गांधीनगर प्रतिनिधी
एस एम वाघमोडे
कोरोणा महामारि च्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आलेल्या आहेत. परंतु अति पावसाच्या काळात पशुधन वाचवण्यासाठी मेंढपाळांना कराव्या लागणाऱ्या स्थलांतराचा प्रश्न गंभीर बनला असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी पालन महामंडळाच्या वतीने मेंढपाळांना स्थलांतरास परवानगी दिल्याने स्थलांतराचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी अनेक प्रतिष्ठित व्यक्ती संस्था , संघटना यासह मेंढपाळांनी लोकप्रतिनिधी व शासनाकडे आग्रहाची मागणी केली होती.
परंतु यासाठी पोलीस यंत्रणा व महसूल विभाग यांच्याकडून स्थलांतरास संदर्भातील परवाना आवश्यक असून यामुळे २४ तास ऑन ड्यूटी असणाऱ्या मेंढपाळास अशा परवान्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रक्रियेची माहिती नसल्यामुळे नवीन प्रश्न निर्माण होणार आहे. जसे महसूल विभाग आता पोलीस यंत्रणांकडे करावा लागणारा ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज कसा करावा याची माहिती बऱ्याच मेंढपाळांना असत नाही व सतत मेंढ्यांच्या मागे फिरावे लागत असल्यामुळे यासाठी पाठपुरावाही करणे यांना जमत नाही . त्यामुळे विशेष बाब म्हणून मेंढपाळांना या परवान्याच्या अटीतून सवलत मिळावी अथवा यासाठी सहज सुलभ पर्यायी व्यवस्था निर्माण करावी अशी मागणी यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय वाघमोडे यांनी केली आहे.
स्थलांतर अत्यावश्यकच
अति पर्जन्याच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्यता रानोमाळी भटकणारा मेंढपाळ रानातून पावसाळ्यात फिरू शकत नसल्यामुळे व औद्योगिकीकरण नागरीकरण व पायाभूत सुविधांच्या विकासामुळे चराऊ कुरण उपलब्ध नसल्याने चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो तसेच अति पर्जन्याच्या काळात साथीच्या आजारांची वाढ होऊन शेळ्यामेंढ्या दगावण्याचे प्रमाण वाढते. याउलट कमी पर्जन्याच्या क्षेत्रात शेळ्या-मेंढ्यांच्या स्थलांतरामुळे शेळ्या मेंढ्यांचे आरोग्य उत्तम राहते व प्रजनन वाढल्यामुळे उत्पादनही चांगले मिळते असा अनुभव अनेक जुनेजाणते मेंढपाळ सांगतात.
कोल्हापूर जिल्ह्यात
एक लाख कुटुंबे मेंढपाळ
पाच लाख व्यक्ती मेंढपाळ व्यवसायावर अवलंबून
फोटो
पावसाळ्याच्या काळात कमी पावसाच्या प्रदेशात स्थलांतर करण्यासाठी मेंढपाळांची तयारी सुरू झाली आहे. स्थलांतरापूर्वी मेंढ्यांना लोकर कातरण्यासाठी मेंढ्यांना धुताना मेंढपाळ
(छायाचित्र महादेव वाघमोडे)