आई वडिलानंतर शिक्षक हे दुसरं विद्यापीठ आहे, म्हणून शिक्षकांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवावी, असे आवाहन
कोल्हापूरचे दिवाणी न्यायाधीश उमेशचंद्र मोरे यांनी 'नेशन बिल्डर अवॉर्ड'च्या वितरण कार्यक्रमात केले.
हल्लीची तरुण पिढी दुर्दैवाने बिघडत चालली आहे ,अशावेळी पालकांच्या शिक्षकांच्या कडून मोठ्या अपेक्षा आहेत .आई वडिलांच्या नंतर दुसरे विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिक्षकांनी या समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून कार्यरत राहिले पाहिजे असे आवाहन कोल्हापूरचे दिवाणी न्यायाधीश उमेशचंद्र मोरे यांनी केले .
कोल्हापूर रोटरी क्लबच्या वतीने 'नेशन बिल्डर अवॉर्ड 'च्या वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते . कार्यक्रमाचे संयोजन रोटरी क्लब ऑफ शिरोली, रोटरी क्लब ऑफ गार्गीज, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते. प्रास्ताविक विशाखा आपटे यांनी केले.
यावेळी बोलताना शिवाजी विद्यापीठाचे प्र -कुलगुरू डॉ.डी. टी .शिर्के म्हणाले,शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच अभ्यासक्रम बाहेरील ज्ञानही देणे काळाची गरज बनली आहे. कारण शिक्षण पूर्ण करून करिअरसाठी बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक आव्हानांना तोंड लागते ,म्हणून आव्हानांना तोंड देण्यास सक्षम बनवणारी शिक्षण प्रणाली विकसित करण्याची गरज निर्माण झाली आहे .
रोटरीच्यावतीने स्वाभिमानी शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे( हेरले ),जिल्हाध्यक्ष मिलिंद बारवडे( पेठवडगाव),सरचिटणीस भाऊसाहेब सकट( नानीबाई चिखली) यांच्यासह एकूण २३ शिक्षकांना 'नेशन बिल्डर अवॉर्ड' ने सन्मानित करण्यात आले .
याप्रसंगी अध्यक्ष रणजित सिंग, अभिजीत वैद्य,विशाखा आपटे, सचिव सुरेंद्र शिंदे, गौरी शिरगावकर, सचिन जाधव आदी मान्यवरसह क्लबचे सभासद मोठया संख्येंनी उपस्थित होते. सुत्रसंचालन शितल कुलकर्णी यांनी केले.
एड्सग्रस्त मुलांना मदत करण्याचे आवाहन
जिल्ह्यातील एड्सग्रस्त मुले ,तृतीयपंथी आणि वेश्या यांच्यासाठी मोठ्या मोठ्या प्रमाणात काम सुरु असून समाजातील या घटकांसाठी काम करण्यासाठी शिक्षकांसह रोटरी क्लबने पुढे येण्याचे आवाहन न्यायाधीश उमेशचंद्र मोरे यांनी यावेळी केले.
फोटो - रोटरी क्लब ग्रुपच्या वतीन दिलेले नेशन बिल्डर अॅवार्ड विजेते सोबत कोल्हापूर दिवाणी न्यायाधिश उमेशचंद्र मोरे, प्र कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व अन्य मान्यवर.