कोल्हापूर प्रतिनिधी - महिलांना सर्व क्षेत्रातील ज्ञान मिळावे, त्याचबरोबर विविध कौशल्य आत्मसात करता यावीत आणि रोजगाराच्या संधींची माहिती मिळावी या उद्देशाने प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअर आणि बाफना ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज कोतवाल नगर येथे 'महिला रोजगार मेळावा' घेण्यात आला. या कार्यक्रमाला भागातील महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत सहभाग नोंदवला.
महिलांनी आपले आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे. महिला सक्षम तर कुटुंब सक्षम असते. आजच्या या युगात पुढची पिढी भक्कम बनवण्याचे महत्वपूर्ण काम महिलांच्यावर आहे. सतर्क राहणे आणि सक्षम राहणे आरोग्यपूर्ण राहणे हे महिलांसाठी गरजेचे आहे. फौंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना राबवून महिलांना समर्थ बनवण्यासाठी नेहमी अग्रेसर असेल असे मत माननीय सौ. प्रतिमा सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
आजच्या कार्यक्रमास नगरसेविका सौ. रीना कांबळे, शिवगर्जनाच्या सौ. रेणू यादव , बाफना ज्वेलर्सच्या सौ.अपूर्वा माळी, सौ. छाया मेथे, सौ. वैशाली किरण पाटील, सौ. अमृता बबलू भोंगाळे, सौ. सुनीता देसाई तसेच सामजिक कार्यकर्ते धनंजय उर्फ बबलू भोंगाळे, सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.