पेठ वडगांव / वार्ताहर- बोगस पास देऊन प्रवाशांची फसवणूक केले प्रकरणी तिघां विरोधात वडगांव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ललित रा.दिवा ठाणे, विशाल विलास पोवार वय 25रा.दिवा ठाणे, प्रविण प्रल्हाद खेतले वय 36 रा. मुंडे ता. चिपळून अशी आरोपींची नावे असून याबाबत रविंद्र विष्णू निकम वय 32 सध्या रहाणार दिवा पूर्व ठाणे मूळ गाव अडकूर ता. चंदगड जि. कोल्हापूर यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की रविंद्र विष्णू निकम यांना लॉकडाऊनमुळे आपल्या अडकूर ता. चंदगड कडे यायचे होते यासाठी ते दिवा ठाणे येथील ललितच्या नेट कॅफे मध्ये गेले होते त्यावेळी ललित याने विलास पोवार यांची निकम यांचेशी भेट करून दिली. जिल्हाधिकारी यांचेकडील ई पास काढण्यासाठी ललित व पोवार या दोघांनी स॔गनमत करून रविंद्र निकम यांचेकडून पाच हजार रुपये घेतले तसेच प्रविण प्रल्हाद खेतले याची टेंपो ट्रॅव्हल एम एच 08एपी 1483 पंचवीस हजार रूपयेस भाडेने ठरवून दिली. त्यानुसार रविंद्र निकम हे आपली पत्नी, मुले, वडील यांना घेऊन च॔दगड कडे येण्यास निघाले. महामार्गावरील किणी टोल नाका येथे गाडी व ई पासची तपासणी केली असता सदर पास बोगस असल्याचे निदर्शनास आले .त्यामुळे निकम यांनी वरील तिघां विरोधात वडगांव पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यातील टेंपो ट्रॅव्हल ताब्यात घेण्यात आली आहे .अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रदिप काळे करत आहेत