कोल्हापूर प्रतिनिधी
एकीकडे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त असताना सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. आधी संजय राऊत मग नारायण राणे नंतर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार अशा दिग्गजांनी आत्ताच राज्यपाल भवनमध्ये का धाव घेतली ? तर दुसरीकडे फडणवीस यांचा राज्यपाल संपर्क तर नियमित बनला आहे.
यामध्ये कॉंग्रेस कोठेही दिसत नसले तरी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारच्या कोरोना कार्यपद्धतीबाबत व्यक्त केलेली नाराजी बरंच काही सांगून जाते. तसेच विधीमंडळ अध्यक्ष नाना पटोले यांची या सर्व पार्श्वभूमीवर राहूल गांधी यांची भेट घेणे.
एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना मुंबईत उपचार मिळत नाहीत. आरोग्य व्यवस्था दयनीय झाली आहे. अशा परिस्थितीत हा राज्यपाल भवनमध्ये राजकीय नेत्यांचा पाठशिवणीचा खेळ सुरु आहे. सामान्य माणसाला मात्र हे कोडं जरी न उलगडणारे असले तरी लवकरच काही ना काही घडणार आहे याची चर्चा मात्र राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. आगे आगे देखो होता है क्या .....