गांधीनगर प्रतिनिधी,
एस एम वाघमोडे
गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९५ जयंती कोरोणाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करित कोरोणा संसर्गापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना नूतन सरपंच जितेंद्र यशवंत यांचेकडून मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
देशात आणि राज्यात थैमान घातलेल्या कोरणा विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भव्यदिव्य प्रमाणात साजरा करण्यात येणारा अहिल्यादेवी होळकर जयंती सोहळा अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी सर्वच मान्यवरांनी महिला असूनही अहिल्यादेवी देवी होळकर यांनी तब्बल सत्तावीस वर्ष सर्वोत्कृष्ट राज्यकारभार करित आदर्श निर्माण केला असे नमूद केले. यावेळी सरपंच जितेंद्र यशवंत ,पंचायत समिती करवीर चे सदस्य प्रदीप झांबरे, उपसरपंच तानाजी पाटील, माजी सरपंच आप्पासाहेब धनवडे, पांडुरंग कांबळे , ग्रामपंचायत सदस्य विनोद सोनुले, जयश्री रेवडे ,गुंडा वायदंडे, जितेंद्र कांबळे ,आनंदा बनकर ,कर्याप्पा पुजारी, यशवंत खिलारी, आनंदा रेवडे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन महादेव वाघमोडे तर आभार कृष्णात रेवडे यांनी केले.
फोटो
गडमुडशिंगी ( ता. करवीर) येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मास्क व सॅनिटायझरचे चे वाटप करण्यात आले.