Wednesday, 26 September 2018

हेरले येथे चोरी मध्ये दहा तोळे सोने, पंधरा हजार रोकडीसहित दोन दुचाकी वर चोरटय़ांचा डल्ला

हेरले / प्रतिनिधी दि.२५ / ९/१८


सलीम खतीब

हेरले ( ता. हातकणंगले) येथील बबन भाऊ कदम 

माळभाग चर्चच्या नजीक यांच्या घरात सोमवार मध्य रात्री चोरी झाली .चोरट्यांनी दोन दूचाकीसह 

 दहा तोळे सोने व रोकड पंधरा हजार रुपये लंपास केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

        घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बबन भाऊ कदम हे सेवानिवृत्त कर्मचारी शेती करतात. ते पत्नी मुलगा रोहित आदी तीन कुटुंब सदस्य माळ भाग चर्चच्या पाठिमागे वास्तव्य करतात. सोमवारी रात्री हे झोपी गेले असता दोनच्या सुमारास चोरांनी प्रथमतः गेटचे कुलूप तोडून घराच्या मुख्य दरवाज्याची कढी खिडकीतून काठीला मोळा बांधून त्याच्या साह्याने काढून घरात प्रवेश केला. घरातील तिजोरी जवळच तीघे झोपले होते. तिजोरी उघडून दहातोळे सोन्याचे दागिने, पंधरा हजार रुपये रोकड व स्पेलंडर दुचाकी क्र(MH-09AR-6973) क्र. (MH-09CF4065) या चोरून पोबारा केला. घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. चोरांनी घरातील दहयाचा डबा व छोटी पाण्याची घागर घेऊन घरापासून अंदाजे दोनशे मिटरवर दहयाचा आस्वाद घेत पर्स व इतर साहित्याची तपासणी करून त्या वस्तू तिथेच टाकून निघून गेले.

           पहाटे घरातील सर्वाना जाग आल्यानंतर घरात चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. तात्काळ हातकणंगले पोलीस ठाण्यास चोरीची वर्दी बबन कदम यांनी दिली. सकाळी हातकणंगले पोलीस घटना स्थळावर दाखल होऊन घडलेल्या चोरीच्या तपासाच्या अनुषंगाने घरातील स्थिती पाहून पंचनामा केला. चोरांचा माग काढण्यासाठी श्वान पथकाला पाचारण केले होते. घरापासून दोन तीनशे मिटरपर्यंत माग काढून कोल्हापूर सांगली मार्गालगत पर्यंत जाऊन श्वान घुटमळ्ले.मध्यवस्तीत धाडसी चोरीच्या प्रकाराने गावामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हेरले गावात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून त्याच बरोबर घरातील धाडसी चोरीचा प्रकार घडल्याने चोरटयांना जेरबंद करण्याचे आव्हान हातकणंगले पोलींसा समोर उभे ठाकले आहे. या घटनेची नोंद हातकणंगले पोलीसात झाली असून पोलीस निरीक्षक सिताराम डुबल अधिक तपास करीत आहेत.

       फोटो 

हेरले ( ता. हातकणंगले) येथील बबन कदम यांच्या घरातील फोडलेली तिजोरी

कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने जिल्हा परिषद सीईओ अमन मित्तल यांची भेट घेऊन विविध समस्यांवर चर्चा

हेरले / प्रतिनिधी दि. २६/९/१८


   कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने  कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची भेट घेऊन माध्यमिक शाळांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात चर्चा करण्यात आली.

     माध्यमिक शाळांच्या कडे प्राथमिक चे ही वर्ग असल्याने 14 व्या वित्त आयोगातून माध्यमिक शाळांना निधी उपलब्ध करून द्यावा त्याचबरोबर जिल्हा परिषदेकडून प्राथमिक शिक्षकांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारा प्रमाणे माध्यमिक शिक्षकांना ही पुरस्कार देण्यात यावेत आणि माध्यमिक शाळांना ही ई लर्निंग सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, माध्यमिक शिक्षण विभागामध्ये अपुरे मनुष्यबळ असल्याने शाळांना विविध समस्यांना सामोरे लागत आहे याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली.

यावर बोलताना अमन  मित्तल यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन माध्यमिक विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याचे तसेच  शाळांची संख्या जास्त असल्याने समस्या उद्भवत असल्याचे मान्य करून याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा चालू असल्याचे सांगितले. 

       तसेच शिक्षकांना जिल्हा पुरस्काराबाबत आपण सकारात्मक असल्याचे सांगितले. माध्यमिक शाळांना सीएसआर फंडातून ई लर्निंग च्या सुविधा उपलब्ध करून देणे शक्य असल्याचेही  सांगितले.14 वित्त आयोगाचे निधीबाबत त्याचा शासन निर्णय पाहून पाहून तशा सूचना संबंधित  जातील असे सांगितले.  मित्तल साहेब यांनी माध्यमिक विभागाच्या शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद देऊन आपण या मागण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.

शिस्तमंडळाने  या प्रश्नासंबंधी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अमरीश घाडगे यांचीही  त्यांच्या दालनात भेट घेऊन चर्चा केली त्यावर सभापतींनी यावर  लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितले 

   या शिस्टमंडळामध्ये कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व्ही जी पवार कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष डॉक्टर एम पाटील संचालक बी बी, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व्ही जी पवार, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक  संघाचे माजी अध्यक्ष के बी पवार, जी बी खांडेकर, प्रतापराव देशमुख, कागल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शिवाजीराव चौगुले, मुख्याध्यापक संघाचे माजी सदस्य ए आर पाटील , संभाजीराव पाटील उपस्थित होते

      फोटो 

मुख्य कार्यकारी डॉ. अमन मित्तल यांच्या सोबत शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी. लाड व इतर पदाधिकारी.

मौजे वडगाव येथे बिरदेवाची प्राण प्रतिष्ठापणा संपन्न



हेरले / प्रतिनिधी दि. २२/९/१८

           मौजे वडगाव येथे गावचे जागृत देवस्थान श्री बिरदेव देवाची मुर्ति प्राणप्रतिष्ठा पणा कार्यक्रम  ग्रामस्थ व भाविक भक्तांच्या उपस्थितीत मोठया आनंद व उत्साहपुर्ण वातावरणात पार पडला गुरुवारी सायंकाळी निरंजन मठातून धनगरी ढोल, कैताळ, व भंडाऱ्याच्या साक्षीने ' बिरोबाच्या नावानं चांगभलं ' च्या गजरात गावातील महिला कलश घेऊन बिरोबा देवाच्या मुर्तिची मोठया उत्साहपुर्ण वातावरणात गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

       शुकवारी स .०६ .३० मि पुजा व मुर्ति - प्राणप्रतिष्ठा विधी श्री बाळूमामा संतुबाई देवालय रूकडी माणगांवचे विश्वस्त देवाजी मामा हेरवाडकर यांच्या अमृत हस्ते व गावचे पुरोहित  प्रसाद महालिंग स्वामीजी यांच्या मंत्र वेदघोषात मुर्तिवर संस्कार विधी संपन्न झाला. तर सुहास जंगम', महेश स्वामीजी ' शुभोलिंग स्वामी यांनी पुरोहित केले तसेच मुर्तिदान व गाभाऱ्या चा फरशीचा संपुर्ण खर्च केलेले  बाळासो थोरवत ,लता थोरवत या दांपत्याना मुर्तिपुजनाचा व पुजेचा मान मिळाला

        यावेळी धनगर समाजाचे  जिल्हाध्यक्ष कल्लाप्पा गावडे ,उद्योगपती राजेश तांबवे,डॉ . विजयकुमार गोरड , बापूसो शेंडगे ' शशिकांत गोरड आनंदा गोरड', मारूती शेंडगे रघुनाथ गोरड , समाधान भेडेकर , रामचंद्र भेंडेकर धनाजी भेंडेकर ' बाबासो लांडगे ' तानाजी गोरड 'संजय शेंडगे ग्रा पं . सदस्य अवधूत मुसळे ' शिवसेनेचे सुरेश कांबरे ' कृष्णात गोरड ,यांच्यासह समस्त धनगर समाज व गावातील महिला बालवृध्द ' भकतगण , उपस्थित होते .

फोटो 

  बाळूमामा संतुबाई देवालय  विश्वस्त देवाजी मामा हेरवाडकर व भक्तगण अभिजित थोरवत

Tuesday, 18 September 2018

वाळवा परिसरात गणेश मुर्ती दान उपक्रम यशस्वी

वाळवा- प्रतिनिधी  अजय अहीर


प्रदुषण हटाव नदी बचाव असे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी क्रांतिसिह नाना पाटील महाविद्यालय यांच्या वतीने व  राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा गणेश मुर्ती दान हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. 


कृष्णा नदीचे पाणी दूषित होऊ नये म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. व वाळवा नागरिकांचा मुर्ती दानास मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आणि या उपक्रमाचा नागरिकांच्या कडून कौतुक होत आहे.  याप्रसंगी . डॉ. एच.जी.वालांडकर,    प्रा. आर. जे .पाटील, प्रा.सतीश चौगुले ,राष्ट्रीय सेवा योजनातील  विद्यार्थी -विद्याथीनी उपस्थित होते.

सलग 13 व्या वर्षी सिद्धनेर्ली येथे निर्माल्य व मुर्तिदान  उपक्रम यशस्वीपणे संपन्न

सिद्धनेर्ली( वार्ताहर) रविंद्र पाटील. 



समाज विकास केंद्र सिद्धनेर्ली संचलित स्वामी विवेकानंद अभ्यासिका व ग्रामपंचायत सिद्धनेर्ली यांच्या संयुक्त विद्यमाने सलग 13 व्या वर्षी नदीकिनारा व नदीघाट सिद्धनेर्ली येथे निर्माल्य व मुर्तिदान  उपक्रम राबवण्यात आला.यावेळी सुमारे 900 हून अधिक गणेश मुर्ती , 3 टन निर्माल्य ; शिवाय सार्वजनिक गणेश मूर्ती सुद्धा जमा करण्यात आल्या.या उपक्रमाला प्रियदर्शनी मोरे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी स्वछता), कार्यकारी अभियंता बुरुड़  , शबाना मोकाशी, निता पाटील (सरपंच ),उप सरपंच कबीर कांबळे, कॉम्रेड शिवाजी मगदूम,ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी तसेच स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे कार्यकर्ते उमेश मगदूम, सुरेश आगळे , अमित कांबळे, स्वागत कांबळे, विवेक पोतदार, अजिंक्य कांबळे, गणेश गोनुगडे, उपस्थित होते.

मुर्तीदान उपक्रमास माजगांवमध्ये उत्तम प्रतिसाद.


       माजगांव प्रतिनिधी:—दि.१७/०९/२०१८.

        पन्हाळा गडाच्या पायथ्याशी वसलेलं छोटस टुमदार गाव माजगांव ता.पन्हाळा जि.कोल्हापूर या गावामध्ये पाच सहा वर्षापुर्वी कांही युवक एकत्र येवून गावामध्ये सकारात्मक उपक्रम राबवायचे ठरवतात.आणि त्यांची चळवळ सुरू होते.कोणताही गटतट न मानता कोणीही बोलावण्याची वाट न बघता एकत्र येवून विधायक काम सुरू करतात.

निसर्ग वाचवुया चळवळीअंतर्गत गेली ताच ते सहा वर्षे हा गट गावकर्‍यांचे समुपदेशन करुन गणेश मुर्ती दान करण्याचे फायदे तोटे समजावून सांगतो आणि गावकरीही त्यांना प्रतिसाद देतात.या वर्षीही असाच उपक्रम राबविण्यात आला. साधारण ९५% गावकर्‍यांनी गणेश मुर्ती कासारी नदीमध्ये विसर्जीत न करता पाण्यामध्ये बुडवून  युवकांच्याकडे दान केल्या.तसेच निर्माल्य दोन ट्राॅल्या जमा झाले.हे सर्व निर्माल्य बिलवर टेकडीवरील दगडांच्या खनीमध्ये विसर्जीत करण्यात आले.आणि पाण्याचे होणारे प्रदुषण टाळले.

     

   

        या उपक्रमामध्ये जीवन पाटील सर,संजय पाटील,प्रवीन चौगले,बाजीराव कदम,डाॅ.सतीश चौगले,बाबासो चौगले सर,शरद पाटील सर,कृष्णात कांबळे,जयदिप पाटील,बारक्या चौगले,अमोल चौगले,प्रथमेष पाटील,साळवी सर व गावातील सर्व युवक उपस्थित होते. 

Friday, 14 September 2018

राजर्षी शाहू विद्यामंदिरमध्ये महिलापालकांसह मुलींनी धरला झिम्मा फुगडीचा फेर

** 




बुधवार ,दिनांक 12 सप्टेंबर 2018




कसबा बावडा: कसबा बावडा परिसरातील उपक्रमशील केंद्रशाळा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र.११ च्या वतीने महिला पालकांचा शाळेतील सहभाग व सम्पर्क वाढवा आणि शाळेतील मुलींना भारतीय परंपरेचे व संस्कृतीचे दर्शन व्हावे या उदात्त उद्देशाने शालेय परिसरामध्ये मुलींसाठी व महिलांसाठी गौरी गणपती आगमनाच्या पूर्वसंध्येला झिम्मा फुगडीचे आयोजन करण्यात आले होते. 


शाळेच्या विद्यार्थिनी व महिला पालक ‘गाठोडे’ असो की ‘झिम्मा फुगडी’ फेर धरून सामूहिक नृत्य करत होत्या. ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’, ‘पिंगा गं पोरी पिंगा’, ‘गोफ विणू बाई गोफ विणू’ यांसारखी गाणी गात होत्या. हे करतानाच भारतीय प्रथा परंपरांचे जतन आणि संवर्धन करण्याचाही सल्ला शाळेतील मुलींना देत म्हणत होत्या.... ‘आम्ही जपतो आपुला वारसा तुम्हीही जपा’...


       सदर विशेष उपक्रमाचे आयोजन शालेय प्रशासनाच्या विशेषतः महिला शिक्षकांच्या वतीने करणेत आले होते.सदर उपक्रमाच्या प्रमुख शाळेच्या जेष्ठ शिक्षिका सुजाता आवटी या होत्या.सदर उपक्रमांबद्दल शाळाव्यावस्थापन समिती अध्यक्षा प्राजक्ता शिंदे मॅडम म्हणाल्या,‘‘झिम्मा फुगडी हा खेळ वयाचे बंधन विसरायला लावतो. गाण्यांच्या शब्दांवर फेर धरताना मन प्रसन्न होते.’’ उपाध्यक्षा पल्लवी पाटील म्हणाल्या, की फुगडी खेळताना माहेरची आठवण आली, तर विद्यार्थीप्रिय शिक्षिका जयश्री सपाटे मॅडम यांनी खेळ खेळताना सकारात्मक ऊर्जा मिळाल्याचे सांगितले. विद्याचेतना मंचच्या अर्चना एकशिंगे यांनी या उपक्रमामुळे महिलांचा सामजिक संपर्क वाढतो असे सांगितले. महिलांच्या या विशेष उपक्रमाला शुभेच्छा देताना मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी ‘‘भारतीय संस्कृतीत विशिष्ट सणांसोबतच पारंपरिक खेळांची रचना केल्याने स्त्रियांना सामूहिक खेळ खेळता येतात. त्याचे जतन व्हायला पाहिजे.’’ असा संदेश दिला.


          या उपक्रमात संध्या चौगले,दिशा कांबळे,आदिती बिरंजे,निशिका शिंदे,अस्मिता लोंढे,अस्मिता चौगले, जान्हवी कोरवी,वेदांतीका पाटील,कादंबरी चौगुले,तनिष्का पाटील,कोरवी, आशिषा गायकवाड, निशिका शिंदे,स्मृती चौगुले,प्रतिभा कोरवी,रसिका माळी, मृणाली दाभाडेे,अनुष्का साठे आदी मुलांनी आपले गायन कौशल्य सादर करून उपस्थित महिलांची मने जिंकली.


       यावेळी मुख्याध्यापक अजितकुमार पाटील , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्राजक्ता शिंदे ,उपाध्यक्षा पल्लवी पाटील,वैशाली कोरवी,संगीता चौगले,व सदस्य, जेष्ठ शिक्षक उत्तम कुंभार,रमेश सुतार ,शिवशंभू गाटे सर ,आस्मा तांबोळी,सेवक हेमंतकुमार पाटोळे ,मंगल मोरे व इतर  महिला शिक्षिका पालक व आजी माजी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे संयोजन सुजाता आवटी यांनी केले.

Thursday, 13 September 2018

आजचा बालक देशाचा भावी आधारस्तंभ —पोमण्णावर.


         माजगांव प्रतिनिधी.—दि.११/०९/२०१८.

        एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प,पन्हाळा याच्यामार्फत पोर्ले/ठाणे ता.पन्हाळा जि.कोल्हापूर येथे"सकस आहार सप्ताह"अंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम घेणेत आले.यामध्ये दि.०१/०९/२०१८ई रोजी गावातुन  मुलांची प्रभात फेरी काढून गावामध्ये जनजागृती करणेत आली.दि.०२/०९/२०१८ई.रोजी परिसरातील सर्व अंगणवाडी मार्फत महिला सभा घेणेत आली.प्रमुख पाहुने गणपती मांडवकर यांनी महिलांनी सक्षम कसे व्हावे याविषयी मार्गदर्शन केले.

        आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तंदुरस्त राहावयाचे असेल तर आपला आहार सकस असणे महत्वाचे.उत्कृष्ट पोषण आहार स्पर्धा दि.०३/०९/२०१८ई.रोजी घेणेत आली.यामध्ये 'टी एच आर' पासून गरोदर स्तनदा माता(६महिने ते ३वर्षे) लाभार्थिंनी वेगवेगळे पदार्थ करुन आणले.

        दि.०४/०९/२०१८ई रोजी प्रमुख पाहुण्या प्रज्ञा पाटील यांनी किशोर वयीन मुली भावी माता असलेने त्यांनी सकस आहार घेतलाच पाहिजे असे सांगितले.दि.०५/०९/२०१८रोजी सदृढ बाल स्पर्धा घेणेत आली.प्रमुख पाहुने सागर उबाळे यांनी सदृढ बालकाचे महत्व पटववून दिले.

     दि.०६/०९/२०१८ई. रोजी पन्हाळा प्रकल्प अधिकारी पोमण्णावर मॅडम म्हणाल्या की,आईच्या दुधाची किंमत कोणत्याच'फार्म्युला'शी होवू शकत नाही.मातेच्या दुधामध्ये सर्व पोषण मुल्ये आणि बाहेरच्या संसर्गाच्या रोगप्रतिकारक शक्ती तयार करण्यासाठी 'अॅन्टीबाॅडीज'असतात.बाळ मानसिक व आरोग्यदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मातेच्या दुधाला अनन्यसाधारण महत्व आहे.दळवी मॅडम यांनी वृध्दीआलेखावर मातांच्या समोर बालकांची वजने घेवून पडताळणी केली.

       अशाप्रकारे दि.०७/०९/२०१८ई.रोजी पोर्ले/ठाणे चे सरपंच प्रकाश जाधव याच्या हस्ते बक्षिस वितरण करणेत आले.या कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी विजय पाटील,ग्रामपंचायत सदस्य,अंगणवाडी सेविका,मदतनीस व शालेय मुली उपस्थित  होत्या.

Tuesday, 11 September 2018

कर्मचारी सोसायटी जिल्ह्यात आदर्श — बजरंग लगारे

माजगांव प्रतिनिधी:—दि.१०/०९/२०१८.

       कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी लि.कोल्हापूर.च्या चेअरमन पदी आर.डी.पाटील.तालुकास्तरीय अधिकारी केडर.पं स चंदगड.यांची व व्हा.चेअरमन पदी शांताराम विठ्ठल माने.बांधकाम विभाग केडर. ता.गडहिंग्लज.यांची निवड झालेबद्दल कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅक लि. कोल्हापूर.चे माजी चेअरमन बजरंग गुंडाप्पा लगारे यांचे मार्फत जाहीर सत्कार करणेत आला.

     बॅक आणि कर्मचारी यांच नात नाजूक असत.आणि या नाजूक नात्यावरच बॅकेची प्रगती अवलंबुन असते.असे मत  बजरंग लगारे यांनी मांडले.

      जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीने सभासद कर्ज मर्यादा २०,००,०००/—लाख रुपये व त्यावर व्याजदर 11.5% एवढा कमी ठेवून जिल्ह्यामध्ये नवीन आदर्श घालून दिला आहे.असे कुबेर चौगुले यांनी सांगीतले.

       आभार संस्थेचे व्यवस्थापक विजयकुमार निवृत्ती बोरगे यांनी मानले.याप्रसंगी संस्थेच्या संचालिका गौरी पाटील,रंजना आडके,संचालक रामदास पाटील,बाजीराव पाटील,बाजीराव कदम,तात्या पाटील,युवराज कुंभार,निलेश रानभरे ई.उपस्थित होते.

आयुष्यभर प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे पवित्र काम करणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक, राज्य शिक्षक सेना यांच्याकडून शिक्षकांचा सन्मान !

प्रतिनिधी कोल्हापूर .

 महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना यांच्याकडून शिक्षकांचे अभिनंदन  .. 

.आयुष्यभर प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे पवित्र काम करणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक.

अशा गुणवंत गुरुवर्य  शिक्षकांचा सत्कार हा झाला पाहिजे , महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ( कोल्हापूर जिल्हा ) या महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेकडून कोल्हापूर जिल्यातील  सातत्याने शिक्षकांच्या समस्या सोडवण्याचे काम केले जात आहे त्याबरोबरच  शिक्षकांचा सन्मान ही केला जातो . 


यावर्षी श्री दिपक शेटे सर (यांना रोटरी क्लब व चाटे शिक्षण समुह कोल्हापूर यांचा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार , श्री प्रविण कांबळे  सर ( मुख्याध्यापक ) यांना आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार , श्री आर .एस .आळतेकर सर (मुख्याध्यापक ) आदर्श शिक्षक पुरस्कार , सौ . दिपाली बंडगर ( राजमाने ) मॅडम यांना श्री भास्कराचार्य प्रतिष्ठान व जायंटस ग्रुफ ऑफ इंचलकरंजी यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला याबद्दल शिक्षक सेनेच्या वतीने अभिनंदन  करण्यात आले , यासाठी कोल्हापूर जिल्हा शिक्षक सेनेचे जिल्हा कोषा अध्यक्ष श्री प्रमोद कांबळे सर , जिल्हा उपाध्यक्ष श्री सतिश लोहार सर , सरचिटणीस  स्वप्नील पाटील सर , इंचलकरंजी शहर अध्यक्ष श्री गजानन लवटे सर , शहर उपाध्यक्ष श्री राहुल रजपुत सर , सचिव श्री सुनिल राजमाने सर , जिल्हा कमिटी सदस्य श्री चंद्रकांत कोळेकर सर हे उपस्थित होते  यांनी कोल्हापूर जिल्हा शिक्षक सेना यांचे वतीने  अभिनंदन केले,   या गौरव सोहळ्याला शहापुर पोलीस ठाणे चे पोलीस अधिकारी श्री रियाज मुजावर साहेब  ही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यांनाही ही शुभेच्छा देण्यात आल्या ..




Sunday, 9 September 2018

दिव्यांगतेवर मात करत गाठले यशाचे शिखर.


      माजगांव प्रतिनिधी:—दि.०८/०९/२०१८

       विद्या मंदिर घोटवडे ता.पन्हाळा जि.कोल्हापूर.शाळेचे अध्यापक शंकर बापू जाधव मुळ गाव उत्रे ता.पन्हाळा जि.कोल्हापूर.यांचा जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या मार्फत दिला जाणारा सन २०१८ सालातील विशेष आदर्श शिक्षक पुरस्कार  मिळाला याबद्दल त्यांचा शिक्षक संघ पन्हाळा शाखा व दिव्यांग शिक्षक संघटना पन्हाळा.यांच्या वतीने जाहीर सत्कार करणेत आला.

     

   शंकर जाधव सरांनी आपल्या नोकरीच्या कालावधीमध्ये स्वत: दिव्यांग असुनही एखाद्या सर्व दृष्टीने तंदुरुस्त असणार्‍या व्यक्तिलाही लाजवेल असे काम केले.या कामाची पोहोच त्यांना पुरस्काराच्या रुपाने मिळाली.असे मत राजर्षी शाहू पतसंस्था .कोडोली ता.पन्हाळा चे संचालक दिगंबर शिंगे यांनी मांडले.काम करताना त्यांचा उत्साह वाखाणन्यासारखा असतो.असे कन्या विद्या मंदिर पोर्ले/ठाणे शाळेचे अध्यापक नामदेव पोवार म्हणाले.आभार पन्हाळा तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष सुनील मोरे यांनी मानले.

        कार्यक्रमाला संघटनेचे उपनेते विलास मोरबाळे,दिव्यांग शिक्षक संघटनेचे सुभाष शिंगाडे,शिक्षक संघाचे विष्णु मोहिते,रविद्र माने इत्यादी उपस्थित होते.

Thursday, 6 September 2018

मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी कोगे ग्रामस्थांची धडपड

  1. .

      माजगांव प्रतिनिधी:—

       सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये आपली मुले कोणत्याही बाबतीत मागे राहू नयेत यासाठी धडपड करणारा कोगे ग्रामस्थांनी कुमार व कन्या विद्या मंदिर पोर्ले/ठाणे ता.पन्हाळा.जि.कोल्हापूर  या जिल्हा परिषदेच्या शाळेला आज दि.०६/०९/२०१८इ रोजी सदिच्छा भेट दिली.या वेळी कन्या शाळेचे मुख्याध्यापक डी.एस. चौगुले यांनी स्वागत केले.

      त्यांनी शाळेची इमारत,मैदान,हॅन्डवाॅश स्टेशन,रंगरंगोटी,वर्गसजावट,आॅफीस रचना,ई लर्निंग सुविधा यांची सखोल माहिती घेऊन शिक्षकांशी चर्चा केली.तसेच शाळेत मुलांच्या कडून घेतल्या जाणार्‍या विविध उपक्रमांची माहिती घेतली व मुलांचे कौतुक करुन त्यांना खाऊचे वाटप केले.यावेळी यशवंत बॅकेचे संचालक उत्तम पाटील यांनी शालेय परिसर,शालेय इमारत रचना व शालेय उपक्रमांची प्रसंशा केली.

       या शिष्टमंडळामध्ये यशवंत बॅकेचे संचालक उत्तम पाटील,तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष महादेव पाटील,विलास पाटील,बापु संतु पाटील,राजाराम मांगोरे,विष्णु इंगवले,नायकू पाटील,अर्जुन पाटील,भिवाजी पाटील,मारुती निकम इ ग्रामस्थ होते.

        यावेळी कुमार शाळेचे मुख्याध्यापक सी.डी.सावंत सर यांनी आभार मानले.याप्रसांगी दोन्ही शाळेचा शिक्षक वृंद उपस्थित होता.

Wednesday, 5 September 2018

 म्हैस खरेदीसाठी गोकुळतर्फे वीस हजारांचे अनुदान - विश्वासराव पाटील

हेरले / प्रतिनिधी दि. ४/९/१८


म्हैस दुध वाढविण्यासाठी संघाने एक धोरण निश्चित केले आहे. याचा प्राथमिक दूध संस्था व सभासदांनी लाभ घ्यावा व म्हैस दुधाची वाढ करावी. असे आवाहन कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ( गोकुळचे) चेअरमन विश्वासराव पाटील यांनी केले. ते हातकणंगले तालुका संपर्क सभेत बोलत होते. 

ते पुढे म्हणाले, म्हैस दुधाचे घटते प्रमाण, गाय दूधाचे वाढलेले प्रमाण व जागतिक बाजार पेठेतील पावडरचे कमी झालेले दर . यामुळे संघास अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संघाच्या संचालक मंडळाने म्हैस दूध वाढीसाठी धोरण जाहीर केले आहे. जातिवंत म्हैस खरेदीसाठी  हरियाणा व पंजाब येथील म्हैस खरेदी केल्यास वीस हजार व गुजरातसाठी पंधरा हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. तसेच वासरू संगोपनासाठीही भरीव अनुदान जाहीर केले आहे. तरी याचा संस्था व उत्पादक यांनी लाभ घ्यावा असे सांगितले.

मल्टीअँक्ट बाबत बोलताना श्री. पाटील यांनी सन २०२० पर्यंत संघाने वीस लाख लिटर दूध संकलन करण्याचा संकल्प केला आहे. सध्या बारा लाख लिटर इतके संकलन होत आहे. पण भविष्यात कोल्हापूर जिल्ह्यात हे प्रमाण अधिक होईल असे वाटत नाही. तो टप्पा पूर्ण करण्यासाठी मल्टीअँक्ट शिवाय पर्याय नाही. त्यामुळे संघाच्या वार्षिक सभेत पाठिंबा द्यावा व सहकार्य करावे असे आवाहन केले.

यावेळी संकलन, पशुखाद्य ,  वित्त, पशुवैद्यकीय, मिल्कोटेस्टर, वैरण विकास, संगणक, गुण नियंत्रण व दूधबिल आदी विभागवार सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच तालुका स्तरीय बक्षीस पात्र म्हैस जास्तीत जास्त दूध पुरवठा,, उत्तम प्रत व महिला संस्था यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

    या सभेस जेष्ठ संचालक अरुण नरके, रविंद्र आपटे, दिपक पाटील, धैर्यशील देसाई, रामराज कुपेकर, कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर, शरद तुरंबेकर, आर.सी. शहा, यु. व्ही. मोगले, एच.एम.कापडीया,डि.एच.शियेकर, भरत मोळे, दत्तात्रय वागरे, एस.पी. समुद्रे, विश्वासराव इंगवले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक संचालक विश्वास जाधव यांनी केले. आभार संचालक पी.डी. धुंदरे यांनी मानले.

       फोटो 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या वतीने आयोजित संपर्क सभेची सुरूवात दिपप्रज्वलनाने करताना चेअरमन विश्वासराव  पाटील, सोबत रवींद्र आपटे, विश्वास जाधव, डी.व्ही. घाणेकर आदी.

क्रांतिसिह नाना पाटील कॉलेज वाळवा येथे शिक्षक दिन साजरा 

वाळवा - अजय अहीर 


क्रांतिसिह नाना पाटील कॉलेज वाळवा येथे आर्ट्स शाखेचा शिक्षक दिन साजरा करण्यात आला.प्रतिमा पूजन एक दिवसीय प्राचार्य साईनाथ सुर्यवंशी व प्रा.बी .एस. माळी, प्रा.राजा माळगी यांच्या हस्ते करण्यात आले. नीलम चव्हाण यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.सर्व  प्राध्यापक शिक्षक यांचा सत्कार विध्यार्थी व विद्यार्थ्यांनि यांनी केला. तर एक दिवसीय झालेले सर्व  शिक्षक यांचा सत्कार प्रा.बी.एस. माळी यांनी केला.त्यानंतर विद्यार्थी  शिक्षकानी  मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष- प्रा.बी. एस. माळी होते.स्वप्नील पाटील यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी सर्व प्राध्यापक, विद्यार्थी शिक्षक , विद्यार्थी - विद्यार्थीनी उपस्थित होते.शुभम कदम यांनी आभार मानले.

Tuesday, 4 September 2018

औचित्य वाढदिवसाचे वसा प्रदूषण मुक्तीचा.


     माजगांव प्रतिनिधी:—

      दि.०४/०९/२०१८

  हनुमान तरुण मंडळ शैक्षणिक व्यासपीठ वडणगे,ता.करवीर साद माणुसकीची या शैक्षणिक,सामाजिक चळवळीच्या माध्यमातून शिक्षकांप्रती व्यक्त झालेल्या विचारांनी प्रभावित होवून सामाजिक जाणीव जपण्याचा इवलासा प्रयास गेली अनेक वर्षे साद माणुसकीची व्यासपीठ करत आहे.

     

    सुनील विलास अस्वले सरांचा वाढदिवस निमित्तमात्र मानुन आज पर्यावरण रक्षणाच्या जाणीवेतून त्यांच्या सर्व सहकारी गुरुवर्य बंधु भगीनींना कापडी पिशव्यांचे वाटप केले.

      हनुमान तरुण मंडळ शैक्षणिक व्यासपीठ वडणगे च्या माध्यमातून गेली अनेक वर्षे हुषार तसेच बिकट परिस्थितीत असणार्‍या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप,जेष्ठ नागरीक सात्कार मार्गदर्शन,विद्यार्थी करीयर मार्गदर्शन सत्कार,महिलांसाठी प्रबोधनात्मक व्याख्यान,विद्यार्थी दत्तक,वृक्षारोपण व वृक्ष संर्वधन  तसेच कापडी पिशव्यांचे वाटप असे अनेक विधायक उपक्रम अंमलात आणले आहेत.

       आज सरांचा वाढदिवस निमित्त ठरवून त्यांच्या कर्मभुमीत कापडी पिशव्यांचे वाटप करुन पर्यावरण संरक्षण कामी इवलेसे कार्य संपन्न करण्याचा प्रयास केला.

    

   या कार्यक्रम प्रसंगी कन्या वि.मं.पोर्ले/ठाणे ता.पन्हाळा जि.कोल्हापूर  शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांनी शुभेच्छा दिल्या.

      या कार्यक्रमाला मुख्याध्यापक डी.एस.चौगुले सर,गणपती मांडवकर सर,नामदेव पोवार सर,काशिराम जाधव सर,प्रकाश पोवार सर,बाजीराव कदम सर,कौरे सर उपस्थित होते.

हेरलेतील आपत्तीग्रस्त काटकर कुटुंबांला हवा आहे आर्थिक मदतीचा हात. अतिवृष्टीने हिरावून घेतले रोटी कपडा और मकान

हातकणंगले / प्रतिनिधी दि. ३/९/१८


    सलीम खतीब


    हेरले ( ता. हातकणंगले) येथील रविंद्र काटकर रिक्षाचालकाच्या घराची भिंत अतिवृष्टीने १६ जुलैच्या पहाटे पडून पत्नी अनिता काटकर मृत झाल्या. तर त्यांच्यासह मुलगा व मुलगी गंभीर जखमी झाले होते. ही आपत्ती घडून दोन महिने होत आहेत तरी शासन स्तरावर व लोकप्रतिनीधी यांच्या कडून कोणतीही मदत न झाल्याने काटकर कुटुंब उघड्यावर पडले आहे. रविंद्र काटकार पाठीच्या कण्याच्या आजाराने उपचारा अभावी झोपून असल्याने त्यांना महिन्यास उपचारासाठी दहा हजारावर खर्च आहे.कोणाला तरी प्रेमाचा उम्हाळा फुटेल का ?या कुटूंबास आर्थिक मदतीचा हात देईल का ?असा सवाल नागरिकातून उमटत आहे.

             

            १६ जुलै च्या पहाटेअतिवृष्टीने घराची भिंत पडल्याने रविंद्र काटकर गंभीर जखमी झाले. तर अनिता पत्नी मृत झाल्या. अनिकेत व शिवानी हे दोघेही मुले जखमी झाली होती.ते उपचारानंतर बरे झाले. मात्र रविंद्र यांच्या पाठीस मोठी दुखापत झाल्याने त्यांना उठता बसता येत नाही. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणेसाठी मोठा खर्च असल्याने शस्त्रक्रियाविना ते अंथरुणावर झोपून आहेत. त्यांना प्रती महिन्यास दहा हजार रुपये औषधोपचारास खर्च होत आहेत. त्यांचे बंधू अनिल काटकर हे रिक्षाचालकाचे काम करून बंधू व दोन पुतण्यांचा खर्च आपल्या कुटुंबासह पाहत आहेत. मात्र ते अशक्य होत आहे. काटकर कुटुंबाचे घर पडल्याने त्यांना भावाच्या छोट्या घरात वास्तव्य करावे लागत असल्याने ते बेघर झाले आहेत.

     

  काटकर कुटुंब बेघर झाले आहे मात्र शासनाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व इतर प्रतिष्ठीत मान्यवर आदींच्या विस्मरनाने त्यांना कोणाचीही आर्थिक मदत अथवा इतर मदत मिळाली नसल्याने संसार उघड्यावर आला आहे. प्रापंचिक साहित्य, कपडेलत्ता इतर जीवनोपयोगी सर्व साहित्याची नासधूस झाल्याने रोटी कपडा मकान सर्वच निसर्गाने हिसकाूवून घेतल्याने त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. कर्ता माणूस भिंत अंगावर पडल्याने गंभीर दुखापतीने झोपून व मुले शिक्षणात त्यामुळे आर्थिक स्त्रोत नसल्याने त्यांना  जीवन व्यथीत करणे अवघड झाल्याने आर्थिक मदतीची गरज आहे. 

     खासदार, आमदार, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, ग्रामपंचायत, सेवाभावी संस्था, सहकारी संस्था, तरुण मंडळे , व्यापारी, व्यावसाईक, उदयोगपती आदींनी आर्थिक मदतीचे सहकार्य करावे. अनिकेत रविंद्र काटकर याच्या बॅक ऑफ इंडिया खाते क्रमांक  091010510001551या खात्यावर यथाशक्ती मदत करून त्यांच्या कुटुंबास आधार दयावा असे आवाहन अनिल काटकर यांनी केले आहे.

       फोटो 

हेरले येथील रविंद्र काटकर यांचे अतिवृष्टीने पडले घर

Saturday, 1 September 2018

दोन वर्षे रखडलेले वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण तात्काळ घ्या. स्वाभिमानी शिक्षक संघlची मागणी.


    कोल्हापूर / प्रतिनिधी

        मिलींद बारवडे दि. १/९/१८


     कोल्हापूर जिल्ह्यातील १२ वर्षे व२४ वर्षे  सेवा कालावधी पूर्ण करणाऱ्या वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीस पात्र असणाऱ्या माध्यमिक शिक्षकांचे दहा दिवसाचे प्रशिक्षण शिक्षण विभागाने या साली तात्काळ आयोजित करावे अशी  मागणी स्वाभिमानी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक सेवाभावी संघाच्या वतीने  संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे व संघाचे शिष्टमंडळ जिल्हा शैक्षणिक व प्रशिक्षण विभागाचे  प्राचार्य डॉ.आय.सी. शेख यांच्याकडे  लेखी निवेदनाद्वारे  केली आहे.

     कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळातील शिक्षकांचे १२ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ श्रेणीसाठी व २४ वर्ष पूर्ण झालेल्या व पदवीत्तर अहर्ता प्राप्त करणाऱ्या शिक्षकांसाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून   दहा दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण करणेसाठी प्रशिक्षण आयोजित केले जाते. ते प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी   शिक्षकांना ज्या त्या शाळांचे संस्थाचालक संस्था पातळीवर त्या शिक्षकांना चोविस आणि   बारा वर्षे पूर्ण झाल्याचा ठराव देऊन  शाळेकडून  शिक्षण विभागाकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवतात .

        मात्र शिक्षण विभागाकडून गेली दोन वर्षे वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीचे प्रशिक्षणच  आयोजित केलेले नाही. यामुळे या श्रेणीसाठी पात्र असणारे  शिक्षक या वेतनश्रेणीपासून वंचित राहत आहेत . प्रशिक्षण न झालेमुळे संस्था पातळीवर संबधीत शिक्षकांचे नावे निवड श्रेणीसाठी पात्र म्हणून ठराव देता येत नाही.  निवड श्रेणीसाठी २५ ते २८ वर्षे पूर्ण होऊनही  प्रशिक्षण न झालेने  अनेक शिक्षकांना वेतन श्रेणीचा लाभ मिळू शकलेला नाही . तसेच १२  वर्षे पूर्ण होऊन वरिष्ठ श्रेणीचे प्रशिक्षण न झालेने संबधीत शिक्षकांना वरिष्ठ श्रेणीची मान्यता शिक्षण विभागाला  देता आलेली नाही .

     निवड श्रेणी प्राप्त शिक्षकांचा पगार मुख्याध्यापक पगाराशी समतूल्य होतो. मुख्याध्यापक न होता ही वेतनश्रेणीचा लाभ होतो म्हणून  पात्र शिक्षकांना निवडश्रेणी मिळणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी  शिक्षण विभागाने वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण आयोजित करून पात्र शिक्षकांना न्याय दयावा अशी मागणी करीत आहोत. या मागणीचे संघटनेचे  लेखी निवेदन राज्य शासनाच्या  शिक्षण विभागाच्या बोर्ड विभाग,माध्यमिक शिक्षणाधिकारी, उपसंचालक शिक्षण विभाग कोल्हापूर, शिक्षण आयुक्त पुणे , शिक्षण सचिव मुंबई विभागाकडे तात्काळ पाठवून पाठपूरावा व्हावा. यावेळी शिक्षक नेते प्रा. भास्कर चंदनशिवे, अभिजीत गायकवाड, जिल्हाध्यक्ष मिलींद बारवडे, लक्ष्मण कांबरे,सरचिटणिस भाऊसाहेब सकट, कार्याध्यक्ष प्रा. रविंद्र पाटील, खजानिस नंदकुमार कांबळे, शहराध्यक्ष अॅन्थोंनी डिसोजा, उपशहराध्यक्ष राकेश चव्हाण,संघटक फूलसिंग  जाधव,सचिन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

              फोटो 

स्वाभिमानी शिक्षक संघाच्या वतीने शैक्षणिक डाएटचे  प्राचार्य डॉ.आय.सी. शेख यांना निवेदन देताना  संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे , प्रा. भास्कर चंदनशिवे, अभिजीत गायकवाड, मिलिंद बारवडे , भाऊसाहेब सकट, प्रा. रविंद्र पाटील  आदीसह पदाधिकारी