इचलकरंजी प्रतिनिधी
कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणुन इचलकरंजी शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचे तंतोतंत पालन व्हावे यासाठी पोलीस चोवीस तास कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी त्यांना बळ यावे व सामाजिक बांधिलकी म्हणुन इचलकरंजी गावभाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांचा सत्कार करताना शिक्षक सेना यांच्या वतीने करण्यात आला. जिल्हा उपाध्यक्ष सतिश लोहार सर यांनी पुष्पगुच्छ देऊन पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, पोलीस उपनिरीक्षक व त्यांचे सहकारी पोलीस यांचा सत्कार केला. याप्रसंगी शिक्षक सेना इंचलकरंजी शहरअध्यक्ष गजानन लवटे सर , जिल्हा कमिटी सदस्य शिवकुमार मुरतले सर , कोल्हापुर जिल्हा सरचिटणीस स्वप्नील पाटील सर , शहर सचिव जगदीश पुजारी सर हे उपस्थित होते.
दरम्यान पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी कोरोनासंदर्भातील उपाययोजना ,घेण्यात येणारी खबरदारी, नागरीकांना घरात राहण्याचे आव्हान कशा प्रकारे पोलीसांच्या मार्फत देण्यात येते याची चर्चा शिक्षक सेना पदाधिकारी यांच्याबरोबर केली.