कुरुंदवाड प्रतिनिधी
रखडलेल्या पुरवणी पिक कर्जमाफी बाबत शिरटी येथील ग्रामस्थांच्या संयुक्त लढ्यास यश मिळाले असून शेतकऱयांच्या विविध बँकांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम रु ११ कोटीं ८१लाख कालपासून जमा होण्यात सुरुवात झाल्याने शेतकऱयांच्यात समाधान पसरले आहे याचा फायदा २८४६ शेतकऱ्यांना झाला आहे शिरोळ तालुक्यातील शेतकऱयांच्या रखडलेल्या या पुरवणी पीक कर्जमाफीबाबत शिरटि येथील बहुसंख्य शेतकऱ्यांनीसहकार आयुक्त व राज्य शासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा दिला होता तर नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शासकीय दरबारी सदरचा प्रश्न लावून धरला होता.
याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने २७ मार्च रोजी खास आदेश काढून शेतकर्यांच्या रक्कमा तातडीने सांगितले आहे
शिरोळ तालुक्यामध्ये जुलै ऑगस्ट २०१९ या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने महापूर येऊन शेतकऱ्यांचे पिकाचे मोठे नुकसान झाले होते त्यांचे पंचनामे होऊन शासकीय लेखा परीक्षण हि झाले होते त्यानुसार शासनाने शेतकऱयांच्या खात्यावर पीक कर्जमाफीची रक्कम भरण्यास सुरुवात केली होती मात्र मध्येच सहकार आयुक्तांनी एक बँकांना देऊन संयुक्त सामायिक खाती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्यास मनाई केली होती
यामुळे जवळपास १२ कोटी रुपये पडून होते याबाबत शिरटि येथील शेतकऱयांनी सहकार आयुक्त जिल्हा निबंधक तालुका निबंधक यांना निवेदन देऊन सदरची रक्कम तातडीने शेतकऱयांच्या खात्यावर जमा करावी अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन आम्हाला न्याय मागावा लागेल असा इशारा राज्य शासन व सहकार आयुक्तांना दिला होता तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रश्नी उच्च न्यायालयात विनामोबदला त्यांची बाजू मांडु अशी भुमिका वकिल धैर्यशील सुतार यांनी घेतलि होति याची दखल घेत संबंधित विभागाने पीक कर्जमाफी पुरवणी यादीतील शेतकऱ्यांच्या खात्यावर विविध बँकांतून त्यांची कर्जमाफीची रक्कम जमा केली आहे याबाबत नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी पत्र व्यवहार करून संयुक्त व सामायिक खाती असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे नितांत गरजेचे असल्याचे त्यांना सांगितले होते या दुहेरी प्रयत्नांना यश आल्याचे शेतकऱ्यांच्यातुन बोलले जातआहे
*::::उशिरा का असेना शासनाला यासंदर्भात जाग येऊन शेतकऱयांच्या खात्यावरती पैसा जमा करत आहेत ही समाधानाची बाब आहे पूरबाधित पिकाची कर्जमाफी मिळाली नसती तर शेतकऱयाला मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले असते या कामी जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे तालुका निबंधक प्रेमकुमार राठोड सहकार अधिकारी बाळकृष्ण शिंदे सर्व विकास संस्थांचे चेअरमन सचिव यांचे विशेष सहकार्य लाभले होते **::;;
सुरेश कांबळे
शेतकरी शिरटी