कसबा बावडा ता. 24
आयुष्य मंत्रालयाने अर्सेनिक अल्बम हे होमिओपॅथी औषध कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सुचवले आहे. त्यानुसार
बुधवार पेठेतील मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपत मदत नव्हे तर कर्तव्य या भावनेने डांगे गल्ली तरूण मंडळ व क्रांतिवीर राजगुरु तरूण मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने भागातील जवळपास 3000 घरांमध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढवनारया Arsenic album 30 या होमिओपॅथी औषधांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी माजी उपमहापौर श्री. दिगंबर राजाराम फराकटे , कुणाल कोठावळे, अमोल डांगे , डाॅ दिगंबर आवटे, नामदेव आवटे, गणेश पाटील , विजय बंगडे, अभिरथ गायकवाड, मुसाभाई कुलकर्णी, पप्पू चेने, आनंदा वरेकर, अजितसिंह पाटील, किरण होगाडे, नितीन खोत, सुरज पाटील, राजेंद्र गुंडप व भागातील नागरीक व कोल्हापूर महापालिका आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.