कसबा बावडा प्रतिनिधी - संदिप पोवार
बौद्धिक क्षमतेचा कस लागावा यासाठी विविध स्पर्धा घेतल्या जातात. त्यापैकी I. T. S. E. ( इंडियन टॅलेंट सचॆ परीक्षा ) परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. सदर परीक्षा 19 जानेवारी 2020 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेत श्रीमंत माईसाहेब बावडेकर विद्यालयाची विद्यार्थीनी कु. सृष्टी जोतिबा बामणे ( इ. 3 री. ) हिने 300 पैकी 282 गुण मिळवत राज्यात 6 वा क्रमांक पटकावला. तसेच श्री. बलभीम विद्यालय , कसबा बावडा या शाळेचा विद्यार्थी कु. संभव कृष्णात गुरव ( इ. 1 ली. )याने 200 पैकी 194 गुण मिळवत राज्यात चौथा क्रमांक मिळवला व त्याच शाळेतील विद्यार्थीनी कु. दुर्वा निलेश पाटील ( इ. 1 ली. ) हिने 200 पैकी 174 गुण मिळवत जिल्हात चौथा क्रंमाक मिळवला.