कोल्हापूर प्रतिनिधी
भारतीय जैन संघटना, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल व जैन डॉक्टर्स फेडरेशन, KY4H संस्था कोल्हापूर यांच्या तर्फे डॉ. राज लाला (अमेरिका) यांचे मोफत प्लास्टिक सर्जरी कॅम्प बुधवार दि. ०५ व गुरुवार दि. ०६ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १०.०० ते ०४.०० या वेळेत डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कदमवाडी रोड, कोल्हापूर येथे सुरु होणार असून, तरी संबधित रुग्णांनी नोंदणी करावी...
आपल्या ओळखीत, शेजारी अथवा माहितीमध्ये कोणी व्यक्ती अशा असतील की, ज्यांना काही शारीरिक व्यंग आहे व त्याच्यावर प्लॅस्टिक सर्जरीचा उपाय करायचा आहे. चेहऱ्यात काही व्यंग असल्यामुळे अनेक गरीब भगिनींची लग्न होत नाहीत व गरिबी मुळे उपचार होत नाहीत. त्यांना नक्कीच या आमच्या उपक्रमाने खूप मदत होईल.
ज्यांना प्लॅस्टिक सर्जरीची खरचं आवश्यकता आहे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती नाही, अशा वंचित लोकांसाठी आम्ही उपक्रम घेवून आलो आहोत याचा गरजूंनी लाभ घ्यावा असे भारतीय जैन संघटना आणि डॉ डी वाय पाटील हॉस्पिटल यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.