विजय हंचनाळे .नंदगाव प्रतिनिधी :
गिरगांव ता.करवीर. येथील माजी उपसरपंच प्रल्हाद जाधव यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करत गरजूंसाठी धान्य,मास्कचे वाटप केले.जगावर कोसळलेल्या कोरोनाच्या संकटामुळे गरिबांवर आलेल्या वेळेचा विचार करता त्यांनी आपल्या वाढदिवस गावातील दहा कुटुंबांना आठवडाभर पुरेल इतके किराणा साहित्य दिले.सोबतच त्यांनी कोरोना बाबत दक्षता घेण्याचे आवाहन करत मास्कचे वाटपही केले.यावेळी सरपंच संध्याराणी पाटील,उपसरपंच योगिता चव्हाण,शिवसेना शाखा प्रमुख संभाजी पाटील,पोलीस पाटील उमेश लोहार,सामाजिक कार्यकर्ते भिकाजी नावलकर,देवेंद्र सरनाईक,सागर कोंडेकर आदी उपस्थित होते.