हेरले / प्रतिनिधी
अमर थोरवत
मौजे वडगाव ( ता.हातकणंगले)येथे लोकशाही विचार मंच फाैंडेशन व दलित मित्र जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने यांच्या वतीने गरजू ५४ कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
कोरोना विषाणू संसर्ग फैलाव रोखण्यासाठी लॉक डाऊन काळात मोलमजुरी करणाऱ्या गोरगरीब कुटुंबांना रोजगार उपलब्ध होत नसल्याने त्यांना मदतीसाठी जीवनावश्यक वस्तुंचे कीटच्या माध्यमातून एक मदतीचा हात म्हणून भाजपा तालुका अध्यक्ष राजेश पाटील, सुहास माने व भुपाल कांबळे यांच्या सहकार्याने देण्यात आला.
याप्रसंगी भाजपा हातकणंगले तालुका अध्यक्ष राजेश पाटील, शिरोली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अतुल लोखंडे, पोलीस कर्मचारी ठाणेकर , पटेकर , फौंडेशनचे संस्थापक भूपाल कांबळे, स्वीय सहायक सुहास माने, तसेच फौंडेशनचे सदस्य एकनाथ कांबळे, संजय म्हेत्तर, लक्ष्मण साळवे, सर्जेराव सावंत, संजय कांबळे, संकेत सोनवणे, प्रदीप कांबरे, शेखर कांबळे, कुंदन कांबळे व प्रकाश कांबरे यांचे सहकार्य लाभले.
फोटो
मौजे वडगांव येथे जीवनावश्यक कीटचे वितरण करतांना शिरोली पोलीस ठाणेचे पीएसआय अतुल लोखंडे, भाजपा तालुका अध्यक्ष राजेश पाटील, सुहास माने, भुपाल कांबळे आदीसह इतर मान्यवर.