डी. वाय. पी. ग्रुप चे कार्यकारी संचालक डॉ. ऐ. के. गुप्ता आणि पालक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने "प्रवेश परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या पुढील आव्हाने" या विषयावर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांसाठी मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. या मार्गदर्शनामध्ये त्यांनी MHT-CET व NEET या प्रवेश प्रक्रियांसाठी लागू असणाऱ्या ऑनलाइन प्रोसेस बद्दल सविस्तर माहिती दिली. कोविड-१९ मुळे अध्यापनात झालेले बदल व त्याचा पुढील प्रवेश प्रक्रियेवर झालेला परिणाम या विषयावर प्रामुख्याने जोर दिला. डॉ. ऐ. के. गुप्ता म्हणाले कि, Neet परीक्षेमध्ये कमी मार्क्स पडले तर शैक्षणिक वर्षात मिळवलेल्या गुणांचा पुढील प्रवेशामध्ये काहीही उपयोग होणार नाही. विद्यार्थ्यांनी Neet परीक्षेसाठी अभ्यासाचे वेळापत्रक बनवून दर आठवड्याला विषयानुसार सराव परीक्षा दिली पाहिजे. या सराव परीक्षेतील गुणांचे पृथक्करण करून आपल्या अभ्यासामध्ये वेळोवेळी बदल केले पाहिजेत.
पालकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले कि प्रथम तुम्ही तुमच्या पाल्याशी संवाद साधून त्याचे मत विचारून घ्या. त्यांना त्यांचे स्वातंत्र्य, शांतता आणि आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यासाठी प्रोत्साहन द्या. दैनंदिन जीवनातून आपल्या पाल्याशी कमीत कमी ३० मिनिटे चर्चा करा. प्रवेश प्रक्रिये साठी लागणाऱ्या आवश्यक कागद पत्रांची आत्ताच पूर्तता करा.
शेवटच्या सत्रांत ते मुलाना उद्देशून म्हणाले कि गेली १४ वर्षे तुम्ही सतत अभ्यास करताय पण आताचे ४० दिवस JEE मेन्स च्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. ध्येय मोठे ठेवा, लहान ध्येय ठेवणे हा गुन्हा आहे. तुमची आत्ताची बॅच हि भाग्यवान आहे कारण कोविड-१९ मुळे तुम्हाला अभ्यासासाठी ८० ते ९० दिवस जास्तीचे मिळाले आहेत. ज्यावेळी तुमचे पदवीचे शिक्षण पूर्ण होईल त्यावेळी कोविड-१९ मुळे पुष्कळ संधी उपलब्ध असतील. कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका कारण CET/NEET/JEE या परीक्षा होणारच आहेत. शासन मार्फत या परीक्षा होण्या आधी डी. वाय. पाटील. अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पालक शिक्षक संघ याच्या मार्फत या परीक्षांच्या मॉक टेस्ट घेणारच आहे. कोविद-१९ मुळे अभियांत्रिकी मध्ये भविष्यांत येणाऱ्या संधी आणि प्रवेश प्रक्रियेची माहिती डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कसबा बावडा कोल्हापूर येथे दिली जात आहे. त्या बरोबरच विद्यार्थी व पालकांना वैयक्तिक मार्गदर्शन आणि प्रवेश घेण्यासाठी फॉर्म भरून देण्याची सोय करून दिली आहे त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा.
सदर ऑनलाइन शिबिरासाठी पालक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रचंड मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला तसेच इतर विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारच्या शिबिराचे पुन्हा आयोजन करण्यात यावे अशी मागणी देखील संस्थेकडे केली जात आहे.