Friday, 30 April 2021

हेरलेत पाच दिवसाचा कडक लॉकडाऊनचा निर्णय

हेरले / वार्ताहर
दि.30/4/21

हेरले (ता. हातकणंगले) येथे कोरोना संसर्ग फैलाव रोखण्यासाठी सोमवार दि. ३ मे ते शुक्रवार दि. ७ मे पर्यंत पाच दिवसाचा कडक लॉकडाऊनचा निर्णय ग्रामपंचायतीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.विक्रेते व्यापारी दुकानदार व्यावसायिक भाजीपाला विक्रेते फळ विक्रेते तसेच संशयित रुग्ण यांची अँटीजन टेस्ट करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून कोल्हापूर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे एक हजार अँटीजन टेस्ट किटच्या मागणीसह  दररोज २५० कोरोना प्रतिबंध लसीची मागणीही केली आहे.
      ब्रेक द चेन या मोहिमे अंतर्गत कोरोना संसर्ग फैलाव रोखण्यासाठी गावातील  फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते , दुकानदार, व्यवसायिक, व्यापारी यांचा नागरीकांशी वस्तूच्या देवघेवीमुळे संसर्ग होण्याचा संभंव असल्याने त्यांची अंटीजेन टेस्ट करून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपयोजना करण्याचे ग्रामपंचायतीने मोहिम निश्चित केली आहे. तसेच खाजगी दवाखान्यातील उपचार घेणारे आजारी संशयित रुग्ण यांचीही खाजगी डॉक्टरांच्या मार्फत माहिती घेऊन त्यांची ही अँटीजेन टेस्ट करण्याचे नियोजन केले आहे. जेणेकरून गावांमधील वरील घटकांच्या टेस्ट झाल्यामुळे कोरोना संसर्ग फैलाव वेळेत रोखता येईल. 
      ग्रामपंचायतीच्या वतीने या अँटीजेन टेस्ट लॅब टेक्नीशियनच्या सहकार्याने होणार आहेत. त्यांना या कार्यासाठी  मानधन  ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे संशयित रुग्णांची तात्काळ चाचणी होईल आणि जे पॉझिटिव्ह येणार आहेत त्यांच्यावर योग्य उपचार केले जातील. या मोहिमेची सुरूवात शनिवार पासून होत आहे.तसेच ग्रामपंचायतीच्यावतीने सर्व खाजगी दवाखाने, सर्व औषधे दुकाने व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दररोज सकाळी व संध्याकाळी सॅनिटायजरची फवारणी पुढील पंधरा दिवस केली जाणार आहे. या उपाययोजनामुळे कोरणा संसर्ग फैलाव रोखता येईल. त्यामुळे  गावांमधील कोरोना रुग्ण संख्या कमी होऊन गाव पूर्णपणे कोरोना मुक्त होईल. 
     या उपयोजनेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडे पत्रव्यवहार करून एक हजार अँटीजन टेस्ट किटच्या मागणीसह दररोज २५० कोरोना प्रतिबंध लसीची मागणीही केली आहे. हेरले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल देशमुख या मोहिमेत सहकार्य करीत आहेत. या बैठकीस सरपंचअश्विनी चौगुले,उपसरपंच सतीश काशीद माजी उपसरपंच विजय भोसले ,राहुल शेटे,सदस्य मज्जीद लोखंडे,आदिक इनामदार,शरद आलमान,बटुवेल कदम,दादासो कोळेकर  सदस्या अपर्णा भोसले,विजया घेवारी, स्वरूपा पाटील,आरती कुरणे,शोभा खोत, ग्रामसेवक संतोष चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. अशी माहिती प्रसिध्दीस माजी उपसरपंच राहूल शेटे यांनी दिली.

Wednesday, 28 April 2021

हेरले येथे कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई - सहा हजारांचा दंड वसूल

हेरले / प्रतिनिधी
दि.28/4/21

हेरले ( ता. हातकणंगले) येथे ग्रामपंचायत व कोरोना संनियंत्रण समितीच्या वतीने ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत गावामध्ये कोरोना संसर्ग फैलाव रोखण्यासाठी कडक नियमांचे पालन सुरू आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर बुधवारी दंडात्मक कारवाई करून सहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
          हेरले येथे सकाळी ७ ते ११ या वेळेतच दुकाने सुरू आहेत. अत्यावश्यक सेवेमध्ये औषध दुकाने व दवाखाने सुरू असतात.मात्र माळ भागावरील एक मिरची व्यापारी नियमांचे उल्लंघन करीत असल्याने त्या व्यापाऱ्यास पाच हजार रुपयाचा दंड आकारण्यात आला. तसेच गावामध्ये विनामास्क फिरणारे, भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेते यांनाही दंड आकारण्यात आला. बुधवार रोजी दंडात्मक कारवाई करून एकूण सहा हजार रुपयांची वसूली करण्यात आली. ब्रेक द चेन या शासन मोहिमेत
हातकणंगले पंचायत समिती व्हिजीट कृषी अधिकारी कारवेकर , मंडल अधिकारी भारत जाधव, तलाठी बी. एस. बरगाले, पोलिस पाटील नयन पाटील, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण , सरपंच अश्विनी चौगुले ,उपसरपंच सतिश काशिद, दादासो कोळेकर , राहूल निंबाळकर आदी कर्तव्य बजावत आहेत. अशी माहिती ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण यांनी प्रसिध्दीस दिली.

Sunday, 25 April 2021

हेरले (ता. हातकणंगले) येथे कोरोनाचा संसर्ग फैलाव रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर विशेष मोहिम

हेरले / वार्ताहर
हेरले (ता. हातकणंगले) येथे कोरोनाचा संसर्ग फैलाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत  व कोरोना सनियंत्रण समितीच्या वतीने विविध मोहिमेद्वारे कार्य सुरू आहे.
       गावांमध्ये शनिवार व मंगळवार या दोन दिवशी भरणारा आठवडी बाजार बंद केला आहे. सर्व दुकाने सकाळी ७ ते११ याच वेळेत सुरू राहण्याचा वेळ निर्धारित करून कडक अंमलबजावणी केली जात आहे. दुकानदारांकडून नियमांचे उल्लघंन झाल्यास पाचशे रूपये दंड ठरविला आहे. गावातून विनामास्क फिरणाऱ्यांवर शंभर रूपये दंड ठरवून आजपर्यंत चार हजार रूपयाचा दंड वसूल केला आहे. गावांमध्ये भाजीपाला विक्रेते गावातील प्रमुख मार्गावर सकाळी व संध्याकाळी सोशल डिस्टन्स ठेवून विक्रीस बसत आहेत.
       साबणाने वारंवार हात स्वच्छ धूवा, मास्क वापरा, सॅनिटाझरचा वापर करा, सोशल डिस्टन्स पाळा असा प्रबोधनपर संदेश दैनदिंन गाडी फिरवून दिला जात आहे. पोलिस पाटील नयन पाटील, सरपंच अश्विनी चौगुले ,उपसरपंच सतिश काशिद माजी उपसरपंच संदीप चौगुले, विजय भोसले, राहुल शेटे, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी व स्वयंमसेवक आदी या समाजसेवेमध्ये कार्यरत आहेत. 

हेरले (ता. हातकणंगले ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत गावे कोरोना मुक्त करण्यासाठी मोहीम

हेरले / प्रतिनिधी
दि.25/4/21

हेरले (ता. हातकणंगले ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत हेरले माले चोकाक अतिग्रे मुडशिंगी रूकडी या सहा गावांमध्ये  ११८ जणांना कोरोणाची लागण झाल्याने ते उपचार घेत आहेत. पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  कोरोना प्रतिबंधक लस ७९१३ जणांनी घेतली आहे.
         हेरले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत हेरले वीस रुग्ण, माले एक रुग्ण ,चोकाक दोन रुग्ण, अतिग्रे चौदा रुग्ण, मुडशिंगी चार रुग्ण, रुकडी सत्त्यात्तर रुग्ण कोरोना संसर्गाचा उपचार घेत आहेत. हेरले गावात एक तर रुकडी गावात चार रुग्णांचा कोरोणा आजाराने मृत्यू झाला आहे.
        वैद्यकिय अधिकारी डॉ. राहुल देशमुख यांनी हेरले गावामध्ये कोरोणाचा फैलाव रोखण्यासाठी व कोरोना मुक्त गाव करण्यासाठी विशेष उपचार मोहिम सुरू करणार आहेत . या मोहिमेमध्ये त्यांनी आशा स्वंयसेविका व अंगणवाडी सेविका यांची नेमणूक केली आहे. त्या प्रत्येक घराघरांतील कुटुंबांतील सदस्यांचे सर्वेक्षण करून कोवीड सदृश्य लक्षणे यांची तपासणी करणार आहेत. ग्रामपंचायतीच्या मदतीने प्रत्येक वार्डात एक ते दोन आरोग्यदूत नेमणूक करून त्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. ते आरोग्यदूत प्रत्येक घरास भेट देऊन नागरिकांचे ऑक्सी मीटरने ऑक्सिजन, थरमलगनने टेंपरेचर स्कॅनिंग करून  ताप, व विविध आजारांची लक्षण आदीची तपासणी केली जाणार आहे. तसेचआजारी रुग्णांना सहा मिनिटे चालवून त्यांची ऑक्सिजन पातळीची पाहणी केली जाणार आहे. त्यामध्ये       गुणदोष आढळल्यास पुढील उपचारासाठी डॉक्टरांना भेटून उपचार घेण्यासाठी सूचना केल्या जाणार आहेत.
       गावातच कोरोना आजारावर उपचार व्हावा यासाठी गावातील खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या पाच डॉक्टरांचा गट केला आहे.  माफक  पाचशे रुपये फीमध्ये विजिट अंडर टेकिंग तपासणी केली जाणार आहे. त्यामध्ये आजारी रुग्णांची लक्षणे वर्गीकरण, औषध उपचार, त्यांना सहा मिनिटे चालवून त्यांची ऑक्सिजन पातळी तपासली जाणार आहे. त्यामध्ये कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास गावातल्या गावातच माफक दरात सामाजिक भान व सामाजिक सेवाभाव या सामाजिक बांधिलकीतून त्यांच्यावर घरी उपचार केले जाणार आहेत. या उपचार गटामध्ये स्वयंस्फूर्तीने डॉ.महावीर पाटील, डॉ. प्रविण चौगुले, डॉ. अमोल चौगुले, डॉ. नितीन चौगुले, डॉ.इमरान देसाई आदी डॉक्टर उपचार सेवा देणार आहेत.
        कोरोणाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधक लस मोहीम एक मार्च पासून सुरु आहे. ४५ ते ५९ वय व  ६० वयावरील नागरिकांना लस देण्याचे कार्य सुरू आहे. या मोहिमेमध्ये  हेरलेमध्ये १८०७ ,मालेमध्ये ६६४ , चोकाकमध्ये १०२१ ,अतिग्रेमध्ये ११३९, मुडशिंगीमध्ये २८४ व रूकडीमध्ये २९९८  मिळून एकूण  ७९१३ लोकांना लस देण्यात आली आहे. अशी माहिती प्रसिध्दीस वैद्यकिय अधिकारी डॉ. राहूल देशमुख यांनी दिली.

Wednesday, 21 April 2021

मौजे माले (ता.हातकणंगले ) येथे पंचायत समिती फंडातून दोन लाख रुपयाच्या विकास निधीतून बौध्द समाज येथे रस्ता खडीकरण व मुरुमीकरण कामाचे उदघाटन

हेरले प्रतिनिधी
दि.21/4/21

     मौजे माले (ता.हातकणंगले ) येथे पंचायत समिती हातकणंगले सदस्या मेहरनिगा जमादार यांच्या सेस फंडातून दोन लाख रुपयाच्या विकास निधीतून  बौध्द समाज येथे रस्ता खडीकरण व मुरुमीकरण कामाचे उदघाटन  झाले. या प्रसंगी  स्वाभिमानी शेतकरी संघटना सरचिटणीस मुनिर जमादार , मालेचे सरपंच प्रताप  पाटील, माजी सरपंच अभय पाटील, माजी सरपंच उमेश पाटील संतोष खोत, दयांनद कांबळे , राहुल मालेकर, कुमार ठोंबरे , विकास कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
       हेरले ( ता. हातकणंगले ) येथे पंचायत समिती सदस्या  मेहरनिगा जमादार  यांच्या सेस फंडातून कोरेगावे पाणंद ( सोनारकी ) येथे पाणंद रस्ता मुरुमीकरनाचा शुभारंभ माजी सभापती राजेश पाटील  यांच्या शुभहस्ते झाला. 
       यावेळी सरचिटणीस मुनिर जमदार , प्रा.राजगोंड पाटील, छत्रपती सोसायटी चेअरमन उदय चौगुले,उपसरपंच सतीश काशीद,माजी उपसरपंच संदीप चौगुले,राहुल शेटे, ग्रामपंचायत सदस्य फरीद नायकवडी,मज्जीद लोखंडे,बटुवेल कदम,विजय मगदूम,कुमार ठोंबरे,अजित कोरेगावे,श्रीपाल कोरेगावे,संजय कोरेगावे,पिंटू कोरेगावे,राजू कोरेगावे आदी उपस्थित होते.
   फोटो 
माले: येथे रस्ता खडीकरण व मुरूमीकरणाच्या कामाचा शुभारंभ सरपंच प्रताप पाटील करतांना शेजारी सरचिटणीस मुनीर जमादार व इतर मान्यवर.

Monday, 19 April 2021

वर्ल्ड मराठा ऑर्गनाझेशन WMO च्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबीर संपन्न - रक्तदात्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : 

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे रक्ताची गरज वाढत आहे पण त्या तुलनेत रक्त साठा अपूरा आहे यासाठी समाजाचे आपणही काही देणे लागतो या भावनेतून वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन WMO च्या वतीने आज (रविवार) आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३६० रक्तदातांनी रक्तदान केले. डॉ. संगीता निंबाळकर, संताजी घोरपडे, दिनेश कदम यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

राम मंगल सांस्कृतिक भवन, सायबर चौक, रिंग रोड, एनसीसी भवनसमोर, कोल्हापूर येथे हे शिबिर झाले. या शिबिराचे आयोजक म्हणून अजय हवालदार, विकास जाधव, निलेश खराडे, जीतू साबळे, ज्ञानेश गावडे, अक्षय तळेकर, संताजी पाटील आणि डब्ल्यूएमओच्या टीमने काम पाहिले.

वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन WMO च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील  २३ जिल्ह्यामध्ये ३६ ठिकाणी एकाच दिवशी रक्तदान शिबिर पार पडले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. या निमित्ताने वर्ल्ड मराठा ऑर्गनाझेशन WMO ची सामाजिक बांधिलकी दिसून आली. 

Friday, 16 April 2021

सभापती डॉ.पद्माराणी राजेश पाटील यांचे कार्य कौतुकास्पद


हेरले / प्रतिनिधी
दि.17/4/21
                                                    

          रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघात महिला व बालकल्याण समितीच्या सभापती डॉ. पद्माराणी पाटील यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन मतदारसंघाचा कायापालट केला आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. असे मत माजी सभापती अविनाश बनगे यांनी व्यक्त केले. ते चोकाक (ता.हातकणंगले) येथील विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. 
    चोकाक येथे महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी पाटील यांनी विविध विकास कामासाठी पन्नास लाखाच्या दरम्यान फंड मंजूर केल्याने त्या विकास कामाचा शुभारंभ करून कामाची सुरूवात झाली. विकास फंडातून ८ लाख २० हजार निधी नवीन अंगणवाडी इमारतीसाठी , ६ लाख निधी आरोग्य उपकेंद्रे दुरुस्ती, ५ लाख निधी विद्या मंदिर दुरुस्ती, ६ लाख निधी शाहू सभागृह ते महावीर पाटील यांच्या घरापर्यंत डांबरीकरण, १५ लाख निधी मातंग समाज ते मकानदार शेत डांबरीकरण,  ५ लाख निधी जनरल स्मशानभूमी दुरुस्ती, गावात हायमास्ट दिवे बसवणे, जैन मंदिर संरक्षण भिंत या सर्व विकास कामाचे उद्घाटन सभापती डॉ. पद्याराणी पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
     यावेळी माजी सभापती  अविनाश बनगे यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ हॉल  बांधकामासाठी ५१ हजार रुपयांची देणगी जाहीर केली.
      यावेळी डॉ.पद्माराणी पाटील, सरपंच मनीषा पाटील, उपसरपंच सुवर्णा सुतार, ग्रामपंचायत सदस्य महावीर पाटील, कृष्णात पाटील, सुकुमार पाटील, मनीषा कुंभार, बाळासाहेब देशिंगे, सचिन पाटील ,बाबासाहेब वन्हाळे, बापूसाहेब आवटे, नयन जाधव, विनायक कांबळे सुरज सुतार, सचिन आलमाने, दीपक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
    फोटो 
चोकाक : येथे विविध विकास कामाचे उद्घाटन करतांना सभापती डॉ. पद्माराणी पाटील सरपंच मनीषा पाटील उपसरपंच सुवर्णा सुतार व इतर मान्यवर .

Tuesday, 13 April 2021

कोरोनाकाळात पालकांनी ऑनलाईन शिक्षणाचा वापर करावा - संजय लाड

*** कोल्हापूर प्रतिनिधी 

कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती संचलित राजर्षी शाहू विद्या मंदिर मध्ये इयत्ता पहिली सेमी इंग्रजीच्या वर्गामध्ये तीस विद्यार्थ्यांचे प्रवेश संपन्न झाले. 
कसबा बावड्यातील सामाजिक कार्यकर्ते संजय लाड यांच्या हस्ते व लक्ष्मण लाखे, रवींद्र लाखे, प्रकाश चौगुले, सतीश पाटील,सुनिल  जाधव, बाबुराव सुतार, नारायण घेवदे, यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्‍यांना मास्क, राजा पाटी इत्यादी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
संजय लाड यांनी पालकांनी आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा वापर करावा व शाळेतील शिक्षक मित्रांच्या सहकार्याने शैक्षणिक सुविधा चा वापर करून 100 टक्के विद्यार्थ्यांना न्याय द्यावा असे प्रतिपादन केले

कार्यक्रमासाठी भारतवीर मित्र मंडळाचे पदाधिकारी, कसबा बावडा रिक्षा मित्र मंडळ यांनी मास्क दिले.
 शाळेचे  केंद्र मुख्याध्यापक डॉक्टर अजितकुमार पाटील यांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा व त्यांचा वापर करून आपल्या मुलांना शिक्षण द्यावे असे आवाहन केले. विद्यार्थी व पालकांचे स्वागत बालवाडीच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुशील जाधव, शिवशंभु गाटे, उत्तम कुंभार, हेमंत कुमार पाटोळे ,सुजाता आवटी, आसमा तांबोळी, तमेजा मुजावर,अनिल जाधव,संजय फराकटे, अजित पाटील,तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. आभार सुजाता आवटी यांनी मांडले.

पहिलीच्या वर्गात १०२ विद्यार्थ्यांचे प्रवेश गुढी पाढव्याच्या शुभ मुहूर्तावर


कोल्हापूर/ प्रतिनिधी
दि.13/4/21
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्ताचे औचित्य साधत विद्या मंदिर कणेरीवाडी शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गात   १०२ विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टंसिंग नियमाचे  करून मास्क सॅनिटायझर वापर करत प्रवेश घेतला.
    विद्या मंदिर कणेरीवाडी ही शाळा
 राज्यात सर्वत्र डिजिटल शाळा म्हणून  नावारूपास आली आहे.या शाळेमध्ये  असलेली  ई लर्निंग सुविधा,  प्रशस्त वर्गखोल्या , क्रीडांगण , डिजिटल क्लासरूम, समृद्ध ग्रंथालय , प्रशस्त संगणक कक्ष , सुसज्ज प्रयोगशाळा , अनुभवी व तज्ञ  शिक्षक वृंद, इयत्ता पाचवी आठवी शिष्यवृत्तीमध्ये  विद्यार्थ्यांच्या यशाची उज्वल परंपरा, चौथी सातवी प्रज्ञाशोध तसेच विविध स्पर्धा परीक्षांचे उत्तम मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे विविध गुणदर्शन स्नेहसंमेलन कार्यक्रम, कृतियुक्त अध्यापन, शाळा विकासात ग्रामपंचायत विविध सहकारी संस्था पालक व ग्रामस्थ यांचा सक्रिय सहभाग ,तसेच अभ्यासू क्रियाशील शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांमुळे ही शाळा दिवसेंदिवस गुणवत्ता विकासाचे विविध उपक्रम राबवून  "अ" मानांकन प्राप्त झाली आहे. जानेवारी 2020 मध्ये शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड  यांनी या शाळेस  भेट देऊन शाळेतील विविध उपक्रमांचे कौतुक केले होते .  विद्या मंदिर  कणेरीवाडी  मराठी व सेमी इंग्रजी  माध्यमाची शाळा आजूबाजूच्या  खाजगी  इंग्रजी माध्यमांच्या शाळांना ही  मागे टाकत एक हजार विद्यार्थी पटसंख्या कडे वाटचाल करत आहे. गुढीपाडव्याच्या  शुभमुहूर्तावर नूतन विद्यार्थ्यांना प्रवेश देणे प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कुमार मोरे, उपाध्यक्ष रवींद्र खोत सदस्य सरदार मोरे, रामचंद्र कदम,  मुख्याध्यापक राहुल ढाकणे, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या संचालिका लक्ष्मी पाटील, छाया पाणारी, विष्‍णू खोत ,दौलतबी  कोल्हापुरे, प्रतिभा पाटील ,जयश्री पाटील ,दिपाली जरग ,मनोहर बावडेकर ,राजू दाभाडे डी बी आरडेकर , शैलजा गरडकर ,अर्चना गुरव ,विद्या जाधव, शुभांगी सुतार ,स्वप्नाली कतगर, सह सर्व शिक्षक उपस्थित होते.

     फोटो 
विद्या मंदिर कणेरीवाडी  शाळेत नविन प्रवेशाची नोंद करतांना अध्यापिका लक्ष्मी पाटील व शिक्षकवृंद

Sunday, 11 April 2021

वर्ल्ड मराठा ऑर्गनाझेशन WMO च्या वतीने कोल्हापूरात रक्तदान शिबीराचे आयोजन

कोल्हापूर प्रतिनिधी - 
राज्यात कोरोना चा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे .जिल्ह्यात दररोज शेकडोने रुग्ण सापडत आहेत मृतांचा आकडा वाढत आहे लोकांना बेड मिळत नाहीत अशा परिस्तिथीत रक्ताचा तुटवडा जाणवत असून रक्तपेढ्यातून रक्ताचा तुटवडा जाणवत आहे अशा वेळी रक्तदात्यांनी पुढं यावं अशी अपेक्षा असताना कोरोना काळात माणुसकीचा झरा म्हणून काम करणारी वर्ल्ड मराठा ऑर्गनाझेशन ही संघटना मानवतेच्या भावनेतून कोल्हापूर येथे रविवार दि 18 रोजी रक्तदान शिबीर आयोजित करत आहे. या शिबिरात जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करून या राष्ट्रीय आपत्तीत समाजाच्या उपयोगी पढावे व जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे असे संयोजकांनी आवाहन केले आहे.
रविवारी सकाळी 8 ते रात्री 5 या वेळेत कोरोना नियमावलीच्या सर्व सूचना पाळून व सर्वांची काळजी घेऊन राम मंगल सांस्कृतिक भवन सायबर चौक रिंग रोड एन सी सी भवन समोर कोल्हापूर येथे हे रक्तदान शिबीर होणार आहे. सर्व रक्तदात्यांनी आपले नाव नोंदणी 
श्री विकास जाधव 7875082089 
अजय हवालदार 9860686870,
 निलेश खराडे 7875169313, 
 जितू साबळे 976585554 यांचेकडे वॉट्स अप च्या माध्यमातून करावे असे आवाहन  करण्यात आले आहे. हा रक्तदानाचा महायज्ञ यशस्वी होण्यासाठी अनेक स्वयंसेवक स्वयंस्फुर्त पणे झटत आहेत . आज कोरोना प्रादुर्भाव पहाता येणाऱ्या काळात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पहाता भविष्यात रक्ताचा तुटवडा जाणवणार आहे .आज अनेक संघटना ,संस्था आरोग्य विभाग,प्रशासन ,पोलीस व स्वछता कर्मचारी आपआपली कर्तव्य चोख बजावत असताना वर्ल्ड मराठा ऑर्गनाझेशन WMO ही संघटना कोरोना काळात अतिशय उत्कृष्ट काम करीत आहे त्याचाच एक भाग म्हणून हे रक्तदान शिबीर आयोजित केले आहे त्यात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवून आपली जबाबदारी पार पाडावी अशी भावना संयोजकांनी बोलून दाखवली आहे.तसेच या रक्तदाना साठी येणाऱ्या प्रत्येकाला पास देण्यात येणार आहे त्यामुळे प्रवासात कोणालाही अडवणूक होणार नाही अशी माहिती संयोजकांनी दिली आहे.

Friday, 9 April 2021

कोरोणा काळामध्ये राजर्षी शाहू शाळेचे कार्य कौतुकास्पद - प्रशासनाधिकारी एस के यादव

कोल्हापूर दि 5 : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती संचलित राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळा क्रमांक 11 कसबा बावडा या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मास्क  आणि 111 पेन वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रशासनाधिकारी एस के यादव साहेब होते. प्रमुख मान्यवर उपस्थित मध्ये शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, सुनील गणबावले, राजेंद्र पाटील, दत्तात्रय डांगरे,  प्रमोद गायकवाड, संजय पोवाळकर, तानाजी इंदुळकर,  उत्तम कुंभार, अभिजीत शिंगाडे, जोतीबा बामणे,  प्रदीप पाटील, तानाजी पाटील इत्यादी होते.
 प्रशासनाधिकारी एस के यादव साहेब यांनी एकविसाव्या शतकातील आधुनिक युगात टिकण्यासाठी व राजर्षी शाहूंचा ऐतिहासिक वारसा लाभलेली तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी शाळा म्हणजे राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळा क्रमांक 11, बावडा कोल्हापूर होय. या शाळेमध्ये आज मास्क वाटप व पेन वाटप कार्यक्रम घेतलेला आहे तो अत्यंत विद्यार्थ्यांना उपयोगी असा आहे कोरणाकाळामध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षतेसाठी शाळेचे केंद्रमुख्याध्यापक डॉक्टर अजितकुमार पाटील यांनी मास्क व पेन वाटप हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा घेतलेला आहे शासनाच्या नियमानुसार पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू आहेत. सोसल डिस्टन्स चा वापर काटेकोरपणे पालन करून विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान आत्मसात करावे व जास्तीत जास्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे बाजारातून जात असताना येत असताना बाहेर पडताना सॅनिटायझर व मास्कचा जरूर वापर करावा. बाजारातुन व  बाहेरून घरी आल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुवावे व आपले वैयक्तिक कपडेसुद्धा सुरक्षित ठेवावेत असे प्रतिपादन केले
शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉक्टर अजितकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना ऑफलाइन अभ्यासक्रम व ऑनलाइन अभ्यासक्रम यांची थोडक्यात माहिती दिली व आपल्या अभ्यासाबरोबरच आरोग्याची सुद्धा काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.एकविसाव्या शतकाला सामोरे जाण्यासाठी आपण एकमेकाला समर्थपणे साथ देणे अत्यंत गरजेचे आहे कारण भारतीय संस्कृती ही प्राचीन काळापासून संस्कारावर अवलंबून आहे रूढी,परंपरा ,चालीरीती या सर्व आपण टिकून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवशंभु गाटे यांनी केले स्वागत व प्रास्ताविक माहिती मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी केले कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार, उपाध्यक्ष अनुराधा गायकवाड, नीलम पाटोळे,सोनाली जामदार, राजू लोंढे,दिपाली चौगले,शिक्षण तज्ञ इलाई मुजावर सर इत्यादी उपस्थित होते.

भारतवीर मित्र मंडळाचे राहुल भोसले,राजू चौगले, सचिन चौगले,विलास भोसले, विलास चौगले, शैलेश पिसाळ, शुभम चौगले इत्यादींनी कार्यक्रम संपन्नत्तेसाठी सहकार्य केले व कार्यक्रमाचे आभार उत्तमराव कुंभार यांनी मानले

प्रशासनाधिकारी एस के यादव साहेब यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, उषा सरदेसाई ,बाळासाहेब कांबळे यांच्या सहकार्याने शाळा दर्जेदार ठेवण्याचे कार्य सर्व शिक्षक वृंद करत आहेत.
 "विद्यार्थी हेच दैवत" हे ब्रीद वाक्य मानून शाळेचे केंद्रमुख्याध्यापक  डॉक्टर अजितकुमार पाटील, इंग्रजी पदवीधर शिक्षक उत्तम कुंभार, टेक्नोसॅवी शिक्षक सुशील जाधव, ॲप निर्मिती चे धडे देणारे तमेजा मुजावर, गणिततज्ञ आसमा तांबोळी, मीना मंचच्या सुजाता आवटी, व्हिडिओ निर्मिती करणारे शिवशंभु गाटे,स्कॉलरशिप तज्ञ विद्या पाटील, बालवाडीच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील, सेवक पाटोळे मामा, मोरे मॅडम शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार, उपाध्यक्ष अनुराधा गायकवाड, भारतवीर मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, शाळेचे माजी विद्यार्थी, पालक वृंद यांचे सहकार्यातून हे ऐतिहासिक वारसा लाभलेली शाळा विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आदर्श नागरिक घडवत आहे.

Monday, 5 April 2021

वडगांव विद्यालयात आरोग्य शिबीर संपन्न


पेठवडगांव / प्रतिनिधी
दि.5/4/21

वडगाव विद्यालय  ज्युनिअर कॉलेज वडगावमध्ये मुली व महिलांसाठी आरोग्य शिबिर संपन्न झाले.
      वडगाव विद्यालय जुनिअर कॉलेज वडगावमध्ये श्रीमती सुशिलादेवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फाऊंडेशन यांच्या अंतर्गत नारी सिद्धी फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने मुली व महिलांसाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिरात नारी सिद्धी फाऊंडेशनच्या संचालिका सुवर्णा बोडके, राधिका निकम, सुजाता पोतदार आदी मान्यवरांनी महिलांना होणाऱ्या गर्भाशयाच्या कॅन्सरची विविध कारणे  व त्यावरील उपाय  या संदर्भात मार्गदर्शन केले व विद्यार्थिनींच्या विविध प्रश्नांचे निराकरण केले. 
   या शिबिरासाठी संस्थेच्या अध्यक्षा प्रा.डॉ.मंजिरी अजित मोरे देसाई यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.या प्रसंगी मुख्याध्यापक आर.आर.पाटील उपमुख्याध्यापक एस.डी.माने, पर्यवेक्षक डी. के. पाटील, ज्येष्ठ शिक्षक डी. एस. कुंभार आदी मान्यवरासह विद्यालय व महाविद्यालयातील सर्व शिक्षिका उपस्थित होत्या. सूत्रसंचालन एस.ए. पाटील यांनी केले. आभार अध्यापिका एस. आर. पाटील यांनी मानले.

   फोटो 
पेठवडगांव:मुलींना व महिलांनाआरोग्य शिबिरामध्ये मार्गदर्शन करताना सुवर्णा बोडके शेजारी राधिका निकम सुजाता पोतदार व अन्य मान्यवर.

राजर्षी शाहूंचा ऐतिहासिक वारसा लाभलेली तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी शाळा म्हणजे राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळा क्रमांक 11



कोल्हापूर मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11 कसबा बावडा कोल्हापूर

शाळेची स्थापना 21 ऑगस्ट 1871

कोल्हापूर: एकविसाव्या शतकातील आधुनिक युगात टिकण्यासाठी व राजर्षी शाहूंचा ऐतिहासिक वारसा लाभलेली तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी शाळा म्हणजे राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळा क्रमांक 11, बावडा कोल्हापूर होय. या शाळेची स्थापना 21 ऑगस्ट 1871 मध्ये झाली. ही शाळा पूर्वी श्री लक्ष्मी विलास पॅलेस कॅम्प कसबा बावडा मध्ये घोड्याच्या पागेत सुरुवात करण्यात आली होती असे पूर्वीच्या रेकॉर्डवर दिसून येते या शाळेचा शताब्दी महोत्सव 3 :2:1975 रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई प्राचार्य आमदार एन डी पाटील, आयुक्त द्वारकानाथ कपूर, शिक्षण सभापती हिंदुराव साळुंखे, कार्याध्यक्ष बा द  पाटील तेव्हाचे मुख्याध्यापक विश्वास जोदाळ यांच्या पुढाकाराने नवीन वास्तूत शाळा बांधण्यात आली होती. 

या शाळेत पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील अडव्होकेट पंडित आळवेकर, शामराव पाटील , बबन पिसाळ, प्रकाश जाखलेकर, भगवान चौगले, तसेच या शाळेमध्ये इंजिनीयर, वकील, डॉक्टर, शासकीय सेवेमध्ये, आदर्श शेतकरी असे कितीतरी यशस्वी व देशासाठी आदर्श नागरिक घडवण्याचे कार्य या शाळेने केले आहे.या शाळेमध्ये बहुसंख्य विद्यार्थी सामान्य कुटुंबांमधील आहेत कष्टकरी, मोलमजुरी करणारे, शेतकरी वर्गातील विद्यार्थी आहेत. 

शाळेतील विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकाला सामोरे जाण्यासाठी दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सुसज्ज मैदान सुंदर शालेय परिसर, संगणकीय शिक्षण, शाळेमध्ये प्रथमच नेस्ट एज्युकेशन दिल्ली यांच्यामार्फत पहिली ते सातवी तील विद्यार्थ्यांच्यासाठी डिजिटल क्लासरूम तयार करण्यात आला आहे. शालेय विविध स्पर्धांच्या माध्यमातून सांस्कृतिक स्पर्धा, कवायत स्पर्धा,भाषण स्पर्धा, एमटीएस, भारती विद्यापीठ इंग्रजी परीक्षा, हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा, रांगोळी स्पर्धा, तसेच सामाजिक राष्ट्रीय प्रश्नावर समाज प्रबोधन करण्यासाठी विविध प्रश्नावर पथनाट्य सादर करण्यात येतात. त्यामध्ये मुलींचे शिक्षण, साक्षरता अभियान , स्वच्छता अभियान, ध्वनी प्रदूषण ,हवा प्रदूषण ,मतदार राजा जागा हो ,पल्स पोलिओ मोहिम, महा स्वच्छता अभियान, प्लास्टिक बंदी इत्यादी पथनाट्याद्वारे समाज प्रबोधन करण्यात येते.

मुलींच्या शिक्षणासाठी मीना मंचच्या माध्यमातून किशोरी मेळावा आयोजित करण्यात येतो त्यामध्ये महिलांच्या साठी व मुलींच्या साठी महिला डॉक्टरांची विशेष मार्गदर्शन देण्यात येते. यामधून मुलींना स्वसंरक्षणासाठी आपण सक्षम कसे पाहिजे हे दाखवून दिले जाते.
दर वर्षी एक मे ते पाच मे या दिवशी शाहू संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येते  या शिबिरामध्ये योगासने, ध्यान धारणा लाठी काठी, शुद्धलेखन ,कूट प्रश्न,इंग्रजी स्पष्ट वाचन बौद्धिक खेळ , अराबिक्स सूर्यनमस्कार,गणित कार्यशाळा, ध्यानधारणा , कागदी पिशव्या बनवण्याची कार्यशाळा , शुद्ध हस्ताक्षर कार्यशाळा , मनशांती तसेच पुस्तक वाचनातून प्रभावी व्यक्तिमत्व विकास कसे असावे या बद्दल दररोज तज्ञांचे आयोजन करण्यात येते.
शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या साठी शिष्यवृत्ती, समाज कल्याण शिष्यवृत्ती, मोफत पाठ्यपुस्तक, मोफत गणवेश, उत्कृष्ट पोषण आहार, दुरच्या विद्यार्थ्यांच्या साठी के एम टी मोफत पास योजना, यासारख्या सुविधा मोफत देण्यात येतात.
हे सर्व शैक्षणिक उपक्रम सुव्यवस्थितपणे पार पडण्यासाठी शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉक्टर अजितकुमार पाटील,उत्तम कुंभार, सुशील जाधव, सुजाता आवटी, तमेजा मुजावर ,आसमा तांबोळी विद्या पाटील सेवक हेमंत कुमार पाटोळे ,मंगल मोरे तसेच बालवाडीचे शिक्षिका कल्पना पाटील व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य सतत कार्यरत असतात शाळेतील नवीन उपक्रमांवर भर दिल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा, आंतरशालेय क्रीडा स्पर्धा, भाषण स्पर्धा ,ऑनलाईन व्हिडिओ स्पर्धा तसेच यावर्षी नेस्ट एज्युकेशन यांनी पावणेचार लाख रुपयांची डिजिटल क्लासरूम बसवलेली आहे त्यामध्ये 1 ली ते 7 च्या सर्व विषय आहेत. कसबा बावडा मधील सामाजिक मंडळे शाळेला सतत मदत करतात त्यामध्ये भारतवीर मित्र मंडळाने आमच्या शाळेला यावर्षी दहा खुर्ची, चार कुंड्या व रोपे तसेच किसान बिल्डर चे मित्र रज्जाक तांबोळी यांनी पहिली वर्गासाठी मोफत खुर्च्या दिलेले आहेत. सनराइज् रोटरी क्लब कोल्हापूर यांनी शाळेसाठी हॅन्ड वॉश स्टेशन, शनिटायझर स्टॅन्ड, दीडशे मास्क, स्टेरिओ बॉक्स, व्हाईट बोर्ड, कॉर्डलेस माइक, भेट दिलेले आहेत.
 शाळेच्या प्रभागातील नगरसेविका माधुरी संजय लाड यांनी अथक प्रयत्नातून दहा लाखापर्यंत चा निधी  समग्र अभियानातून शाळेसाठी भौतिक सुविधा देवून शाळा सुसज्ज करून ठेवलेले आहेत. त्यामुळे शाळेचा परिसर सुसज्ज व नैसर्गिक परिसर असल्यामुळे समाधानाचे वातावरण दिसून येते तसेच वंचित घटकासाठी दर्जेदार शिक्षण पोहोचवण्याचे कार्य सर्व शिक्षक पालक माजी विद्यार्थी करत आहेत.
शाळेच्या सर्वांगीण विकासामध्ये प्रेरणा देणारे ज्या शाळेत पहिली ते सातवी शिकलेले विद्यार्थी अजितकुमार पाटील हे या शाळेचे सध्याचे केंद्रमुख्याध्यापक पदावर काम करत आहेत. त्यांनी विविध पथनाट्याच्या माध्यमातून पर्यावरण जागृती प्लास्टिक बंदी ,पाणी वाचवा जीवन वाचवा ,पक्ष्यांसाठी घरटी, ध्वनि प्रदूषण, विज्ञान शिबिर, शुद्धलेखन कार्यशाळा, शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळा, या  विविध शैक्षणिक उपक्रमातून व माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहेत. त्यांचा शैक्षणिक पट पाहिला असता त्यांचे प्राथमिक शिक्षण राजर्षी शाहू या शाळेमध्ये झालेले आहे, माध्यमिक शिक्षण छत्रपती राजाराम हायस्कूल कसबा बावडा येथे झाली आहे, महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती शहाजी कॉलेज दसरा चौक येथे झालेली आहे. तसेच एम ए मराठी, एम ए इतिहास, एम ए समाजशास्त्र, एम ए शिक्षण शास्त्र, एम एड शिक्षण शास्त्र, मास कम्युनिकेशन, याच वर्षी त्यांनी मराठी विज्ञान साहित्यावर पीएच डी संपादन केलेली आहे. तसेच त्यांनी आत्तापर्यंत 119 चर्चासत्रामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यापैकी 12 आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये, 45 राष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोध निबंध मराठी, इतिहास, पर्यावरणशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र भूगोल, अर्थशास्त्र, संख्याशास्त्र, हिंदी, यादे विविध विषयावर शोधनिबंध सादर केलेले आहेत.62 बेबीनार मध्ये भाग घेतलेला आहे, चार पुस्तके, अठरा वैचारिक लेख, दोन हस्तलिखित,तेरा प्रश्नमंजुषा स्पर्धा
ह्या प्रकारे त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून समग्र साहित्याचे दर्शन दिसून येते. कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या शाळेतील एक प्राथमिक विद्यार्थी याच शाळेत पहिली ते सातवी शिक्षण घेतलेला, तो विद्यार्थी त्याच शाळेत मुख्याध्यापक होऊन आपल्या शाळेतील शाहू बाल संस्कार घेऊन मराठी विषयातील पीएच डी धारक धारक बनलेला आहे, ही बाब प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूरला महानगरपालिकेच्या इतिहासातील गौरवास्पद अभिनंदनीय बाब घडलेली आहे.

एकूणच शाळेच्या शतकोत्तर  सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शाळेतील शिक्षकांनी राजर्षी शाहू महाराज प्रश्नमंजुषा, महात्मा गांधी प्रश्न मंजुषा, ऑनलाईन व्हिडिओ स्पर्धा, यासारख्या ऑनलाइन व ऑफलाइन, अभ्यासाचा वापर करून कोरोना काळामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे काम केले आहे.

प्रशासनाधिकारी एस के यादव साहेब यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली शाळा दर्जेदार ठेवण्याचे कार्य सर्व शिक्षक वृंद करत आहेत.
 "विद्यार्थी हेच दैवत" हे ब्रीद वाक्य मानून शाळेचे केंद्रमुख्याध्यापक  डॉक्टर अजितकुमार पाटील, इंग्रजी पदवीधर शिक्षक उत्तम कुंभार, टेक्नोसॅवी शिक्षक सुशील जाधव, ॲप निर्मिती चे धडे देणारे तमेजा मुजावर, गणिततज्ञ आसमा तांबोळी, मीना मंचच्या सुजाता आवटी, व्हिडिओ निर्मिती करणारे शिवशंभु गाटे,स्कॉलरशिप तज्ञ विद्या पाटील, बालवाडीच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील, सेवक पाटोळे मामा, मोरे मॅडम शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार, उपाध्यक्ष अनुराधा गायकवाड, भारतवीर मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, शाळेचे माजी विद्यार्थी, पालक वृंद यांचे सहकार्यातून हे ऐतिहासिक वारसा लाभलेली शाळा विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आदर्श नागरिक घडवत आहे.

Saturday, 3 April 2021

हेरलेत जमिनीतील अन्नद्रव्य घटक तक्त्याचे अनावरण



हेरले / प्रतिनिधी
दि.3/4/21
हेरले ( ता. हातकणंगले ) येथे शासनाच्या जमीन आरोग्य पत्रिका अभियानाअंतर्गत  गावच्या जमिनीतील अन्नद्रव्य घटक तपासणी तक्त्याचे अनावरण करण्यात
 आले.आणि त्यासंबंधी माहिती सांगण्यात आली.
     या तक्त्यानुसार निरनिराळ्या पिकाच्या आवश्यक खत मात्रा ठरवता येतात, खताचे योग्यप्रकारे नियोजन करता आले तर उत्पादनात कमालीची वाढ होते. शेतकरी बंधूंना या तक्त्याच्या बोर्डद्वारे आपल्या शेतीतील विविध उत्पादनासाठी खत मात्रा किती दयावी याची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. या फ्लेक्स अनवरणावेळी उपसरपंच सतीश काशिद , माजी उपसरपंच राहुल शेटे , ग्रामपंचायत सदस्य बटुवेल कदम, निलोफर खतीब, मजीत लोखंडे ,कृषिमित्र सयाजी गायकवाड, ग्रामसेवक संतोष चव्हाण, कृषी सहाय्यक राहुल पाटील व शेतकरी उपस्थित होते.

       फोटो 
हेरले : शासनाच्या जमीन आरोग्य पत्रिका अभियानाअंतर्गत  गावच्या जमिनीतील अन्नद्रव्य घटक तपासणी तक्त्याचे अनावरण करतांना मान्यवर.