कोल्हापूर प्रतिनिधी -
कोरोना संकटकाळात डॉक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचारी यांच्याबरोबरच महावितरणचे कर्मचारी सुद्धा अविरत कार्यरत आहेत. संचारबंदीतही वीज पुरवठा अखंडित सुरळीत ठेवून लोकांना दिलासा देत आहेत. त्यांचा अनेक ग्राहक व नागरिकांशी संपर्क येतो याकरिता त्यांना कोरोनापासून संरक्षणासाठी काळजी घेण्याची गरज आहे.
नेमकी हीच बाब लक्षात घेऊन कोल्हापूर येथील डॉ. अर्चना विक्रांत सपाटे यांनी महावितरण कर्मचार्यांना अर्सेनिक अल्बम औषधाचे मोफत वाटप करुन मदत केली. आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असलेल्या अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी औषधांचे त्यांनी जवळपास 3700 वर कर्मचारी आणि अधिकारी यांना वाटप करण्यात आले. त्यांच्या या सामाजिक बांधिलकी बद्दल महावितरण कर्मचार्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कोरोना संकटकाळात महावितरण कर्मचार्यांना अर्सेनिक अल्बम औषधाचे वाटप केले बद्दल महावितरण कोल्हापूर परिमंडळाचे अधिक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी डॉ अर्चना सपाटे यांचे आभार व्यक्त केले व आपल्या औषधांमुळे महावितरण कर्मचार्यांचे मनोबल नक्कीच वाढेल असे सांगितले.
http://mh9kolhapurnews.blogspot.com/2020/05/blog-post_642.html?m=1 मुळव्याध अत्यंत प्रभावी औषध जाणू घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा