Monday, 26 October 2020

हेरले येथे नवीन घंटागाडीचा शुभारंभ

हेरले / वार्ताहर
दि.26/10/20
हेरले ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील कचरा उठाव करण्यासाठी  पंधराव्या वित्त आयोगातून नवीन घंटा गाडी घेण्यात आली त्याचा शुभारंभ महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी राजेश पाटील, याच्या शुभ हस्ते झाला.
    स्वच्छता पाणीपुरवठा व आरोग्य सेवेसाठी पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीस निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून  कचरा उठाव होण्यासाठी घंटागाडी खरेदी केली आहे.
गावामध्ये टॅक्टर ट्रॉली कचरा उठाव करण्यासाठी आहे. गावची लोकसंख्या अठरा हजराच्या दरम्यान असल्याने गावात दररोज चार ते पाच टन कचरा निर्माण होतो. तसेच लहान गल्ली बोळामध्ये मोठी गाडी जात नसल्याने सर्व कचरा उठावासाठी मर्यादा येत होती. यासाठी घंटागाडीची खरेदी केली आहे. या घंटागाडीची लहान गल्ली बोळातून वाहतूक होत असल्याने  शंभर टक्के कचरा उठाव होणार आहे. यामुळे गटारी स्वच्छ होऊन रोगराई निर्मुलन होण्यास मदत होणार आहे.
    यावेळीसरपंच अश्विनी चौगुले, उपसरपंच  राहुल शेटे माजी उपसरपंच संदीप चौगुले, स्वाभिमानी शेतकरी संघटना सरचिटणीस मुनिर जमादार ,ग्रामपंचायत सदस्य  मज्जीद लोखंडे,  सतीश काशीद, डॉ शरद आलमान, बथुवेल कदम,दादासो कोळेकर   ग्रामसेवक संतोष चव्हाण आदी मान्यवरांसह  सर्व कर्मचारी उपस्थित होते.
        फोटो 
हेरले ग्रामपंचायतीच्या वतीने नवीन घंटा गाडीचा शुभारंभ करतांना महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील सरपंच अश्विनी चौगुले उपसरपंच राहुल शेटे व इतर मान्यवर.

Friday, 23 October 2020

शिक्षक संघाच्या कै. शिवाजीराव पाटील विनामूल्य कोविड सेंटर साठी ५१, १११ हजार ची मनपा शहर शाखेच्या वतीने आर्थिक मदत

**

कोल्हापूर : 

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक  संघाच्या वतीने फुलेवाडी येथे विनामूल्य कोविड सेंटर सुरू आहे.  आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोल्हापूर जिह्यासह महाराष्ट्रातील अनेक शिक्षक बांधव आपल्या संघाच्या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते.
शिक्षक संघ शहर शाखेच्या वतीने  सर्वांनी जमा केलेली मदत आज बुधवार दिनांक 21 ऑक्टोबर 2020 रोजी शिक्षक बँकेच्या सभागृहात रोख रुपये ५११११ रुपयांची आर्थिक मदत मान. राज्याध्यक्ष श्री राजाराम वरुटे सर यांच्याकडे राज्यप्रतिनिधी अजितकुमार पाटील ,व अध्यक्ष मनोहर सरगर यांनी सुपूर्द करण्यात आली.
यावेळी कोल्हापूर जिल्हा  प्राथमिक शिक्षक बँकेचे   ज्येष्ठ संचालक बजरंग लगारे , प्रशांत पोतदार , बाजीराव कांबळे , नामदेव रेपे , तानाजी पोवार 
यांच्यासह शहर शाखेचे सुनिल गणबावले , उपाध्यक्ष दिलीप माने , सरचिटणीस संतोष बांबळे ,शहर  संघटक राजेंद्र पाटील ,खजानीस  संदीप सुतार , किरण पाडळकर ,युवराज एरुडकर , दत्तात्रय पाटील उपस्थित होते.

आज अखेर  संघाच्या कोविड सेंटरमधून १०९ शिक्षक बांधव  कोरोना मुक्त होऊन घरी परतलेले आहेत. कोरोनाबाधीत रुग्णाच्या उपचारावरील खर्चाचा अंदाज आपणा सर्वांना ज्ञात आहेच.इतका मोठा खर्च संघटनेच्या वतीने केला जात आहे, आजही आपल्या संघटनेच्या कोविड सेंटरमध्ये १२ शिक्षकबांधव उपचार घेत.
कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीत शिक्षकांसाठी आधारवड ठरलेल्या या विनामूल्य कोविड सेंटरसाठी राज्यभरातून शिक्षक बांधव ऐच्छिक स्वरूपात मदत करत आहेत. 

याप्रसंगी प्राथमिक संघाचे नूतन शिक्षक सदस्य श्री दत्तात्रय शं.पाटील सर यांचे स्वागत मा. राजाराम वरुटे सर यांच्या हस्ते करण्यात आला.

Wednesday, 21 October 2020

विश्वविक्रमवीर डाॅ. केदार साळूंखे व स्केटींग प्रशिक्षक सचिन इंगवले यांस युवा स्टेट अवॉर्ड 2020 ने सन्मानित.

हेरले / वार्ताहर

    विश्वविक्रमवीर स्केटर व सायकलिस्ट डाॅ. केदार विजय साळूंखे वय आठ वर्षे   यास  बहूजनरत्न रामदास आठवले प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे वतीने देण्यात येणार  युवा स्टेट अवॉर्ड 2020 या पुरस्काराने प्रसाद संकपाळ,प्रा. गिरी,  निरंजन तिवारी, महेश शिर्के अनिल माळवी यांच्या उपस्थितीत  सन्मानित  करण्यात आले. तसेच सचिन टीम टाॅपर्सचे स्केटींग प्रशिक्षक सचिन इंगवले यांना  युवा स्टेट अवॉर्ड 2020 क्रिडा प्रशिक्षक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
    विश्व विक्रमविर डाॅ.केदार साळुंखे यांने  अवघ्या सातव्या वर्षी सायकलिंगमध्ये एकाच बुकमध्ये एका वेळी  चार रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय ठरला. आतापर्यंत   स्केटींग  व सायकलिंग  मध्ये  १२ विश्वविक्रम नोंदवले आहेत.तसेच अनेक पुरस्कार  प्राप्त झाले आहेत.  अनेक स्पर्धेत विजेतेपद पटकावली आहेत. यामध्ये  गाेल्ड वीस,  सिल्वर सोळा , ब्राँझ पंधरा पदक व अन्य बक्षिसेही मिळवली आहेत.
     डाॅ.केदार साळुंखे याला विबग्याेर स्कुल च्या प्राचार्या स्नेहल नावेॅकर, शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मेघराज खराडे ,शिवतेज खराडे ,सजीवन स्कुलचे चेअरमन अमर सरनाईक , प्रशिक्षक सचिन इगंवले, स्वप्निल काेळी, वडिल पीआय विजय साळूंखे आई डीवायएसपी स्वाती गायकवाड साळूंखे यांचे  मार्गदर्शन लाभले आहे .
      फोटो 
डॉ.केदार साळुंखे युवा स्टेट अॅवार्ड स्विकारतांना.

Thursday, 15 October 2020

अंगणवाडी सेविकांचे कार्य स्तुत्य - उपसरपंच राहुल शेटे

हेरले / वार्ताहर

     सुशिक्षित व संस्कारक्षम कुटुंब व्यवस्था होणेसाठी कुटुंबामध्ये शिक्षण घेतलेल्या स्त्रीचे  महत्त्व अनन्य साधारण असते. यासाठी मुलांबरोबरच मुलींनाही शिक्षण बरोबरीचे देऊन त्यांचे शिक्षण खंडीत करू नये. त्यांच्या ध्येयापर्यंत शिक्षण देणे कुटुंबांतील सर्व घटकांची जबाबदारी आहे. शिक्षीत स्त्री संस्कारक्षम पिढी घडवते.बालवाडीपासूनच लहान मुलांना संस्काराचे धडे मिळतात त्यामुळे अंगणवाडी सेविकांचे अध्यापन कार्य स्तुत्य आहे .असे मत उपसरपंच राहुल शेटे यांनी व्यक्त केले.
       ते हेरले ( ता. हातकणंगले ) येथील महाराष्ट्र शासनाच्या " बेटी बचाओ , बेटी पढाओ " या एकात्मिक बालविकास प्रकल्प कोल्हापूर ग्रामीण अंतर्गत  अभियानाची सुरवात प्रसंगी बोलत होते.
      उपसरपंच राहुले शेटे पुढे म्हणाले मुलगा पाहिजे मुलगी नको हा विचार  काढून टाकला पाहिजे. मुलगा मुलगी समान मानून दोघांनाही शिक्षणासह सर्व क्षेत्रातील समान संधी देत उच्चपदस्थ बनविण्यासाठी प्रयत्नशिल राहिले पाहिजे.
 ११ ऑक्टोबंर जागतीक कन्यादिन निमित्त ११ ते १७ ऑक्टोबंर पर्यंत सप्ताह सुरू आहे. या सप्ताहामध्ये विविध उपक्रामांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रम प्रसंगी  अंगणवाडी सेविका व मदतनीस व पालक यांना बेटी बचाओ बेटी पढाओ संदर्भात प्रतिज्ञा देण्यात आली.
        यावेळी पर्यवेक्षिका शकुतंला कोळेकर , ग्रामपंचायत सदस्या विजया घेवारी, अंगणवाडी सेविका
शीला पोतदार,राजश्री हराळे, रेखा पाटील, संगिता उपाध्ये, नंदा थोरवत, कल्पना खोचगे, रजिया जमादार, लता शिंदे, संध्या डोरले, सुनिता खाबडे, लता कदम, मोहब्बत पेंढारी, छाया सपाटे, सपना वड्ड, फरिदा जमादार आदीसह मदतनीस व पालक उपस्थित होते.

        फोटो 
हेरले येथे बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे उद्घाटन करतांना उपसरपंच राहुल शेटे व अंगणवाडी सेविका मदतनिस आदी.

Tuesday, 13 October 2020

रस्त्यावरच्या खड्डयाशी नाते जोडणारे शिवराम मामा...

कंदलगाव - प्रकाश पाटील 

      करवीर तालुक्यातील कोणताही रस्ता असो वरिष्ठांचा आदेश मिळताच त्या रस्त्यावरचा खड्डा भरणेसाठी तत्परसेवा देणारे पंचायत समिती बांधकाम विभागा कडील शिवराम मामा...
     दिंडनेर्ली ता.करवीर येथील शिवराम भाऊ पाटील हे वयाच्या सतराव्या वर्षी करवीर पंचायत समितीकडील बांधकाम विभागाकडे मैल कामगार म्हणून १९७५ साली सेवेत रूजू झाले. तेंव्हापासून आपल्या कामाशी एकनिष्ठ राहून तालुक्यातील अनेक गावच्या रस्त्याशी आपले नाते घट्ट करून रस्त्यावरचे खड्डे भरू लागले.
    इंगळी, कोडोली, निगवे खा॥, कळंबा असो वा पाचगाव, कंदलगाव या सह इतर गावामध्ये सायकल वरून जाऊन रस्त्यावर पडलेले खड्डे व पावसाळ्यात साईट पट्टीवर चर मारून रस्त्यावर पाणी साचू न देणे असे त्यांचे काम असायचे. जिल्हा परिषद अखतारीतील सर्व रस्त्यांची देखभाल दुरुस्ती, गटर काढणे, झाडे झुडपे तोडणे, रस्ता सुस्थितीत ठेवणे, पावसाळ्यात पडलेली झाडे तोडून रस्ता वाहतूकीसाठी रिकामा करणे यासारख्या कामात मग्न राहून आपली सेवा इमानदारीने पार पाडल्याने सेवानिवृत्ती होऊनही एखादे काम आडले तर मामांना वरिष्ठांचा फोन जातोच.
     त्रेचाळीस वर्षे सेवेच्या कारकिर्दीत विभागातील सर्व वरिष्ठांनी त्यांना कधीही एकेरी नावाने हाक मारली नाही. कामावरचे प्रेम आणि निष्ठा यामुळे शिवराम पाटील सर्वाचेच मामा बनले होते. घरची जेमतेम शेती त्यातच आशा कामामुळे धावपळ करून आपले काम पूर्ण करण्याची ओढ त्यांना लागलेली असायची. दिड वर्षापूर्वी सेवानिवृत्त होऊनसुद्धा आजही ते रस्त्यावरचा खड्डा विना मोबदला भरून वाहतूकीचा अडथळा दूर करतात.
बांधकाम विभागाकडून सन्मान..
    वरिष्ठांचा आदेश मिळताच विलंभ न करता कामाच्या ठिकाणी हजर राहून आपले काम वेळेत पूर्ण केल्याबद्दल पंचायत समितीकडून उत्कृष्ट कामगार म्हणून निवड, तसेच यशवंत अभियान पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

- मी २०१९ ला सेवानिवृत्त झालो. पण आज हि कुठल्या रस्त्यावर खड्डा पडला हे सांगू शकतो. वरिष्ठांच्या व सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांमुळे हे साध्य झाले असून निवृत्ती नंतरही काम करण्याची इच्छा आहे.
शिवराम पाटील.
फोटो -शिवराम पाटील .

पंच्याऐैंशी वर्षाच्या दाम्पंत्याने केली कोरोनावर मात.. जय भवानी कॉलनीत भोसले दाम्पंत्यांचे स्वागत...

कंदलगाव - प्रकाश पाटील 

      कोरोना पॉझिटीव्ह हा शब्द ऐकला तरी अनेकांच्या मनाचा धीर सुटतो.घाबरलेले शेजारी आणि कुटूंबातील सदस्यांची पळापळी हे पाहून जीव निम्मा झालेला असतो. मात्र फुलेवाडी येथील जयभवानी कॉलनीमध्ये राहणारे बबन भोसले वय ८५ व त्यांच्या पत्नी रतन भोसले वय ८० यांनी धीर न सोडता धैर्याने कोरोनाचा सामना केल्याबद्दल कॉलनीमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले.
     गेल्या महिन्यात किरकोळ त्रास जाणवत असल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला परंतू मनाची तयारी करून अगदी खंबीरपणे या दाम्पंत्याने योग्य आहार, व्यायाम व सोशल डिस्टन्स पाळून वीस दिवसात कोरोनावर मात केली.
    या दाम्पंत्याच्या स्वागतासाठी विठ्ठल शिगे, शंकरराव मोरे, मोहन संकपाळ,रवळनाथ कुंभार, संजय पाटील, प्रकाश नंदिवाले, गणेश भोसले यांचे सह कॉलनीतील महिला उपस्थित होत्या.

  कोरोना बद्दल मनात भिती होती मात्र ती भिती पत्नीसमोर व्यक्त न करता आपण खंबीर राहीलो. योग्य आहार, व्यायाम यामुळे कोरोनावर मात करू शकलो.
बबन भोसले 


फोटो . फुलेवाडी जय भवानी कॉलनीमध्ये कोरोनावर मात केलेल्या भोसले दाम्पत्यांचे स्वागत करताना विठ्ठल शिंगे व इतर.

उच्च शिक्षणाचा उपयोग करून पाणी बचतीतून शेतीत प्रगती...हणबरवाडी येथील खोत बंधूंचा अभिनव उपक्रमातून भरघोस उत्पादन ...


कंदलगाव . प्रकाश पाटील

   माझं शिक्षण खूप झालयं मी शेतात काम कस करू या हट्टापाई अनेकांची प्रगती खुंटली असल्याचे आपण ऐकतो. मात्र याच उच्च शिक्षणाचा उपयोग आपल्या शेतीत करून पाणीची बचत करत भाजीपाल्यातून भरघोस उत्पादन हणबरवाडी ता. करवीर येथील दोन भावंडांनी घेतले आहे.
    अजित खोत व विनय खोत हे तुलते -पुतने एकमेकांच्या मदतीने लॉक डाऊन काळात आपल्या उच्च शिक्षणाचा उपयोग शेतात प्रगती करण्यासाठी करीत आहे. अजित हे केमिकल इंजिनिअर असून त्यांचा पुतण्या विनय सध्या केमिस्ट्रीतून बीएससीच्या तीसऱ्या वर्गात आहे. लॉक डाऊन काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या, व्यवसाय गमवावे लागल्याने अनेक तरूण बेरोजगार आहेत. आशावेळी आपल्या आहे त्या शेतीत शिक्षणाच्या उपयोगातून प्रगती साधून खोत बंधूंनी आपल्या मुरमाट जमिनीत पाण्याचा कमीत कमी वापर करून टिबकद्वारे वांगी, दोडका, भेंडी, कारली यासारख्या फळभाज्यांचे उत्पादन घेतले आहे. आपल्या गावात पाण्याची कमतरता असल्याचे जाणून ऊस पिका ऐवजी भाजीपाल्याला महत्व देऊन उत्पादन कसे वाढेल याकडे लक्ष दिले आहे.
    अजित यांची सात एकर व विनय याची साडेतीन एकर शेती आहे. लॉक डाऊन काळात आलेल्या अनुभवातून आपली शेतीच बरी असे मनावर बिंबवून भाजीपाल्यातून उत्पादन घेऊन भरघोस फायदा मिळविला आहे.
      दररोज भाजीपाला घेऊन कोल्हापूर येथील शिंगोशी मार्केटमध्ये विक्रीसाठी येतात. सकाळी आपले उत्पादन विक्री करून दिवसाच्या उर्वरीत वेळी शेतातील इतर कामे करण्यात मग्न असतात. नोकरी व व्यवसाया व्यतिरिक्त आपल्या शेतीतून उत्पादन घेऊन आपले कुटूंब सावरता येते. शेतीची मशागत, किरकोळ औषध फवारणी, देखभाल यातून गेल्या सहा महिन्यात लाखो रुपयाचे उत्पादन घेतले असल्याचे त्यांनी सांगीतले.

पाणी बचतीसाठी ....
    परिसरात पाण्याची कमतरता असल्याने कमीत कमी पाण्याचा वापर करणेसाठी संपूर्ण शेतात टिबक सिंचन करून त्याद्वारे भाजीपाला उत्पादन सुरू आहे. यातून विजेची व पाण्याची बचत होऊन आवश्यक पाण्याच्या मात्रेमुळे पिक उत्पादन वाढले आहे.


  शेतकऱ्यांनी फक्त ऊस शेतीवर अवलंबून न राहता इतर पिके, भाजीपाला, फळभाज्यांचे उत्पादन घेऊन पाणी व विजेची बचत करावी.ऊस पिकासाठी पाणी जास्त लागते व पिक वेळेत जात नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. भाजीपाल्यातून भरघोस उत्पादन घेऊन प्रगती साधता येते.

अजित खोत, विनय खोत 
प्रगतशिल शेतकरी .

फोटो - हणबरवाडी येथे कमी पाण्यात भरघोस भाजीपाल्याचे उत्पादन घेणारे खोत बंधू .
( छायाचित्र . प्रकाश पाटील )

हेरलेतील पशुवैद्यकिय दवाखान्यामध्ये व्रनोपचारक व पर्यवेक्षक या दोन पदांची तात्कळ नेमणूक करावी : शेतकरी वर्गाची मागणी.


हेरले / वार्ताहर


हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे पशुसंवर्धन खाते महाराष्ट्र राज्य, राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ हा आहे. या दवाखान्यामध्ये हेरले हालोंडी मौजे वडगांव या तीन गावच्या पशुंवर मोफत उपचार केले जातात. तीन गावचे क्षेत्र पाहता दवाखान्यामध्ये एक पशुधन  विकास अधिकारी व एक शिपाई कार्यरत आहे. अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे पशुधन विकास अधिकाऱ्यांना पशुवर उपचार व इतर वैद्यकिय सेवा देण्यासाठी फार धावा -धाव करावी लागत आहे. त्यामुळे  एक व्रनोपचारक व एक पर्यवेक्षक या दोन पदांची आवश्यकता असल्याने तात्काळ या पदांची नेमणूक व्हावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
          हेरले, मौजे वडगांव व हालोंडी या गावांमध्ये शेतीस पूरक व्यवसायामध्ये  गायी व म्हैशी या पशुंचे पालन करून  दुग्ध उत्पादन मोठया प्रमाणात घेतले जाते. हा व्यवसाय विकसीत झाल्याने पशुंची संख्याही वाढली. या पशुना वैद्यकिय सेवा देण्यासाठी व पशुसंवर्धनासाठी १९७१मध्ये राज्यस्तरीय पशुवैद्यकिय दवाखान्याची हेरलेमध्ये स्थापना झाली. या दवाखान्यामध्ये म्हैस गायी,शेळी, मेंढी, कुत्रा, मांजर, घोडा व पक्षी कोंबडया आदी पाळीव प्राणी व पक्षी यावर मोफत  उपचार केले जातात.
          मोठ्या जनावरांवर वर्षातून दोन वेळा लसीकरण केले जाते. संप्टेबंर ते ऑक्टोबंर मध्ये लाळ खुरखत व पावसाळ्याच्या आगोदर मे ते जून दरम्यान घटसर्प आदी लसी दिल्या जातात. सद्या हालोंडी गाव पूर्ण झाले असून मौजे वडगांव व हेरले या दोन गावांत लसीकरणाची सेवा देणे सुरू आहे. तसेच पाळीव पशुंच्या कानात बिल्ले मारून त्यांना लसी देण्याचे कार्यही सुरू असल्याने सेवेत दिरंगाई होत आहे.
       दैनंदिन पंचवीस ते तीस जनावरांवर उपचार केले जातात. यामध्ये ताप येणे, वैरण न खाणे, पोट फुगी ,विषबाधा, संडास बिघडणे ,आडलेले, वार न पडणे, भांड बाहेर येणे आदी आजारावर उपचार केले जातात. तसेच शिंग काढणे,डोळ्याचे ऑपरेशन, तार खिळा काढणे, सिजेरियन, शवविच्छेदन आदी शस्त्रक्रिया ही कराव्या लागतात. तीन गावांमध्ये जाऊन कृत्रिम रेतन करावे लागते.आदी सेवा बजावत असतांना एक पशुधन विकास अधिकारी व शिपाई या दोघांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 
      तीन गावांमध्ये तेराशे म्हैशी, सातशे गायी, चारशे शेळ्या व तेराशे मेंढ्या आदी संख्या पशुंची असून त्यांना नियमित वैद्यकिय सेवा बजावी लागत आहे.अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे पशुंना वैद्यकिय सेवा देतांना दिरंगाई होत असल्याने शेतकरी वर्गाच्या रोषांना अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागते. तसेच या अधिकाऱ्यांना सहाय्यक आयुक्त इचलकरंजी या पदाचा अतिरिक्त कार्यभार असून १४ दवाखान्याचे गुरूवार व शनिवार व केव्हांही पर्यवेक्षणाचे कार्य करावे लागते. त्यामुळे त्यांना कामाचा भार जास्त होऊन दमछाक होत आहे. हेरले परिसरातील पशुपालन व्यवसायास पशुसंवर्धनासाठी आधारवड असणाऱ्या या दवाखान्यांमध्ये जिल्हा पशुसंवर्धन विभागाने तात्काळ दोन पदांची भरती करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

हेरले, मौजे वडगांव,हालोंडी या तीन गावांमध्ये पशुधनसंख्या लक्षणिय आहे. या पशुंना वैद्यकिय सेवा देतांना कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने मर्यादा येतात. तरी एक व्रनोपचारक व एक पर्यवेक्षक या दोन पदांची भरती प्रशासनाने करावी.

        डॉ.ए.जे. पाटील
   पशुधन विकास अधिकारी हेरले

शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे - - :रोटरीचे सहा. प्रांतपाल सुहास कुलकर्णी यांचे आवाहन

*

'रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल'च्यावतीने'नेशन बिल्डर' पुरस्कार ७ शिक्षकांना प्रदान

हेरले / वार्ताहर

शिक्षणाच्या नवीन प्रवाहामध्ये शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांच्यात सकारात्मक बदल करणे गरजेचे आहे.
असे आवाहन रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल सुहास कुलकर्णी यांनी केले.
            रोटरी क्लब ऑफ  कोल्हापूर सेंट्रल यांच्यावतीने आयोजित 'नेशन बिल्डर  पुरस्कार २०२०-२१' वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळत हा कार्यक्रम पार पडला. 
         कोल्हापूर जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या  माध्यमिक शिक्षकांमध्ये मुख्याध्यापक विकास समुद्रे, क्रीडा शिक्षक संदीप पाथरे,राहुल जाधव,सुलक्षना मुळे,सचिन यादव,सौ.दीपा बुकशेटे,शशिकांत सुतार आदींना या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. 
    यावेळी बोलताना रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे अध्यक्ष सुर्यंकात पाटील (बुध्दीहाळकर)म्हणाले,शिक्षकांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सेवाभावी वृत्तीने कार्यरत राहिल्यास सुदृढ समाजाची निर्मिती होईल.शिक्षकांचे कार्य अनन्यसाधारण आहे. भारत बलशाही होण्यासाठी शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे.
    यावेळी सचिन यादव व प्रि.इंदूमती देवी इंटरअॅक्ट क्लब च्या समन्वयक सुलोचना कोळी यांची मनोगते झाली.
   या कार्यक्रमास रोटीरीयन्स प्रकाश जगदाळे,हर्षवर्धन  भुरके,अवधूत भाटे,बदाम पाटील,नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय गाडवे यांच्यासह  विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचलन जिया मोमीन यांनी केले.आभार सेक्रेटरी स्वप्निल मुधाळे यांनी मानले.
------------------------------------
           फोटो 

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्यावतीने आयोजित 'नेशन बिल्डर  पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या समवेत डॉ.सुहास कुलकर्णी सुर्यकांत पाटील (बुद्धीहाळकर),स्वप्निल मुधाळे .

Monday, 12 October 2020

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, कोल्हापुर जिल्हा ( इंचलकरंजी शहर ) व वीरशैव लिंगायत नागलिक (बनगार) उत्कर्ष मंडळ, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्त दान शिबीराचे आयोजन

प्रतिनिधी सतिश लोहार 
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, कोल्हापुर जिल्हा ( इंचलकरंजी शहर ) व वीरशैव लिंगायत नागलिक (बनगार) उत्कर्ष मंडळ,  इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्त दान शिबीर पार पडले
151वी महात्मा गांधी जयंती व
श्री दानम्मादेवी व श्री विरभद्र मंदिराचा वर्धापन दिन व   या दोन्हीचे औचित्य साधून.
 श्री दानम्मादेवी व श्री विरभद्र मंदिराच्या परिसरात , लोटस पार्क , खोतवाडी ( इंचलकरंजी )या ठिकाणी
 रक्तदान शिबिराचे आयोजन पार पडले ,
 या कार्यक्रमासाठी शिक्षक सेना पदाधिकारी  , शिवसेना पदाधिकारी ,वीरशैव लिंगायत नागलिक (बनगार) उत्कर्ष मंडळाचे पदाधिकारी , खोतवाडी गावचे सरपंच , ग्राम पंचायत सदस्य , रोटरी क्लब चे मेंबर उपस्थित होते , 
शिक्षक सेना  पदाधिकारी ,वीरशैव लिंगायत नागलिक (बनगार) उत्कर्ष मंडळाचे पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी 
,गावातील युवक , नागरीकांनी मोठया संख्येने रक्तदान केले, कार्यक्रमाचे उद्धाघटन फोटो पुजन करुन करण्यात आले , शिक्षक सेना जिल्हा कोषा अध्यक्ष प्रमोद कांबळे सर , जिल्हा उपाध्यक्ष सतिश लोहार सर , जिल्हा सचिव स्वप्नील  पाटील सर , खोतवाडी सरपंच संजय चोपडे,ग्रामसेवक अनिल माने,सेक्रेटरी इराण्णा मट्टीकल्ली
देवेंद्र आमटे, डॉ . धन्वंतरी बिरनाळे ,इराण्णा चचडी,महेश कब्बूर,चिदानंद हालभावी,प्रकाश वारदाई, शिक्षक सेना जिल्हा कमिटी सदस्य शिवकुमार मुरतले सर , हातकणंगले तालुका अध्यक्ष गजानन लवटे , जिल्हा कमिटी सदस्य चंदकात कोळेकर सर ग्रामपंचायत संदस्या मंगलताई मुसळे ,शिवानंद जोतावर,नंदू हेरलगी,राजू हारुगेरी,संतोष हारूगेरी, रोटरी क्लब चे मेंबर , आदर्श ब्लड बँकेचे डॉक्टर, शिक्षक सेना शहर अध्यक्ष, सचिव सचिन कांबळे सर,शहर कार्य अध्यक्ष राहुल रजपुत, शिरोळ तालुका कार्यअध्यक्ष स्वप्नील माने यांच्या उपस्थित फोटो पुजन करून कार्यक्रमाचे उद्घघाटन करण्यात आले, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिवकुमार मुरतले सर यांनी केले  , या कार्यक्रमात  व्याख्याते आयुर्वेद  डॉ धन्वंतरी बिरनाळे  यांनी कोरोना विषयी, आरोग्याच्या समस्या व आहार या विषया संदर्भात जागृती पुरक मार्गदर्शन व्याख्यान दिले , या कार्यक्रमासाठी शिक्षक सेना  जिल्हा अध्यक्ष अरुण मुजुमदार सर यांचे मार्गदर्शन लाभले ,
कार्यक्रमाचे आभार जिनेश पुरवंत सर यांनी मांडले,
 या रक्तदान शिबिरास शिवसेना उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे , शिवसेना शहर अध्यक्ष सयाजी चव्हाण, यांनी भेट दिली व कार्यक्रमास मार्गदर्शन केले .

Friday, 9 October 2020

एलआयसी जीवन स्नेह विमा प्रतिनिधी नियुक्ती व प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ - ग्राहकांना मिळणार सर्व सुविधा


कोल्हापूर प्रतिनिधी  - 

 कोल्हापूर शहरात लक्ष्मीपुरी येथे एलआयसी शाखा 947 समोर  दिग्विजय नलवडे विकास अधिकारी यांच्या जीवन स्नेह या एलआयसी सुविधा केंद्राचे उदघाटन  प्रमोद गुळवणी मॅनेजर सेल्स यांच्या हस्ते आणि शाखाधिकारी  वैभव कोळी, शाखाधिकारी  योगेश बलसे, सहायक शाखाधिकारी -  शशिकांत जगजम्पी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. 

या उद्घाटन प्रसंगी बोलताना गुळवणी म्हणाले की आजच्या कोरोना काळात लोकांना लवकर सर्व्हिस मिळणे गरजेचे आहे  आणि या ऑफिसमधून सर्व प्रकारच्या सुविधा लोकांना मिळणार आहेत त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना विम्याबाबतच्या सर्व प्रकारच्या सुविधांसाठी या केंद्राचा फार उपयोग होईल. 
लक्ष्मीपुरी 947 शाखेला संलग्न होऊन हे ऑफिस लोकांना सर्विस देत राहील तसेच नवीन पॉलिसी व एलआयसी विमा एजन्सीही या ऑफिस मार्फत घेता येईल असे प्रतिपादन शाखाधिकारी वैभव कोळी यांनी केले. 
दिग्विजय नलवडे यांच्या जीवन स्नेह या केंद्रात नवीन विमा एजंट नियुक्ती व प्रशिक्षण याबरोबरच नवीन व जुन्या सर्व ग्राहकांना विमा पॉलिसी मार्गदर्शन, विमा हप्ता संकलन, पॉलिसी कर्ज प्रकरण आणि पॉलिसी संदर्भात कोणत्याही समस्या सोडविण्याची सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी आशिष पवार व नितीन जोंधळे या ऑफिस मध्ये साहाय्य करतील. 
या कार्यक्रम प्रसंगी विमा प्रतिनिधी स्वाती जाधव 6  पॉलिसी, अश्विनी शिंदे 5 पॉलिसी, गीता पाटील 3 पॉलिसी, राजू खोत 3 पॉलिसी व कल्पना परदेशी 2 पॉलिसी अशा नवीन पॉलिसी संकलन करुन शुभारंभ करण्यात आला.

Tuesday, 6 October 2020

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या थोरात गटाचे कार्य कौतुकास्पद - जि.प. शिक्षण सभापती प्रवीण यादव यांचे गौरवोद्गार

हेरले / प्रतिनिधी
दि.6/10/20
महाराष्ट्र राज्यात शिक्षक संघटनांच्या बाबतीत शक्यतो न घडणारी घटना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडलेली असून ती म्हणजे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हा परिषदेला देऊ केलेले  अॅम्ब्युलन्स सेवा असून शिक्षक संघाचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे .भविष्यात ही त्यांनी असेच विधायक उपक्रम राबवावेत असे गौरवोदगार कोल्हापूर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी केले. 
        महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील थोरात गटाकडून कोविड बाधित गरीब व गरजू रुग्णांच्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेस  सर्व सोयींनी युक्त  सुसज्य  ॲम्बुलन्स प्रदान करण्यात आली यावेळी ते बोलत होते. 
    यावेळी बोलताना संघाचे नेते मोहन भोसले म्हणाले, कोल्हापूर जिल्हा कोरणा मुक्त होण्यासाठी शिक्षक संघाने ॲम्बुलन्स ची सेवा दिलेली आहे. कोरोनाच्या संकट काळात अगदी सुरुवातीच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातून शिक्षकांनी एक दिवसाचा पगार देऊन मदतीचा हात दिलेला आहे. तसेच येत्या ४ दिवसात  शिक्षकांच्या बैठकीचे नियोजन करून अजून एक दिवसाचा पगार देण्याविषयी चर्चा करणार आहोत. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक नक्कीच यासाठी सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे. 
     शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रवीकुमार पाटील यांनी  प्रास्ताविकामध्ये  संघाकडून देऊ केलेल्या मोफत अॅम्ब्युलन्स सेवे मध्ये समाविष्ट असणाऱ्या सुविधांची माहिती दिली ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले आहे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. 
   या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल ,प्राथ. शिक्षणाधिकारी आशा उबाळे,   बालविकास प्रकल्प अधिकारी सोमनाथ रसाळ . जि.प. सदस्य विजय भोजे व राजू भाटळे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष एन.वाय .पाटील , शिक्षक नेते बाळासाहेब निंबाळकर ,जिल्हा अध्यक्ष रवी कुमार पाटील, जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील,  महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा लक्ष्मी पाटील , प्रसिध्दी प्रमुख नुतन सकट,प्रकाश मगदूम, कास्ट्राइबचे जिल्हा अध्यक्ष गौतम वर्धन, जिल्हा अध्यक्ष जयवंत पाटील, आयलू देसा, श्रेणीक खोत,अरूण चाळके, तानाजी सणगर, प्रकाश सोहनी, रावसाहेब पाटील, रवी भोई , कृष्णात बागडी, शिवाजी रोडे पाटील , भिमराव रेपे, सुनील एडके , विजय भोसले , महादेव गुरव , इंद्रजीत कदम, अशोक चव्हाण , शशिकांत पाटील , रघूअप्पा खोत,  भीमराव भिमराव रेपे ,शिवाजी ठोंबरे, सरदार पाटील , अशोक पाटील , आदी मान्यवरासह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

     फोटो 
जिल्हा परिषद कोल्हापूर येथे प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने अँम्ब्यूलन्स प्रदान करतांना मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल शिक्षण सभापती प्रविण यादव  प्राथमिक शिक्षण अधिकारी आशा उबाळे ,नेते मोहन भोसले ,जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील, महिला जिल्हा अध्यक्ष लक्ष्मी पाटील व इतर मान्यवर

Sunday, 4 October 2020

मनपा राजर्षी शाहू विद्यामंदीर कसबा बावडा, कोल्हापूर मध्ये परिसरात महास्वच्छता आणि वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

*

कसबा बावडा प्रतिनिधी 

प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर महानगरपालिका संचलित,  म न पा राजर्षी शाहू विद्यामंदीर शाळा क्र 11, कसबा बावडा, कोल्हापूर मध्ये महानगरपालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, प्रशासनाधिकरी एस के यादव, यांच्या प्रेरणेतून व शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, उषा सरदेसाई यांच्या नियोजन मधून 75 व्या महास्वच्छता अभियान अंतर्गत शालेय परिसर, व्हरांडा आणि वर्गखोल्या, इमारत, स्वच्छता गृह,ऑफिस,शालेय क्रीडांगण परिसरातील झाडे स्वच्छ  करण्यात आले. तसेच झाडांना पाणी व खत घालून वृक्ष संवर्धन करण्यात आले. 
 या मोहिमेची सुरवात केंद्र मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांच्या हस्ते झाडांना पाणी व कम्पोस्ट खत घालून करण्यात आली. शुद्ध हवा , पाणी, आरोग्याची गुरुकिल्ली आहे. स्वच्छता केल्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. महात्मा गांधीजी यांनी आपल्या वर्धा साबरमती आश्रमात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते स्वच्छतेचे महत्व व स्वावलंबी शिक्षणाचे धडे देत असत. कोरोना काळात अगदी प्रत्येक माणूस अस्थिर झालेला दिसून येत आहे. त्यासाठी वैयक्तिक स्वच्छता प्रत्येकाने राखली पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी, बाजार पेठेत, भाजीपाला मंडई, दुकानामधील दैनंदिन जीवनावश्यक वस्तू खरेदी करतांना सुद्धा स्वच्छतेची खबरदारी घ्यावी. दररोज योगासने, प्राणायाम , सूर्य नमस्कार , ताजी फळे, भाजीपाला , कडधान्ये यांचा वापर आहारात करावा व जागरण टाळावे असे प्रतिपादन केले. 
महास्वच्छता करण्यामागील हेतू व महत्व कल्पना पाटील मॅडम, सुजाता आवटी मॅडम यांनी सांगितले.
महास्वच्छता बद्दल नियोजन तमेजा मुजावर मॅडम, विद्या पाटील मॅडम यांनी केले होते.
या महास्वच्छता अभियानासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा अनुताई गायकवाड, अध्यक्ष रमेश सुतार, शिक्षणतज्ञ इलाई मुजावर सर, व इतर पालक सहभागी झाले होते.

 महास्वच्छता कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहिले बद्दल सावित्री काळे मॅडम यांनी आभार मानले.

Saturday, 3 October 2020

ऑनलाईन अध्ययन- अध्यापनाची साप्ताहिक माहिती भरणे आदेश रद्द करा - शिक्षक संघाचे निवेदन

पेठवडगांव / प्रतिनिधी
     मिलींद बारवडे

   राज्यातील शिक्षक ऑनलाईन अध्यापना बरोबरच कोरोना आपत्ती व्यवस्थापनातील  साह्यता कक्ष, माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत विविध सर्वेक्षण करत असताना ऑनलाईन अध्ययन- अध्यापनाची साप्ताहिक माहिती लिंकवर भरावी असा शिक्षकांच्यावर अविश्वास दाखवणारा काढलेला अध्यादेश तात्काळ रद्द कराव अन्यथा या प्रक्रियेवर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात,प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे,जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील, महिला शिक्षक जिल्हाध्यक्षा
लक्ष्मी पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे
     निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड,शिक्षण आयुक्त पुणे, शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचलनालय पुणे, यांना पाठवले आहे .
          निवेदनात पुढे म्हटले आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहू नये म्हणून शाळा बंद शिक्षक सुरु या उपक्रमाअंतर्गत राज्यातील शिक्षक ऑनलाईन अध्यापन करत आहेत.विद्यार्थ्यांना व्हाटसअपच्या माध्यमातून ग्रुप तयार करून त्यांना अभ्यास देणे व तपासणेही चालू आहे. विविध शैक्षणिक उपक्रम सुरु असताना शिक्षक शासनाच्या आदेशानुसार कोरोना जनजागृती बाबतच्या कामकाजात हि कार्यरत आहेत.
राज्यातील अनेक शिक्षकांना कोरोनाचा संसर्गही झाला आहे.

शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांना कोरोनाच्या कामकाजातून कार्यमुक्त करणे बाबत आदेश काढून शिक्षकांना कार्यमुक्त करण्याच्या स्थानिक प्रशासनाला सूचनाही दिल्या आहेत.मात्र अद्यापही शिक्षकांना कार्यमुक्त तर करण्यात आलेले नाही तरीही शिक्षक कोरोना आपत्तीचे व अध्यापनाचे काम करत आपली जबाबदारी पार पाडत आहेत.

अशा परिस्थितीत ऑनलाईन साप्ताहिक माहिती भरण्या संदर्भात शासनाने परिपत्रक  काढला आहे.लिंकवर माहिती भरण्यासाठी सर्व्हर डाऊन होऊन माहिती अपलोड होण्यासाठी वेळवाया जाणार आहे.शिक्षकांना याचा मनस्ताप होणार आहे.त्यामुळे शिक्षकांच्यात असंतोष निर्माण झाला असून हा अध्यादेश शासनाने तात्काळ रद्द करावा अन्यथा कामावर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
    निवेदनावर मोहन भोसले,एन वाय पाटील, जनार्दन निउनगरे,रघुनाथ खोत,सुनील पाटील, बाळकृष्ण हळदकर,दुन्देश खामकर,अरुण चाळके,किरण शिंदे ,रोहिणी लोकरे ,प्राजक्ता जाधव ,नूतन सकट ,वैशाली कोंडेकर ,मीना चव्हाण ,विद्या चव्हाण यांच्या सह्या आहेत.

Friday, 2 October 2020

पट्टणकोडोली : राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री.यांची जयंती तसेच शाखेचा ३४ वा वर्धापनदिन साजरा......


पट्टणकोडोली तालुका हातकणंगले येथे देशाचे दोन महान सुपुत्र राष्ट्रपिता महात्मा गांधीं व पहिलें पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती तसेच पैसाफंड  बँकेच्या शाखा पट्टन कोडोली चा 34 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर  अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शाखा सल्लागार प्रकाश पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या फोटोचे पुजन करण्यात आले.त्यानंतर  सप्टेंबर २०२० अखेर पट्टणकोडोली शाखेकडे १५ कोटी १३लाख ठेवी, ११ कोटी ३४ लाखांची कर्जे तसेच १७ लाख ५५ हजार नफा झाल्याची माहिती बॅंकेचे अधिका-यांनी दिली.यावेळी सत्यनारायण पूजेचे ही आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमास वसंत बोंगाळे,भरत मंडपे, गजानन नाझरे,सिद्राम माडग्याळ,  शाखाधिकारी पांडुरंग पाटील, कर्मचारी विशाल पाटील, निर्मला गाट, अबोली सावेकेर,आप्पासो वाघमोडे उपस्थित होते वसुली अधिकारी शिरीष आवटे यांनी उपस्थित मान्यवरांचे. आभार मानले.

शिवनाकवाडी येथे व्यायाम शाळेची पायाभरणी

प्रतिनिधी सतिश लोहार
**
शिवनाकवाडी गावामध्ये विकास कामांना गती मिळालेली आहे , गावचे सरपंच सचिन खोत ( सातारे ) , उपसरपंच व सर्व ग्राम पंचायत सदस्य , ग्रामसेवक यांनी रस्ते , गावची शाळा , स्वछता ,तसेच गावामध्ये वृक्षारोपण या महत्वाच्या कामांना प्राधान्य देऊन या कामास गती दिली आहे ,आज शिवनाकवाडी मध्ये क्रिडा अधिकारी कोल्हापुर यांच्या माध्यमातुन मंजुर झालेल्या व्यायम शाळेचे उध्दघाटन  भवानी सिंह घोरपडे सरकार ( माजी उपसभापती पं. स. शिरोळ ) ,  रणजितदादा कदम ( संचालक , दत्त साखर कारखाना शिरोळ ) , पांडुरंग भाट ( सरपंच , अ . लाट ) ,मिलिंद कुरणे ( उपसरपंच , लाट ) , यांच्या हस्ते व्यायमशाळा पाया खुदाईचा समारंभ पार पडला या कार्यक्रमासाठी , शिवनाकवाडी गावातील ज्येष्ठ नागरिक  , गावचे सरपंच सचिन खोत, उपसरपंच , सदस्य , गावातील शिक्षक वृंध, युवक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते .

महाराष्ट्र राज्य डिसीपीएस संघर्ष समितीच्या राज्य अध्यक्ष पदी करणसिंह सरनोबत सर

प्रतिनिधी सतिश लोहार
*
*महात्मा गांधी जयंती व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती याचे औचित साधुन महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयातील डिसीपीएस प्रमुख पदाधिकाऱ्यांची एकत्र मिटींग घेण्यात आली , मिटींग चा विषय राज्य कार्यकारिणी तयार करणे हा होता या मिटींग मध्ये डिसीपीएस बाधंवासाठी अहोरात्र लढणारे , शिक्षकांच्या हक्कासाठी कायम झटणारे , प्रशासनास वेळोवेळी जागे करणारे  कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष  करणसिंह सरनोबत सर यांची महाराष्ट्र राज्य डिसीपीएस संघर्ष समिती च्या राज्य अध्यक्ष पदी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्यातील पदाधिकारी यांच्या सहमताने महाराष्ट्र राज्यातुन बिनविरोध निवड करण्यात आली.