Tuesday 19 May 2020

mh9 NEWS

नंदगाव व परिसरात कडक लॉकडाऊनचा निर्णय

नंदगाव प्रतिनिधी  :नंदगाव , ( ता करवीर ) व परिसरातील ग्रामपंचायतीच्यावतीने व गावातील कोराना दक्षता समिती आरोग्य विभाग तसेच पोलीस प्रशासन इस्पूर्ली यांच्या वतीने कडक लॉकडाऊन चा निर्णय घेतला आहे. गावापासून अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर हणबर वाडी ( ता - करवीर ) येथिल १३ वर्षाच्या शाळकरी मुलाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याने विशेष दक्षता घेण्यात येत आहे  . तो कोरोना पॉझिटिव्ह मुलगा उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मावशीकडे गोवा येथे गेला होता . कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने त्याला वडीलांनी गावाकडे आणले होते . परिसरातील ग्रामपंचायतीनी  खबरदारीचा उपाय म्हणून निमशासकिय , सहकारी , खाजगी , नोकरदार तसेच सर्व स्तरावर काम करणारे मजूर व ग्रामस्थ यांनी कोणत्याही कारणास्तव गावाबाहेर जाण्याचे नाही व गावाबाहेरील अन्य व्यक्तींना गावात प्रवेश करण्याचे नाही , आढळल्यास त्याचे वरती संचारबंदीचे उल्लघंन केले बद्दल कायदेशीर कडक कारवाई केली जाणार आहे तसेच . कामानिमीत्य परगावी गेलेली व्यक्ती गावात परत आल्यास १४ दिवस संस्थात्मक विलगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . तसेच विना मास्क गावात फिरणारी कोणतीही व्यक्ती आढळून आल्यास शंभर रूपये दंड ग्रामपंचायतीच्यांकडून  आकारण्यात येते आहे .

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :