Wednesday 27 May 2020

mh9 NEWS

मुळव्याध कारण व उपचार


गुदद्वाराच्या आतल्या व बाहेरच्या भागातील फुगलेल्या व सुजलेल्या दुखणाऱ्या रक्तवाहिन्यांना मुळव्याध असे म्हणतात.

या रोगास संस्कृतमध्ये 'अर्श' असे नाव आहे. English name is piles or Hemorrhoid. Hindi name is बवासीर. यामध्ये दोन प्रकारचे रोग आहेत – विनारक्तस्राव व रक्तास्रावासहित. या रोगात गुदद्वारा सभोवताल आतमध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात त्या बाहेर येतात. त्याने तेथे सतत ठणक वेदना होते. क्वचित रक्तस्त्राव  पण होतो. काटा टोचत आहे अशी भावना होते. अधिक रक्तस्राव झाल्यास रक्त कमतरता (अनिमिया) निर्माण होते. गुदद्वाराची आकुंचन क्षमता क्रमशः नष्ट होत जाते. पुष्कळ काळ लोटल्यावर मग संग्रहणी हा रोग पण होऊ शकतो. या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनशक्तीसंबंधित आहे. आजघडीस साधारणतः ४ कोटी लोकांना हा आजार आहे आणि दरवर्षी या आजाराचे १० लाख रुग्ण नव्याने तयार होत असतात. काही काळापूर्वी मुळव्याध हा साधारण चाळीशीनंतर उद्भवणारा आजार होता. पण, आता १८ ते २५ या वयोगटातील स्त्री- पुरुषांनाही मुळव्याध होऊ लागली आहे. एकूण रुग्णांपैकी १० ते १२ टक्के रुग्ण हे १८ ते २५ वयोगटातील आहेत. हा रोग कोणालाही सहजपणे होतो म्हणुन व्यायाम करा, त्यामुळे पचन सुधारते. तसेच जंक फूड, मैदायुक्त बेकरी पदार्थ, मांसाहार, अतितिखट व मसाला घालून केेलेले पदार्थ टाळले तरी भरपूर फरक पडतो. एम पायलो नावाचे आयुर्वेदिक औषध यावर अत्यंत उपयुक्त आहे. याच्या नियमित सेवनाने मुळव्याध प्राथमिक अवस्थेत लगेच आटोक्यात येतो अर्थात पथ्य आवश्यक. 

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :