गांधीनगर प्रतिनिधी
एस एम वाघमोडे
: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार येथील उजळाईवाडी जवळ मयूर पेट्रोल पंप-भारती विद्यापीठ रोड जवळ मुख्य हायवेवर अज्ञात अवजड वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत अज्ञात दुचाकी चालक जागीच ठार झालाअसून अपघाताचे दृश्य अंगावर शहारे आणणारे होते.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात अवजड वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकी क्रमांक( एम एच-०९- इ सी-१३८०) दुचाकीचालक जाग्यावरच ठार झाला. त्याचा मृतदेह रस्त्यावर छिन्न विछिन्न अवस्थेत स्थितीत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. दरम्यान दुचाकी चालकाचे नाव समजू शकले नाही.घटनास्थळी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व उजळाई वाडी महामार्ग पोलीस कर्मचारी उपस्थित होते .हा अपघात गुरुवारी रात्री ८च्या दरम्यान घडला असून मृतदेह उच्च स्तरीय तपासणी साठी रुग्णवाहिकेतून सीपीआर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे.
फोटो : अपघात ग्रस्त दुचाकी रस्त्यावर पडली होती .