीचे प्रवेश न करण्याबाबत आदिवासी विकास विभागाने निर्णय घेतला आहे. हा निर्णय मागे घेण्यात यावी अशी मागणी करत निर्णय मागे न घेतल्यास आदिवासी विद्यार्थ्यांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशारा खासदार डॉ.हिना गावित यांनी दिला आहे. नंदुरबार येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यंदाच्या शैक्षणिक वर्षात नामांकित इंग्रजी शाळेत इयत्ता पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही,असा निर्णय आदिवासी विकास विभागाने 22 मे रोजी घेतला आहे. यावर खा. हिना गावित यांनी हरकत घेतली असून हा निर्णय आदिवासी विद्यार्थ्यांचा नुकसान करणारा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. येत्या 8 दिवसात हा निर्णय मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा खा. हिना गावित यांनी दिला आहे. यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावित हे देखील उपस्थित होते.