कोल्हापूर - शहराच्या प्राचीन इतिहासाची विलक्षण माहिती जगभरातील सर्व कोल्हापूरप्रेमींना व्हावी, यासाठी २३ मे या दिवशी सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत ‘फेसबूक’द्वारे ‘महामातृक क्षेत्र करवीरनगरी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त हे औचित्य साधण्यात आले आहे. कोल्हापूरच्या अनेक नावांपैकी ‘महामातृक क्षेत्र’ हे एक वैशिष्ट्यपूर्ण नाव आहे. ‘करवीरमाहात्म्य’ ग्रंथात या नावाचा उल्लेख असून आई अंबाबाईच्या मूर्तीवैशिष्ट्यांवरून या नावाची सार्थकता लक्षात येते. या वैशिष्ट्यांविषयी व्याख्यानातून सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
जगप्रसिद्ध मूर्तीशास्त्र तज्ञ आणि कोल्हापूरचेे सूक्ष्म अभ्यासक श्री. उमाकांतजी राणिंगा हे व्याख्यान देतील. कार्यक्रमाचे निमंत्रक विश्व हिंदू परिषद, कोल्हापूर हे असून संयोजक राष्ट्रऐक्य व्यासपीठ, कोल्हापूर हेे आहेत. ‘. https:www.facebook.com/Vishwa-Hindu-Parishad-Kolhapur1737253299753223’ या फेसबूक लिंकला जोडून जगभरातील कोल्हापूरप्रेमींनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, अशी विनंती कार्यक्रमाचे उद्घाटक विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री श्री. रणजितसिंह घाटगे यांनी एका परिपत्रकाद्वारे केली आहे.