Friday, 31 August 2018

वुई केअर सोशल फौंडेशन व श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, मानसशास्त्र विभाग, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहाजी महाविद्यालय येथे करिअर मेळावा संपन्न


कोल्हापूर प्रतिनिधी दि : ३० ऑगस्ट २०१८ 


"प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या क्षमता ओळखून करिअर निवडले पाहिजे, तसेच प्रत्येकाची स्पर्धा दुसऱ्याशी नसून ती स्वताशीच असली पाहिजे तरच आपण या स्पर्धेच्या युगात टिकू शकतो." असे मत महावीर महाविद्यालय मानसशास्त्र विभागाचे प्राध्यापक श्री. सुरेश संकपाळ यांनी व्यक्त केले. वुई केअर सोशल फौंडेशनने श्री शहाजी महाविद्यालय येथे संयोजन केलेल्या करिअर मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते.

मेळाव्यातील करिअर मार्गदर्शनाचा व पोस्टर प्रदर्शनाचा १७० हुन अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला त्याशिवाय मेळाव्यातील सहभागी विद्यार्थ्यांना मानसशास्त्रीय कल चाचणीद्वारे विश्लेषण करुन करिअरचे मार्गदर्शन झाले.


मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी असलेले प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण म्हणाले, "ससा आणि कासवाची गोष्ट जुनी झाली असून आजकालचे कासव हे स्केटिंग लावून पळतात त्यामुळे आपल्या कामात आपले सातत्य असले की आपण नक्कीच यशाचे शिखर गाठू शकतो." यावेळी शहाजी महाविद्यालयाचे मानसशास्त्र विभाग प्रमुख श्री. अनिल बलुगडे,  प्राध्यापक श्री. के. एम. देसाई, डॉ. एन. एस. जाधव तसेच फौंडेशनचे सुदर्शन पांढरे, इम्रान शेख, रूपेश कांबळे, सलमान मुजावर, फौंडेशनचे सदस्य व महावीर महाविद्यालयातील मानसशास्त्र शिकणारे विद्यार्थी उपस्थित होते.

श्री जय हनुमान सह दुध संस्थेची ११वी  सर्वसाधारण सभा उत्साहात व खेळीमेळीत संपन्न 

हेरले / प्रतिनिधी दि. २८/८/१८


    मौजे वडगाव ( ता. हातकणंगले ) येथील श्री जय हनुमान सह दुध संस्थेची ११वी  सर्वसाधा२ण सभा मोठ्या उत्साहात व खेळीमेळीत संपन्न झाली.  संस्थेचे सचिव  आण्णासो पाटील यांनी अहवाल वाचन केले तर सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन  बाळासो आ .चौगुले होते .

          यावेळी गोकूळ दुध संघाचे सुपरवायझर  सुरेश पाटील यांची सिनियर सुपर वायजर म्हणून बढती झाल्याने संस्थेच्या  वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ते म्हणाले की , संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी यांचे चांगले नियोजन व चिकाटीमुळे अल्पावधीत शंभर लिटर पासून नऊशे लिटर पर्यत दुधसंकलना चा टप्पा पार केला असून भविष्यात १०००लिटर दुधसंकलनाचा टप्पा संस्था पार करेल.  गाय दुधापेक्षा म्हैस दुधवाढीचा टक्का वाढला पाहीजे यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना देऊन जनावरांबाबत व दुधसंदर्भात उत्तम मार्गदर्शन केले.  

       सभेमध्ये मराठा आरक्षण , लिंगायत आरक्षण 'धनगर आरक्षण यांना पाठींबा जाहीर करण्यात आला.  संस्थेच्या सर्व दुधउत्पादक सभासदांचा अपघात विमा संस्थेमार्फत मोफत उतरण्यात यावा असा ठरावही करण्यात आला. तसेच संस्थेस म्हैस व गाय दुधाचा जास्त पुरवठा करणाऱ्या सभासदांना उत्तेजन मिळावे म्हणून रोख रक्कम व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला.

          यावेळी संस्थापक चेअरमन  बाळासो थोरवत व्हा . चेअरमन श्रीकृष्ण थोरवत, संचालक मंडळ महादेव शिंदे , नेताजी माने, सतिश चौगुले, जयवंत चौगुले, सुरेश कांबरे , निवास शेंडगे, सुनिल सुतार, ग्रा.पंसदस्य अवधूत मुसळे , शकील हजारी सुभाष मुसळे, प्रकाश पाटील , आदीसह  दुधउत्पादक सभासद कर्मचारी संस्थेचे हितचिंतक मोठया प्रमाणात उपस्थित होते .प्रास्ताविक सचिव आणासो पाटील यांनी तर आभार संचालक महादेव चौगुले यांनी मानले .

        फोटो 

मौजे वडगाव येथील श्री हनुमान दुधसंस्थेच्या वतीने सिनीअर सुपरवायजर सुरेश पाटील यांचा सत्कार चेअरमन बाळासो चौगुले करतांना. शेजारी इतर मान्यवर.

कामधेनू सहकारी दूध संस्थेच्या चेअरमनपदी बशीर हजारी यांची तर व्हा. चेअरमनपदी सुशिला गोरड यांची निवड

हेरले / प्रतिनिधी दि. २९/८/१८


      मौज वडगाव ( ता. हातकणंगले)येथील कामधेनू सहकारी दूध संस्थेच्या चेअरमन पदी बशीर रसुल हजारी यांची तर व्हा. चेअरमनपदी सौ. सुशिला आनंदा गोरड.यांची निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी मावळत्या चेअरमन सौ. उमा चौगले या होत्या. 


हातकणंगले तालुक्यातील एक नामवंत व पहिली आयएसओ मानांकन संस्था म्हणून कामधेनु संस्थेचा उल्लेख केला जातो. 

या संस्थेवर संयुक्त ग्रामविकास आघाडीची सत्ता आहे. रोटेशन नुसार हि निवड करण्यात आली.

यावेळी आघाडीचे प्रमुख मानसिंग रजपूत, सरपंच काशिनाथ कांबळे, माजी सरपंच मुबारक बारगीर, उपसरपंच किरण चौगले, संजय चौगुले, बेबी हजारी, महंमद हजारी, गुंडा कांबरे, संजय सावंत,  वैशाली परमाज, लता जंगम, भारती सावंत आदी उपस्थित होते.स्वागत व विषय वाचन सेक्रेटरी रमेश लोंढे यांनी केले. आभार संजय चौगले यांनी मानले.

सपोनि रविंद्र कदम यांचा विशेष बक्षीसाने गौरव


हेरले / प्रतिनिधी दि.२९/८/१८

   हातकणंगले पोलिस ठाण्याअंतर्गत गुन्हा नोंद असलेल्या गुन्ह्यातील आरोपीने लाच म्हणून रक्कम देण्याचे आमिष दाखवले असतानाही लाच न घेतल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक आर .एम .कदम (आर्थिक गुन्हे शाखा , कोल्हापूर ) यांना विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे आदेशानुसार रोख रुपये दहा हजार रुपये व सी  नोट देऊन सन्मान  केला आहे .

      लाच देणे व घेणे हे कायद्याने गुन्हा असल्याने आर.एम. कदम यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधित आरोपीविरूध्द तक्रार  केल्यामुळे लाचलुचपत विभागाने यशस्वी सापळा लावला होता व लाच देताना संबंधितास पकडले होते . त्यामुळे सपोनि रविंद्र कदम यांच्या या कामामुळे पोलिस दलाची जन माणसातील प्रतिमा उंचावली आहे . म्हणून चांगल्या कामगिरीला उत्तेजना मुंबई पोलिस नियमावलीनुसार  कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी  विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या आदेशानुसार हे बक्षीस दिले आहे .

 "तायकाॕदो" स्पर्धेत बालाजी हायस्कूल मौजे मुडशिंगीच्या ( ता. हातकणंगले)  विद्यार्थ्यांचे घवघवीत यश 

हेरले / प्रतिनिधी दि. ३१/८/१८


      


  विश्व वारणा विद्यालय तळसंदे येथे पार पडलेल्या तालुकास्तरिय "तायकाॕदो" स्पर्धेत बालाजी हायस्कूल सैनिक पॅटर्न निवासी शाळा मौजे मुडशिंगीच्या ( ता. हातकणंगले)  विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

 कु.गौरव भोसले-सिल्व्हर , कु..सतेज दाभाडे-ब्रांझ, कु.तेजस गोडसे-ब्रांझ , कु.प्रथमेश पाटील-ब्रांझ आदी खेळाडूनी यशस्वी कामगिरी केली. यशस्वी विद्यार्थ्यांना  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गजानन जाधव , सचिव अमोल जाधव,मुख्याध्यापक कुमार शिंदे तसेच प्रशिक्षक -निलेश परीट व प्रज्वल कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .

    बालाजी हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडादिन साजरा करण्यात आला.यावेळी हाॕकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार  मुख्याध्यापक .शिंदे के.एस. यांच्या हस्ते अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी मेजर ध्यानचंद यांच्या कार्याची व विविध खेळाची विद्यार्थाना माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थानी सर्व खेळामध्ये उत्तुंग यश मिळवण्याची ग्वाही दिली.यावेळी क्रीडाप्रशिक्षक  परीट एन .बी, श्री.जाधव .ए.जी,श्री. पाटील.एस.के. श्री.खरसे व्ही .एस,गवळी.जी.आर,चोकाककर .एस .एस ,मुजावर एस .एस आदी उपस्थित होते.

   फोटो 

बालाजी हायस्कूल मुडशिंगीतील यशस्वी खेळाडू सोबत प्रशिक्षक वर्ग

Thursday, 30 August 2018

कोल्हापूर येथे वुई क्लब अॉफ रणरागिनी ची स्थापना

समाजातील वंचित घटकांचे आपण काही देणे लागतो व सक्षम महिलांनी गरजु महिलांसाठी महिला क्लबच्या माध्यमातून पुढे यावे यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात वुई क्लब ऑफ रणरागिनी या संघटनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. 


कोल्हापूर कसबा बावडा येथील श्रीराम मंगल कार्यालयात उपवन वर्तकनगर जिल्हा ठाणे संचलित वुमन इप्टॉमी (Women Epitome) अर्थात वुई क्लब अॉफ रणरागिनी कोल्हापूर शाखेचा शानदार उद्घाटन समारंभ पार पडला. 


या कार्यक्रमप्रसंगी क्लबच्या संस्थापिका श्रीमती सविता नायक, मुख्य आमंत्रित श्रीमती माला शेट्टी, विस्तार अधिकारी श्रीमती अनुपमा पाटील  उपस्थित होत्या. 


 वुई क्लब अॉफ रणरागिनी कोल्हापूरच्या नुतन अध्यक्ष पदी सविता पाटील, सचिवपदी श्वेता शिर्के, खजिनदार पदी सुरेखा परब यांची निवड करण्यात आली.  

समाजातील गरजू असाह्य महिलांचा विकास व पिडीत महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी हा क्लब कार्य करणार आहे. समाजातील महिला वर्गाला संंघटीत करुन महिला विकास व सबलीकरण हे ब्रिद घेवून वुई क्लब अॉफ रणरागिनी ची वाटचाल असणार आहे. 

Saturday, 25 August 2018

रक्षाबंधन जाणून घ्यायला हवे असे काही.



‘रक्षाबंधन’ हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो.

आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवी मानले आहे. अशी ही देवतुल्य स्त्री भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हा टिळा फक्त मस्तकाच्या आदराचा नसून भावाच्या मस्तकातील सद्विचार वं सदबुद्धी जागृत राहण्यासाठीची पूजा आहे. सामान्य डोळ्यांनी जे पाहू शकत नाही ते सर्व विकार, भोग, लोभ, मत्सर, वासना, द्वेष,राग इत्यादींकडे भावाने आपल्या य तिसऱ्या डोळ्याने पहावे य हेतूने बहिण भावाला टिळा लावून त्रिलोचन बनविते. इतका त्या टिळयाचा खोल अर्थ आहे.

राखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुर्षार्थाचे पवित्र बंधन आहे. ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो वं मन प्रफुल्लीत होते.

एकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्याही धर्मात संस्कृतीत नाही. सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्वाचे ठरतात. रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास ह्या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्य असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे. 

कोल्हापूर जिल्हा NAS परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकावर आणणार " - प्राचार्य आय.जी.शेख

*" *



*कसबा बावडा,दि.२४ ऑगस्ट २०१८:* 


महानगरपालिका क्षेत्रानंतर्गत कार्यरत मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर,शाळा क्र 11,कसबा बावडा,कोल्हापूर

CRC कसबा बावडा क्र. ७ ची 

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2 री हि श्रीमंत माईसाहेब बावडेकर प्राथमिक विद्यालय,कोल्हापूर येथे  संपन्न झाली.


सदर शिक्षण परिषदेचे उदघाटन माईसाहेब बावडेकर शाळेच्या व ट्रस्ट च्या अध्यक्षा श्रीमंत नितुदेवी बावडेकर यांच्या हस्ते व उपाध्यक्ष निलराजे बावडेकर,केंद्रमुख्याध्यापक अजितकुमार पाटील सर, प्राथमिक विभाग प्रमुख संज्योती पाटील मॅडम, माध्यमिक विभाग प्रमूख सोनबा कुंभार सर, तज्ञमार्गदर्शक कुमार पाटील,दिगंबर बादले ,राजाराम सातपुते  यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

अध्ययन निष्पत्ती व नास कार्यक्रम याबद्दल प्रोजेक्टर वर भाषा ,गणित,इंग्रजी या विषयांचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.सदर प्रशिक्षणास 115 शिक्षक उपस्थित होते.


सदर शिक्षण परिषदेला DICPED कोल्हापूर चे प्राचार्य आय.जी.शेख,अधिव्याख्याता राजेंद्र  कांबळे सर,चिंचनकर मॅडम,संजय लोंढे ,काजवे मॅडम आदी मान्यवरांनी भेट दिली.त्यात आय.जी.शेख यांनी NAS सर्वेक्षणात कोल्हापूर जिल्हा पहिल्या तीनमध्ये आणण्याचे आवाहन शिक्षकांना केले.सदर कार्यशाळेत कृती आराखडा कसा तयार करयाचा त्याचे मार्गदर्शन करून गटा-गटात भाषा,गणित विषयाचे आराखडे तयार करण्यात आले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व  उद्देश केंद्र मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी केले, शिवशंभू गाटे यांनी सूत्रसंचालन केले,उपस्थित मुख्यध्यापक,शिक्षक,मान्यवर यांचे आभार उत्तम कुंभार यांनी मानले.

Wednesday, 22 August 2018

नथिंग जर नसेल अर्थिंग !!!


आजकाल वीजेचा वापर खूप वाढला आहे, कारण बाजारात येणारे प्रत्येक तीसरे उपकरण वीजेवर चालते. वीज म्हणताच मला नेहमी "इलेक्ट्रिकल सेफ्टी" आपसुकच आठवते. 

एक छोटीशी चूक वीजेच्या बाबतीत कधी ही "जीवघेणी बनू" शकते. 33 वर्षे वीज मंडलात नोकरी करून अंतहीन एक्सीडेंट पाहिलेत. प्रत्येक एक्सीडेंट ने आम्हाला बरेच काही शिकविले. वीज मंडळात इलेक्ट्रिकल एक्सीडेंट्स टाळायला बरीच व्यवस्था असते, तसे घरातल्या बाबतीत नसते. ह्या भूमिकेवर आता खालील लेख वाचा आणि शेअर करा. 

प्रत्येक वीज व्यवस्थे मध्ये लीकेज करेंट पासून वाचवायला अर्थिंग ची व्यवस्था असते. प्रत्येक घरी वायरिंग मध्ये थ्री पिन लावलेली दिसते. त्यात मधोमध वरच्या बाजूला एक मोठे पिन अर्थिंग साठी असते. खाली डावी कड़े फेज आणि उजवी कड़े न्यूट्रल असायला हवे. घराची / दुकानाची /लघु उद्योगा ची वायरिंग तेव्हाच तपासली जाते ,जेव्हा एकाधी जीव हानि होते. तेव्हाच कळते कि वायरिंग मधील अर्थिंग तुटलेली किंवा अनुपलब्ध आहे. ही अर्थिंग किती महत्वाची आहे, हे ही तेव्हाच कळते. 

वर्षातुन दोनदा ही अर्थिंग तपासायची सवय ठेवा ।

 अर्थिंग तपासायला घरीच उपकरण तयार करू शकता. एक होल्डर, एक बल्ब (कुठला ही चालतो) आणि दोन वायर्स. होल्डर ला वायर्स जोड़ा. बल्ब लावा, झाले तुमचे उपकरण तयार. आता अर्थिंग तपासायला एक वायर जाड्या पिन च्या ठिकाणी लावा, दूसरी वायर आल्टरनेट बारीक पिन्स च्या भोकात घालून बघा. एका बारीक पिन वर वायर लावली कि बल्ब प्रकाशमान होईल, एकात प्रकाशमान नाही होणार. बल्ब  लागला तर तुमच्या त्या बोर्ड पर्यन्त अर्थिंग वर्किंग कंडीशन मध्ये आहे. असे घराचा प्रत्येक बोर्ड तपासा. 

समजा घरात कुठेच थ्री पिन मध्ये वरील प्रमाणे बल्ब प्रकाशमान होत नाही, तर तुमच्या घरातील अर्थिंग गड़बड़ आहे. ह्या परिस्थितीत घराचे अर्थिंग जिथे ही असेल , ते तपासा,  सामान्यतया स्वतंत्र घरां मध्ये मीटर बोर्ड च्या जवळ पास च अर्थिंग केलेले असते. पुष्कळ शहाणे ह्या करिता वापरलेली अर्थिंग वायर, आँगणात किंवा भिंती च्या "प्लास्टर मध्ये दाबून टाकतात" कारण घराची सुंदरता कमी(???) होते. हा शहाणपणा मुळीच करू नयेत. कारण ही वायर लोखंडी असली तर गंजून गळते, इतर असेल तर केव्हा तुटली, कळणार ही नाही , म्हणून अर्थिंग वायर सतत मीटर बोर्ड पासून अर्थिंग पिट पर्यन्त दर्शनीय असली पाहिजे. तसेच अर्थिंग पिट मध्ये अर्थिंग साठी लावलेला पाइप ही दर्शनिय असलाच पाहिजे. अर्थ रेसिस्टेन्स कमी ठेवायला ह्या अर्थिंग पिट मध्ये ओलावा असलाच पाहिजे म्हणून रोज निदान एकदा जेवना नंतर इथे हाथ धुवायाची सवय ठेवा. ह्या निमित्याने रेगुलर अर्थिंग इंस्पेक्शन ची सवय लागेल, आणि काही गड़बड़ वाटली तर लगेच सुधरविता येईल. 

विचार करा, आवडले तर व्यवहारात आणा. नसेल आवडले तर विसरा , पण कधी ही जीव ह्या हलगर्जी मुळे द्यायची तयारी ठेवा. वाईट वाटले असेल तरी दिलगीर मुळीच नाही, कारण "जान है, तो ही जहान है" ।मरज़ी तुमची, कारण जीव आहे तुमचा ।

आपण वेळ दिला वाचायला, म्हणून धन्यवाद ।

मिलिंद भिड़े, 

भिलाई नगर, छत्तीसगढ़

Tuesday, 21 August 2018

भीती कशाची कोणाला ?


AAROGYA SALLA

भीती कशाची कोणाला ? धोक्याची स्पष्ट जाणीव असणे व त्या बद्दलची मानवी मनात निर्माण होणारी शारीरिक हानीची ,धोक्याची,वा इजा होणारी संकल्पना व अनुभवास येणारी भावना म्हणजे भीती होय. एखाद्या वस्तू व प्रसंगा पासून व्यक्तीला अत्यल्प धोका असताना किवा अजिबात धोका नसताना त्या वस्तूबद्दल व प्रसंगा बद्दल सातत्याने व प्रमाणा बाहेर वाटणारी अनामिक संकल्पना म्हणजेच भीती होय

भीती हि एक मानसिकता किवा भावना आहे जी वेगवेगळ्या कारणामुळे निर्माण होते. बराच वेळा प्रसंगानुरूप भीती निर्माण होणे अगदी स्वाभाविक असते. उदाहरणार्थ अपघात पाहिल्यावर किंवा भीतीदायक चित्रपट पाहिल्यावर, स्वतः सोबत अपघात झाल्यावर इत्यादी. परंतु जर हि भीती बराच वेळा काही कारण नसताना उत्पन्न झाली अथवा आधीच्या भीतीदायक प्रसंगाचे मनावरील दडपण गेले नाही किंवा त्याचा निचरा झाला नाही तर मात्र हीच भीती मानसिक त्रासाचे , मानसिक रोगाचे कारण देखील बनू शकते.

लक्षणं अचानक हृदयाची धडधड वाढणं हे प्राथमिक लक्षण असतं. या भीतीने आपण मरणार या भीतीने अनेकदा रुग्णांना ग्रासलेलं असतं.

उपाय

ज्या वस्तूंमुळे किंवा परिस्थितीमुळे तुम्हाला भीती वाटते किंवा ज्यामुळे चिंतातूर होतात अशाची यादी बनवा. भीती घालवण्यासाठी टप्प्या-टप्प्या ने सामोरं जा. उदाहरणार्थ, एखाद्याला कोळीची भीती वाटत असेल तर त्याला पहिले कोळ्याचे फोटो दाखवा मग जिवंत कोळ्याला हात लावण्याचा प्रयत्न करु शकतात. तसंच ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते ती थेट करुन बघण्याचा प्रयत्न करा, पण असं करताना तुमच्या अगदी जवळच्या मित्र-मैत्रिणींची किंवा थेरपिस्टची मदत घ्या. उदाहरणार्थ, एखाद्याला विमानाने प्रवास करण्याची भीती वाटत असेल तर थोडं धाडस करुन मित्र-मैत्रिणींबरोबर विमानाचा प्रवास करा. आवश्यक वाटल्यास मनोचिकित्सकांची मदत जरुर घ्या. मनात कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नका. आनंदी राहा.

आरोग्य सल्ला फेसबुक ग्रुप च्या सौजन्याने . 

आपल्या मित्रांना व परिवाराला या ग्रुप मध्ये जॉईन करावे आणि आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी.

सर्वांच्या सहकार्यातून जिल्हा परिषद शाळांचा दर्जा वाढवुया—योगेश जाधव


माजगांव प्रतिनिधी:—

दि.२०/६/२०१८

      रोटरी क्लब आॅफ टेस्क्टाईल सिटी यांच्या मार्फत पोर्ले/ठाणे जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप प्रसंगी बोलत होते.

        आजची पिढी अतिशय भाग्यवान आहे कारण ती इंनटरनेटच्या युगात घडत आहे.त्यामुळे आजच्या विद्यार्थ्याला आपल्याला पाहिजे त्या शिक्षकाकडून ज्ञान घेता येईल.शिक्षकांची भुमिका फॅसिलेटरची झाली आहे.असे मत योगेश जाधव दै.पुढारी अध्यक्ष उर्वरित महाराष्र्ट वैधानिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांनी मांडले.

    

  जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी मदत करणार असलेचे मत अमरिष घाटगे सभापती अर्थ व शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी मांडले.

        जिल्हा परिषद सदस्या प्रियांका पाटील म्हणाल्या की मागास वंचित घटकांना ज्ञानदान करणार्‍या शाळा टिकल्याच पाहिजेत.भविष्यातील रेडकार्पेटवरील रणरागिणी याच विद्यार्थिनी असतील.

     गणवेशामुळे कोणता मुलगा साहेबांचा आहे आणि कोणता मुलगा कामगाराचा आहे याचा पत्ता लागत नाही.सर्वांना समान पातळीवर ठेवतो.गणवेश हा समानतेच तत्व घेवून जोडणारा धागा आहे.रोटरी क्लब गरजूंना मदत करणारी जगातील नं.१ची संस्था आहे. असे विचार संग्राम पाटील डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नाॅमिनी २०२०—२१यांनी मांडले.

     

    कार्यक्रमाला के. डी.सी.सी. बॅकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर,सर्व शाळेंचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक,विद्यार्थी,पालक उपस्तिथ होते.

Monday, 20 August 2018

मातृभाषेबरोबरच इंग्रजीचे ज्ञान आवश्यक - पद्मसिंह पाटील यांचे शालेय गणवेश वाटप प्रसंगी प्रतिपादन

कागल / प्रतिनिधी दि. १४/८/१८


    आई -वडील व शिक्षकांचा जीवनामध्ये सदैव सर्वांनी आदर करावा. गणवेशामुळे एकता निर्माण होऊन आपली व समाजातील सर्वांची ठळकपणे ओळख निर्माण होते. त्यामुळे सर्वच घटकात गणवेश महत्त्वाचा आहे. विदयार्थ्यांनी मातृभाषे बरोबर इंग्रजीचे ज्ञान अवगत करून घ्यावे. त्यामुळे जगाची सहज ओळख होते. असे प्रतिपादन युवा उद्योजक पद्मसिंह रणजितसिंह पाटील यांनी केले.

        श्री शाहू हायस्कूल कागलमध्ये  गरीब  व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप कार्यक्रम आयोजित केला होता त्या प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य एम.बी. रुग्गे होते. स्वागत व प्रास्ताविक एस.के. भोसले यांनी केले.

              प्रमुख पाहुणे कोजिमाशी माजी चेअरमन तथा कौन्सील मेंबर बाळासाहेब डेळेकर म्हणाले की, गोकूळ संचालक रणजितसिंह पाटील यांनी ३५ वर्ष समाजसेवेच्या माध्यमातून लोकांना यथाशक्ती  मदत केली. त्यांच्या समाजसेवेच्या कार्याचे प्रतिबिंब त्यांच्या चिरंजिवांच्या सामाजिक कार्यातून दिसत आहे. गोरगरिब विदयार्थ्यांना शिक्षणातून ज्ञानी होण्यासाठी शैक्षणिक साहित्याची मदत करणे म्हणजे खरोखरच आदर्शवत कार्य आहे.

      उद्योजक पद्मसिंह पाटील यांनी शाळेतील ४० विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला गणवेश वाटप करून स्वातंत्र्यदिनास गरीब व होतकरू विदयार्थ्यांना अनोखी भेट दिली. ते कागल तालूक्यात अनेक शाळांमध्ये गेली दोन वर्षे गणवेश, पुस्तके, वह्या आदी  शैक्षणिक साहित्याचे वाटप करून ग्रामिण भागातील मुलांना शिक्षणास प्रोत्साहन देण्याचे अतुलनिय कार्य करीत आहेत.

       प्रथमतः पद्मसिंह पाटील, बाळासाहेब डेळेकर यांचा सत्कार शालेय प्रशासनाच्या वतीने प्राचार्य एम.बी. रूग्गे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ता असिफ मुल्ला, कार्यवाह के.बी. वाघमोडे, उपमुख्याध्यापक आर.जी. देशमाने, पर्यवेक्षिका एस.ए. कुलकर्णी, उपप्राचार्य बसाप्पा मडिवाळ,तंत्र विभाग प्रमुख सुधाकर नाईक,एस.यु.देशमुख,संजय पोतदार, शंकर खाडे, के.एच. भोकरे, आदी मान्यवरांसह शिक्षकवृंद विदयार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन कादर जमादार यांनी केले. आभार महेश शेडबाळे यांनी मानले.

          फोटो 

श्री शाहू हायस्कूलमध्ये गणवेश वाटप करतांना पद्मसिंह पाटील, बाळासाहेब डेळेकर, प्राचार्य एम.बी. रूग्गे व अन्य मान्यवर.

Saturday, 18 August 2018

अटल ! अटल !


पाकिस्तान पत्रकार नसीम जेहरा यांचे ‘फ्रॉम कारगिल टू द कॉप’ हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे. अटलजी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची हिंदुस्थान भेट बाणेदारपणे रद्द केल्याचा प्रसंग त्यात कथन करण्यात आलेला आहे. 1999 सालात शरीफ हिंदुस्थानात येणार होते. त्यांनी फॅक्सद्वारे ‘गुडविल मेसेज’ही पाठविला होता. त्याला रात्री 10 वाजता अटलजी यांनी पाठवलेले प्रत्युत्तर म्हणजे जणू बॉम्बगोळाच ठरला होता. वाजपेयींनी ठणकावले होते – नवाज शरीफजी, मी तुम्हाला हिंदुस्थानात मुळीच निमंत्रित करत नाही. कारगीलमधून तुमचे सैन्य हटवा, एवढेच आपणास सांगत आहे. दोन्ही राष्ट्रांमध्ये चर्चेची सुरुवात होण्यासाठी ते अपरिहार्य आहे.

तर अटलजींच्या अटलपणाचा दुसरा किस्सा ! 

कारगील युद्धानंतर दोन राष्ट्रांतील संबंध सुधारण्यासाठी वाजपेयी यांनी 2001 सालात पाकिस्तानचे लष्करशहा परवेज मुशर्रफ यांना आग्रा येथे निमंत्रित केले होते, पण दहशतवादाविरोधातील वाजपेयींच्या ठाम भूमिकेमुळे मुशर्रफ यांना खाली मान घालून पाकिस्तानात परतावे लागले होते.

Sunday, 5 August 2018

स्त्री आरोग्य आणि सॅनिटरी नॅपकिन विषयावर शेंडूर येथे जनजागृती

सिध्दनेर्ली दि 8  रविंद्र पाटील. 


     मानव हायस्कुल ,शेंडुर येथील मुलींना *वयात येताना होणारे शरिरीक व मानसिक बदल, मासिक पाळी व्यवस्थापन, सॅनिटरी नॅपकीनचा वापर* या विषयावर अविरत संस्थेमार्फत सौ सुप्रिया पाटील चौगले यांनी मोफत मार्गदर्शन केले यावेळी बोलताना सौ सुप्रिया पाटील चौगले पुढे म्हणाल्या  आपल्या समाजात मासिक पाळीला अपवित्र मानलं जातं. या दरम्यान महिलांना घराच्या एखाद्या कोपऱ्यात किंवा घराबाहेरच्या खोलीत बसवलं जातं. या दरम्यान महिलांना अपवित्र मानलं जातं. महिलांना स्वयंपाक घरात प्रवेश नसतो, कुणाशी गप्पा मरायलाही स्वतःच्या घरात येता येत नाही.

हे फक्त गरीब कुटूंबांमध्ये नाही तर पैश्याने श्रीमंत व सगळ्या जातींमध्ये ही 'प्रथा' दिसून येते.मासिक पाळी हा स्त्रीयांच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल आहे. मासिक पाळी पुर्णता नैसर्गिक क्रिया आहे.मासिक पाळी स्त्री ला स्त्रीत्वाची जाणीव करुन देते. याच मासिक पाळी बाबत अनेक गैरसमज आहे, त्यामुळे पाळी दरम्यान योग्य काळजी घेतली जात नाही.अविरत ग्रामीण विकास प्रतिष्ठानकडुन सौ.सुप्रिया पाटील व सहकारी  मासिक पाळी व्यवस्थापन, स्वच्छता, मासिक पाळी एक वरदान याबाबत जनजाग्रती करतात.विविध खेळ, चर्चा, video,पोस्टर या माध्यमातुन मुली व महिलांना हा विषय समजावुन सांगितला जातो. संस्थेमार्फत कागल व करविर भागातील विविध शाळांमध्ये व महिलांसाठी कार्यक्रम झाले आहेत.

       .या वेळी शाळेतील श्रीमती. इंगळे मँडम यांचेसह विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या 

Saturday, 4 August 2018

कफ सिरपसह अनेक पेन किलरवर बंदी येण्याची शक्यता ?

कोल्हापूर प्रतिनिधी दि. 04 अॉगस्ट 2018

केंद्रीय आरोग्य मंत्रालय डिकोल्ड टोटल, सॅरिडॉन, फेंन्सेडिल आदींसह ३४३ औषधांवर बंदी घालण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार देशातल्या जवळपास तीनशेहून अधिक औषधांवर आरोग्य मंत्रालय बंदी घालण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय औषध बनवणाऱ्या कंपन्यांसोबतच देशी औषधी निर्माता कंपन्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसू शकतो व औषध व्यापारावर मंदीचे सावट येऊ शकते. 

वेदनाशामक आणि फ्लू शी संबंधित औषधांवर बंदी येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. ही औषधे फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन औषधे आहेत असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

या निर्णयाला आव्हान देत बहुराष्ट्रीय कंपन्या न्यायालयात दाद मागु शकतात त्यांनी जर या निर्णयाला स्थगिती आदेश मिळवले तर तारीख पे तारिख होऊ शकते आणि ही औषधे बंदी बासनातच गुंडाळली जाऊ शकते. 

दोनशे शब्दांत मांडता न येणारा आशय चार ओळीत कोंडण्याचा पराक्रम - - मा. इंद्रजित देशमुख. जिल्हा परीषदेच्या शाळेतील मुलींच्या "कोवळे उन"काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रसंगी कौतुकोद्गार

.

माजगांव प्रतिनिधी:—दि.१/८/२०१८

        जो आशय शंभर ते दोनशे शब्दात मांडता येणार नाही तोच आशय चार ओळीत कोंडण्याचा पराक्रम या जिल्हा परिषद शाळेतील मुलींनी केला आहे.असे मत संत साहित्याचे अभ्यासक व निवृत्त उप. मु.कार्य अधिकारी मा.इंद्रजित देशमुख सो यांनी सांगीतले.ते कन्या विद्या मंदिर पोर्ले/ठाणे ता.पन्हाळा जि.कोल्हापूर या शाळेतील ई. ५वी. ते ई.७वीतील विद्यार्थिनिंनी  लिहलेल्या "कोवळे उन"या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते

        विद्यार्थ्यिनिंनी  सावित्रीबाई फुले यांच्यावर लिहलेल्या कवितेचा दाखला देत सावित्रीबाईंनी मुलिंच्या शिक्षणासाठी अंगावर शेन झेलल्याचे सांगीतले.पर्यावरणावरील कविताही मनाला भिडणार्‍या आहेत.ही पिढी पर्यावरणाचा एवढा विचार करत असेल तर भविष्यात पर्यावरण प्रदुषण कमी व्हायला निश्चित मदत होईल.तसेच या कविता लिहनार्‍या चाळीस विद्यार्थिनी या उद्याच्या चाळीस कवयत्रीच असल्याचे गौरव उद्गार इंद्रजित देशमुख यांनी काढले.


      यावेळी माजगांच्या उद्योन्मुख कवयत्री सौ.सुलोचना संजय पाटील यांनी आपला "संसार गाथा" हा काव्यसंग्रह इंद्रजित देशमुख यांना भेट म्हणुन देणेत आला.

       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच प्रकाश जाधव होते.कार्यक्रमाला गट शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत मॅडम,प्रकाशक युवराज कदम व वनिता कदम,वाचन कट्टाचे मुख्य समन्वयक टी के सरगर,केंद्रप्रमुख एम.डी.पाटील,संपादक विजय एकसींगे माजी जि.प. सदस्य प्रकाश पाटील अण्णा, कन्या.शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष रामराव चेचर,कुमार शाळेचे व्यवस्थापण समिती अध्यक्ष संभाजी खवरे,कन्या शाळेचे मुख्याध्यापक डी.एस. चौगले सर, कुमार शाळेचे मुख्याध्यापक सावंत सर,शाळा व्यवस्थापण समिती सर्व सदस्य,शाळेतील शिक्षक मांडवकर सर,जाधव सर,हिंदुराव काशिद सर,कुबेर चौगले सर,ठाणेकर सर,काटकर सर,हुपरे सर,भिमराव काशिद सर,शेवाळे सर,सर्जेराव गुरव सर,आसिफ पठाण सर, प्रकाश पोवार सर,नामदेव पोवार सर,बाजीराव कदम सर,कृष्णात कोरे सर उदाळे सर व ग्रामस्त उपस्थित होते.आभार मांडवकर सर यांनी मानले.

Friday, 3 August 2018

हेरले ते वडगांव रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ता हा संशोधनाचा विषय

शिरोली  / प्रतिनिधी दि. ३/८/१८

      अवधूत मुसळे


हातकणंगले तालूक्यातील हेरले ते मौजे वडगाव व मौजे वडगाव ते फाटा ह्या रस्त्यांची चाळण झाली असून रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता संशोधनाचा मुद्दा ठरत आहे. वारंवार अपघाताने प्रवास करणे दुरापास्त झाला आहे.

    हेरले ते मौजे वडगाव दिड कि मी व मौजे वडगाव ते कोल्हापूर सांगली हायवेला जोडणारा मुख्य रस्त्या अडीच किमीचा आहे. या रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डेच खड्डे पडल्याने प्रवास करणे जिकीरिचे बनले आहे.कोल्हापूरला जाण्यासाठी मौजे वडगावातून हेरलेमार्गे व फाटा हे सोयीचे मुख्य रस्ते असून त्या रस्त्यावर अनेक दिवसापासून आर्धा फुटाच्या मापाचे जागो जागी खोलवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामध्ये पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना अंदाज येत नसल्यामुळे अनेक मोटर सायकल घसरून अपघात होऊ लागले आहेत.

       तसेच खोलगट खड्ड्यामध्ये चारचाकी वाहणे समोरून दुसरे वाहन आल्यास आडकू लागल्यामुळे प्रवाशी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. कोल्हापूरला जाण्यासाठी हे मुख्य रस्ते असल्यामुळे शाळा ,महाविद्यालय ,दवाखाना, तसेच नोकर वर्ग या निमित्ताने गावातील शेकडो लोकांची नियमित ये जा असते. अशा ठिकाणच्या रस्त्याकडे दुर्लक्ष होणे म्हणजे आपघाताला निमंत्रण दिल्याप्रमाणेच आहे.तसेच गावात येणारी केएमटी बस खराब रस्त्यामुळे बंद होईल अशी भिती विद्यार्थी व पालकवर्गात आहे. त्यामुळे निदान तात्पूरता मुरुम टाकून तरी हे खड्डे मुजवावेत अशी मागणी  ग्रामस्थ , वाहनधारक व प्रवाशी वर्गातून होत आहे .

       फोटो कॅप्शन

   मौजे वडगांव  रस्त्यावर पडलेले मोठे खड्डेमुळे प्रवास करणे कठीण बनले आहे.

विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करावे " - मुख्याध्यापक अजितकुमार पाटील


राजर्षी शाहू विद्यामंदिरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निम्मित भाषण स्पर्धा संपन्न....


*कसबा बावडा,दि.२ ऑगस्ट २०१८:* 

कसबा बावडा परिसरातील उपक्रमशील शाळा मनपा. राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र.११ च्या वतीने पृथ्वी शेषनागाच्या  फण्यावर नाही तर कामगार व दिन दलितांच्या हातावर तरलेली आहे अशी भीमगर्जना करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मिळणारच ! अशी डरकाळी फोडणारे स्वराज्य नायक लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीचे  औचित्य साधून शाळेमध्ये भाषण स्पर्धेचे आयोजन करणेत आले होते.


प्रथमतः प्रमुख पाहुण्या ताहीरा मुजावर यांच्या उपस्थितीत  दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला जेष्ठ शिक्षिका सुजाता आवटी मॅडम व मा.सौ.मंगल मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करणेत आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी अध्यक्षीय भाषण करताना विद्यार्थ्यांनी केवळ महापुरुषाच्या  जयंत्या व पुण्यतिथ्या साजऱ्या न करता अशा उपक्रमातून महापुरुषांच्या  विचारांचे अनुकरण करावे..."असा बहुमोल संदेश त्यांनी दिला.


त्यानंतर भाषण स्पर्धेचे उदघाटन कवेत आले भाषण स्पर्धेत जवळपास 30 विद्यार्थ्यांनी भाग घेतला.त्यात मुलांनी मराठी इंग्रजी हिंदी आदी भाषांतून आपले भाषण सादर केले.त्यात यशराज घाडगे,संध्या चौगले,दिशा कांबळे,आदिती बिरंजे,प्रणव शिंदे,अस्मिता लोंढे,केदार चौगले,निखिल सुतार,जान्हवी कोरवी,वेदांतीका पाटील,कादंबरी चौगुले,चिन्मय पोवार,समर्थ कांबळे,तनिष्का पाटील,हेमंत कोरवी,आशिषा गायकवाड, निशिका शिंदे,ऋतुराज कोरवी,स्मृती चौगुले,प्रतिभा कोरवी,रसिका माळी, मृणाली दाभाडे, बापू गाढवे,अनुष्का साठे आदी मुलांनी आपली दर्जेदार भाषणे सादर केली. त्यात लहान गटात कादंबरी चौगुले हिने तर मोठ्या गटात मयुरी कांबळे यांनी प्रथम क्रमांक पटकावले.


       यावेळी मुख्याध्यापक अजितकुमार पाटील, शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्षा प्राजक्ता शिंदे ,उपाध्यक्षा पल्लवी पाटील व सदस्य, जेष्ठ शिक्षक सुशील जाधव,सुजाता आवटी,उत्तम कुंभार,शिवशंभू गाटे सर ,सेवक हेमंतकुमार पाटोळे ,मंगल मोरे व इतर शिक्षक महिला पालक व आजी माजी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित  होत्या.


या वेळी मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी " छोटी बालके हीच खरी देशाची व समाजाची संपत्ती आहे.

'मुलीचे व बालकांचे शिक्षण हेच खरे प्रगतीचे लक्षण' 

 ह्या घोषणेचा जयघोष करून प्रगतीचा मूलमंत्र दिला व कार्यक्रमाची सांगता झाली.

Thursday, 2 August 2018

स्व. मोहम्मद रफींना गाण्यांच्या माध्यमातून आदरांजली

कोल्हापूर प्रतिनिधी.


दिनांक 31 जुलै 2018 रोजी सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी याचा 38 वा स्मृती दिन होता . यानिमित्ताने त्यांच्याच गाण्यांच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली. स्वरविलास मंच कसबा बावडा यांचे वतीने रफींच्या बहारदार गाण्याच्या सादरीकरणातुन वैशिष्टय़पूर्ण गानस्वरांजली अर्पण करण्यात आली . हा कार्यक्रम मा. मोहन सालपे (पापा) नगरसेवक को.म.न.पा.  यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.


गायक सर्वश्री विलास पोवार, राजू, सावंत, भिकू कांबळे , सौ. सारिका यांनी रफींची लोकप्रिय गाणी गायली. तर श्री आदित्य म्हैंदरगीकर यांनी बहारदार निवेदन केले.


श्री. अमर कोलेकर यांनी ध्वनी संयोजनाचे काम पाहिले. रसिक चाहत्यांंनी सर्वच गाण्यांना भरभरून दाद दिली.

श्री. दिपक अष्टेकर श्री. अशोक गुंडप, धरनेंद्र टिक्के साहेब , श्री. सर्जेराव सोनवणे आदींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यास विशेष परिश्रम घेतले.

वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सरकार विरोधात टाळ मोर्चा 

वाळवा.अजय अहीर 


 इस्लामपूर येथे तहसील कार्यालयसमोर वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  सरकारच्या विरोधात टाळ मोर्चा काढण्यात आला.महाराष्ट्रामध्ये 58 मोर्चे  काढले पण अजूनही सरकारला जाग आली नाही अजूनही समाजाला मराठा आरक्षण मिळाले नाही.व धनगर आरक्षण, मुस्लीम आरक्षण मिळावे यासाठी मोर्चा काढण्यात आला. आजची तरुण पिढी व मुले हे बेरोजगार झाली आहेत . गुन्हेगारीकडे वळाली आहेत.मुलांना काम मिळाले पाहिजे. आत्महत्या करत आहे.   अशा विविध विषयांवर  महिला  राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने  सरकारचे  जाहीर निषेध करण्यात आला.

लोक शाहिर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन.


    माजगांव प्रतिनिधी:—दि.१/८/२०१८

कन्या विद्यामंदिर पोर्ले/ठाणे ता. पन्हाळा जि.कोल्हापूर शाळेमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व ध्यैयवादी व्यक्तिमत्व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्य अभिवादन करण्यात आले.

      लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यामध्ये वाटेगाव या गावी १ आॅगस्ट १९२० साली झाला.ते एक समाजसुधारक होते.कविता आणि लेखनाच्या माध्यमातून त्यांनी समाजसुधारणा केली.असे मत शाळेचे अध्यापक नामदेव पोवार सर यांनी मांडले. 


       लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे जिवन एक दिव्य होते.शेवट पर्यत त्यांचे शरीर थकले होते परंतु त्यांचा व्याख्यानांचा कार्यक्रम सुरू असायचा.असे कदम सर यांनी सांगीतले

      यावेळी शाळेतील विद्यार्थिनी प्रतिक्षा पाटील,दिक्षा कांबळे, अस्था भुयेकर, सारिका मालेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेतील मंत्रीमंडळातील सांस्कृतीक मंत्री सृष्ठी काशीद हिने आभार मानले.या वेळी मुख्याध्यापक चौगुले सर,पदवीधर अध्यापक मांडवकर सर,अध्यापक जाधव सर,पोवार सर,बाजीराव कदम सर,कृष्णात कोरे सर उपस्थित होते.