कंदलगाव ता .३ ,
जिल्ह्याचे पालक मंत्री सतेज पाटील यांच्या सोबत जिल्हा मध्यवर्ती मच्छीमार संघाच्या झालेल्या बैठकीत गत वर्षीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणे बाबत निवेदन देण्यात आले .
सन २०१९ च्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर मच्छबीज व जाळी वाहून गेल्याने मच्छीमारांना आर्थीक फटका बसला आहे . संबधीत विभागाकडून याबाबत योग्य तो प्रस्ताव शासनास पाठवला आहे त्या विषयी आध्याप परयंत कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही ही बाब पालक मंत्री सो यांचे निदर्शनास आनुण दीली त्यावर योग्य ती उपाययोजना करुन जिल्ह्यातील मच्छीमारांना योग्य अशी भरपाई द्यावी . अशी मागणी या वेळी संघाच्या वतीने करण्यात आली .
त्यावर मंत्री महोदयांनी योग्य ती कारवाई करून मदत लवकरच देण्याचे आश्वासन दीले
संघाचे संचालक डॉ . सुनिल काटकर यांच्या वतीने या बैठकिचे नियोजन करण्यात आले होते .
यावेळी संघाचे चेअरमन अमोल देसाई , व्हा . चेअरमन गजानन भोई , संचालक जी. बी. भोई ,दतराज शिंदे , अंबाजी पाटील , बाळासो काटकर , सुभाष कोळी , राजू येडगे , उत्तम भोई शंकर निंबाळकर, विजय तिकोणे, अशोक गोसावी, ईत्यादी प्रतिनिधी यांची उपस्थिती होती .
फोटो - कंदलगाव - अतिवृष्टीमुळे मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळणेबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांना निवेदन देताना मच्छीमार संघाचे सदस्य .