अॅड . ए . टी . कळसे
लातुर 19 पैकी 10 पॉझिटीव्ह 3 निगेटीव्ह व 5 (Inconclusive) व १ Reject
उस्मानाबाद 5 पैकी ३ पॉझिटीव्ह २ (Inconclusive)
बीड 7 पैकी 2 पॉझिटीव्ह 5 (Inconclusive)
दिनांक 25.05.2020 रोजीचे एकुण 31 अहवाल प्रलंबित होते त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 8 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी २ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यापैकी एक व्यक्ती लातुर तालुक्यातील मसला येथील असुन दुसरी व्यक्ती दिनांक 23.05.2020 रोजी हुडको कॉलनी येथे आढळुन आलेल्या पॉझिटीव्ह व्यक्तींच्या कुटूंबातील सदस्य आहे. ०३ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन २ व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले आहेत व एका व्यक्तींचा स्वॅब परिपुर्ण न आल्यामुळे Reject करण्यात आला आहे.
उदगीर येथील 5 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी २ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असुन 3 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले आहेत. निलंगा येथील ६ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी सर्वच ६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
असे एकुण लातुर जिल्हयातील १९ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असुन ०३ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत, ५ व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले असुन एका व्यक्तींचा अहवाल Reject करण्यात आला आहे.
उस्मानाबाद येथील 5 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असुन ०२ व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले आहेत. बीड येथील 7 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी ०२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असुन ०५ व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.