प्रतिनिधी सतिश लोहार
****
आजकाल प्रत्येकजण स्वतःचा,मुलामुलींचा ,पत्नीचा, लग्नाचा ,आई - वडिलांचा ,मित्राचा ,नेत्याचा वाढदिवस धुमधडाक्यात करण्याची प्रथा रूढ झाली आहे
परंतु अ, लाट ता,शिरोळ येथील विधायक फौंडेशन ने चक्क झाडांचा वाढदिवस साजरा करून निसर्ग प्रेमाचा आणि पर्यावरण रक्षणाचा एक नवा धडा समाजाला दिला आहे, यातुन पर्यावरणातील वृक्षांचे महत्व समाजाला पटवुन देण्याचे काम, आज या वाढदिवसाच्या निमित्याने एक चांगला संदेश दिला गेला आहे , अ,लाट ता,शिरोळ येथील ऐतिहासिक गावतलावाचे संवर्धन,सुशोभीकरण आणि संरक्षनाची जबाबदारी येथील विधायक फौंडेशन या सामाजिक संघटनेने घेतली आहे
गेल्या दोन वर्षांपासून न चुकता प्रत्येक रविवारी विधायकचे कार्यकर्ते तलावाची स्वच्छता करतात,मृतप्राय झालेल्या तलावाला आज जिवंतपणा प्राप्त झालाय,याचाच एक भाग म्हणून तलाव परिसरात सुमारे 400 झाडांची लागवड मागील वर्षी या तरुणांनी लोकवर्गणी मधून केली आहे अतिप्राचीन ,औषधी आणि विविध फळा फुलांची ही झाडं आहेत,प्रचंड अडचणींना सामोरे जात कष्टाने ही झाडे जगविली आहेत,आज याच झाडांचा वाढदिवस अत्यंत आनंदांत साजरा केला,,,गावातील सर्वात वयोवृद्ध असणाऱ्या 103 वयाच्या कल्लू सुबराव खोत या जेष्ठ नागरिकांचे हस्ते केक कापून हा वाढदिवस साजरा केला सगळ्या झाडांना फुगे बांधून त्यांची सजावट करण्यात आली होती,,,रांगोळी घालून आणि विविध सजावटीच्या माध्यमातून टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करत आपल्या पुढच्या अनेक पिढ्याना सावली,फळे फुले आणि औषधें देणाऱ्या या वृक्षांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली,केक कापण्यासाठी आलेल्या 103 वयाच्या खोत आजोबांनीही आपल्या पेक्षा जास्त आयुष्य या झाडांना लाभो आशा शुभेच्छा दिल्या.
विधायक फौंडेशन चे डॉ दशरथ काळे,प्रा,संजय परीट,कुलभूषण बिरनाळे, कृषितज्ञ लक्ष्मण कुंभार,ओमप्रकाश पाटील, प्राचार्य शरद काळे,शशिकांत मुद्दापुरे,अक्षय चौगुले,ऋषि आवळे,विजय कदम यांचेसह उपसरपंच मिलिंद कुरणे माजी,शिवसेनेचे महावीर गाडवे ग्रा,प,सदस्य संजय कोळी माजी तंटामुक्त अध्यक्ष सुभाष चौधरी,मराठा महासंघाचे प्रमोद साळुंखे,यांचेसह विधायक फौंडेशन चे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.