प्रतिनिधी एस एम वाघमोडे
जीवघेण्या कोरोना विषाणू संसर्गाच्या काळातही जीवाची पर्वा न करता अचूक व वेगवान वार्तांकनासाठी झटणाऱ्या व प्रशासनाला मदत करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान होणे आवश्यक आहे. शासनाने प्रत्येक पत्रकारांना विमा कवच दिले पाहिजे. असे मत करवीर पंचायत समितीच्या माजी सदस्या अरुणीमा माने यांनी व्यक्त केले.
कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत पोलीस, आरोग्य व प्रशासनास सहकार्य करणाऱ्या पत्रकारांना उजळाईवाडी (ता.करवीर) येथील एस फोर ए ग्रुप च्या वतीने मास्क, सॅनिटाझर व जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप करण्यात आले.प्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी कोरोना विषाणूजन्य परिस्थितीत स्वतःव कुटूंबाची काळजी घेईन व प्रशासनाला सहकार्य करण्याची शपथ घेण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते एस राजू माने, नायकू बागणे,शिवाजी माने,शशिकांत माने, विकास यादव यांच्यासह उजळाईवाडी,गोकुळ शिरगाव परिसरातील पत्रकार उपस्थित होते.
फोटो
उजळाईवाडी (ता. करवीर) येथील एस फोर ए ग्रुप च्या वतीने कोरोना संसर्गाच्या काळातही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.