Wednesday, 29 June 2022

आजची बालके - उद्याचे भविष्य - - डॉ अजितकुमार पाटील ,पीएच डी ( मराठी )

*
" बच्चे मनके सच्चे,सबकी ऑनख के है ये तारे।
ये वो फुल है,जो भगवान को लगते प्यारे।।"

आजची बालके ही मनाने निर्मळ असणारी ही बालके, खरेच भारत मातेच्या भविष्यातील उज्ज्वल असे तारे आहेत सृष्टीचा नियमच आहे.ज्याप्रमाणे निसर्गाच्या सानिध्यातील जुनी पाने पडून गळून जातात, त्याजागी नवीन पालवी फुटते, ती झाडाला फुलवते बहरते, सर्वांना फळे-फुले देते अगदी त्याप्रमाणे या आपल्या छोटया-छोटया बालकांची मने असतात. मानवी जात, समाजाचे अस्तित्य, गाव, देश आणि सारे जग हे याच जीवनचक्रातून फिरत असते.

 आजच्या बदलत्या काळानुसार वैज्ञानिक घडामोडींचा विचार केला असता आई-वडील दोघेही नोकरीसाठी बाहेर पडतात. घरात आता आजी-आजोबाही मिळणे अशक्य असते. वाढत्या महागाईने अर्थार्जनासाठी... आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आई-वडील नोकरी करतात.मोल मजुरी, इतर व्यवसाय,नोकरी करत असतात पण बालकांना मात्र उजाडल्यापासून पाळणाघरात भरती व्हावे लागते. वाढती लोकसंख्या आणि विभक्त कुटुंबपद्धती यामुळे हम दो हमारा एक' या संकल्पनेकडे आता कुटुंबे झुकत चालली आहेत. पाळणाघरातही चांगल्याप्रकारे बालकाचे सामाजीकरण होईलच असे नाही. जसजसा बाळ मोठा होतो. तसतसे त्याचे सोबती-दोस्त वाढतात. 'शाळा-शिक्षण-अभ्यास-विविध प्रकारचे क्लास' यामुळे ती मुलेही पूर्णपणे व्यस्त राहतात. आपल्या भावना, आपले विचार कोणापुढे व्यक्त करण्याची ना सोय असते, ना सवड. भीतीमुळे त्यांचे विचार दबले जातात. आई-बाबांशी बोलण्यासाठीही फोनचा आधार घ्यावा लागतो. अर्थातच हे अल्लड वय आणि लहान कोवळ्या वयात समोर असणारी असंख्य प्रलोभने- टीव्ही, जाहिराती, संगीत, गाणी, खेळ, व्हिडिओ आणि आतातर इंटरनेटवरील चिटचॅटींग. नकळत ही मुले वाहवत जातात. आईच्या अंगाई गीताच्या जागी, कसली बसली गाणी-कर्कश आवाज त्यांना ऐकावे लागतात. समोर जेवण-खाण तर ते काढून ठेवलेले किंवा कधी कधी बेकरीतील पदार्थ यावर भागवावे लागते. ना प्रेमाचा हात, ना नात्यागोत्यांची ओळख, ना कुटुंब, ना घर, ना दार, ना गाय आणि ना देश कशाचाच परिचय त्यांना झालेला नसतो... कशाबद्दलचे प्रेम त्यांच्यात निर्माण झालेले नसते.कारण याला आपणच जबाबदार ठरत असतो.

विचार केला असता काळ हा नित्य परिवर्तनशील आहे. तसेच या मुलांना योग्य दिशा दाखविण्यासाठी ही आजकाल विविध संस्था कार्यरत असलेल्या दिसून येत आहेत. शाळाशाळांतून मूल्य शिक्षणाचे पाठ, व्यक्तिमत्त्व विकासाचे वर्ग, क्रीडांगणे, कला-छंद वर्ग,शिबिरे ,प्रयोगशाळा इत्यादी असतातच त्यांचा लाभ विद्यार्थ्यांना घेऊ देणे... त्यासाठी आई-वडील अन् शिक्षक यांनी प्रयत्नशील राहणे आवश्यकच आहे. शालेय कार्यक्रमातून दिनविशेष, थोर नेत्यांच्या जयंत्या, राष्ट्रीय-धार्मिक सण, सहली, स्पर्धा, परीक्षा असेही नानाप्रकारचे उपक्रम राबवले जातात. त्यांचा परिचय, त्यांची ओढ या नवीन मुलांना लावून देणे अतिशय महत्त्वाचे आहे.

आजचे आदर्श नागरिक तयार करण्यासाठी या बालकांना योग्य तो आकार देणे, त्यांची मानसिक, शारीरिक,भावनिक, नैतिक, बौद्धिक वाढ व विकास हा योग्य मार्गाने घडविणे हे आत्ताच्या मोठ्या लोकाचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. ही निरागस, निष्पाप मुले खरोखरीच 'मातीचा गोळा' असतात. त्याला योग्य आकार आपण दिला पाहिजे. अब्राहम लिंकन यांनीही बालकांवर योग्य संस्कार झाले पाहिजेत, यावर मार्गदर्शन केले आहे. संस्कारक्षम वयातच पालकांनी ही जबाबदारी पार पाडली पाहिजे. आपल्या मुलाच्या भवितव्यासाठीच नव्हे तर त्याचबरोबर देशाच्या भविष्याचा विचार करून आपल्या मुलांना आजी-आजोबांचा लळा, प्रेम हे दिले पाहिजे. त्यातूनच एकमेकांबद्दल स्नेह निर्माण होत असतो

आजूबाजूची ही प्रलोभने नको ते संस्कार या कोवळ्या मनावर घडवीत राहतात, त्या जाहिराती... बातम्या चित्रपट यांचा बरोबर उलट परिणाम या मुलांवर होतो आणि ही मुले आळशी-चैनी चंगळवादी बनण्याची शक्यता वाढते. तेव्हा त्यापासून पालक आणि शिक्षक, त्याचबरोबर समाजही मुलांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल तरच भविष्यकाळ आपला व त्यांचा उज्ज्वल राहील. काही वेळा मुले नाहक व्यसनात गुंतत जातात, निराश होतात.
अशावेळी जर त्यांचे योग्य समुपदेशन झाले नाही, तर मुले हातची जातात. त्यांना सुधारणे अवघड होऊन बसते.

'सुदृढ, सक्षम, निरोगी, व्यसनमुक्त, बुद्धिमान बालके ही त्या देशाची बलस्थाने असतात. प्रेम, श्रद्धा, कर्तव्य, चिकाटी,, कष्ट इ. अनेक गुणांचा संचय त्यांच्यात व्हावा म्हणून पालक, शिक्षक, समाज या सर्वांनी जागरूक राहिले पाहिजे, सर्वांत महत्त्वाचे 'पराभव' हसत हसत स्वीकारण्याची आणि 'विजय' संयमाने साजरा करण्याची जाण त्यांच्यात निर्माण झाली पाहिजे. त्यातूनच निश्चितपणे देशाचे भवितव्य हे उज्ज्वल होईल यात शंका नाही.
एकविसाव्या शतकातील बालक हा सक्षम, बलवान, सुसंस्कारित बनविण्यासाठी
म्हणून आपण सर्वांनी मुलांच्या शिक्षणासाठी,योग्य संस्कार घडण्यासाठी आजच कठोर पणे पावले उचलणे गरजेचे आहे.

       जय हिंद।...

Tuesday, 28 June 2022

रा.शाहू महाराज जयंती निबंध स्पर्धेत कल्पना मैलारी प्रथम

कसबा बावडा प्रतिनिधी 

 प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर संचलित राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11 कसबा बावडा कोल्हापूर मध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची 128 वी जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत कल्पना मैलारी यांनी प्रथम क्रमांक पटकावला जानवी तात्या आणि द्वितीय क्रमांक पटकावला तृतीय क्रमांक पटकावला स्नेहल पाटोळे आणि चौथा क्रमांक पटकावला तर अस्मिता लोंढे यांनी पाचवा पटकावला शाळेचे केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी 21 सप्टेंबर एक 1917 स*** राजे शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले यामागे समाजातील दारिद्र अज्ञान नष्ट होण्यासाठी त्यांनी उचललेले पहिले पाऊल होते कारण छत्रपती शाहू महाराजांनी 1911 कोल्हापूर संस्थानाचे एक कमिटी तयार करून त्यांनी सर्व जाती धर्मातील मुलांना वसतिगृहाची स्थापना केली 1911 स्थापन केली त्याचे संपूर्ण श्रेय महाराजांना जाते समाजामध्ये मधील विषमता नष्ट होण्यासाठी किंवा अज्ञान कमी होण्यासाठी ज्ञानानेच लढावे लागेल त्याशिवाय शिक्षणाचा तरणोपाय नाही हे महत्त्वाचे निर्णय छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी घेतले. ज्येष्ठ शिक्षक उत्तम कुंभार यांनी रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमास सुरुवात झाली मीना मंचच्या प्रमुख सुजाता आवटी यांनी मुलींच्या शिक्षणासंदर्भात शाहू महाराजांनी घेतले निर्णय पालकांना समजावून सांगितले आसमा तांबोळी यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमासाठी शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रमेश सुतार ,अनुराधा गायकवाड ,दिपाली चौगुले, दुधिया गनिकोप्पा,कोमल का से नीलम पाटोळे ,सारिका वडर शिक्षण तज्ञ इलाई मुजावर तसेच शाळेतील सुशील जाधव शिवशंभु घाटे तमेजा मुजावर विद्या पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार सुशांत पाटील यांनी मांनले.

जागतिक योग दिन राजर्षी शाहू मध्ये संपन्न

* " .*

प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका अंतर्गत राजर्षी शाहू वि. मं. ११ मध्ये योग शिक्षिका गीतांजली ठोमके यांच्या मार्गदर्शनाखाली व केंद्रमुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटील, ज्येष्ठ शिक्षक उत्तम कुंभार, योग शिक्षिका दिव्याणी हावळ, मीना मंचच्या प्रमुख सुजाता आवटी यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक योग दिन संपन्न झाला

योग शिक्षिका गीतांजली ठोमके यांनी जीवनामध्ये योगशिक्षण अत्यंत गरजेचे आहे. असे प्रतिपादन केले.. केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी जीवनामध्ये आहाराइतकेच योगासन सुदधा अत्यंत महत्वाचे आहे, दररोज आपले मानासिक आरोग्य चांगले राहण्यासाठी योगासन करावे असे प्रतिपादन केले. दैनंदिन जीवन जगण्यासाठी ध्यानधारणा प्राणायाम योगासन यासारखे योगासन करणे अत्यंत गरजेचे आहे मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी व संतुलित राहण्यासाठी योग्य आहार विहार व्यायाम मानवाला अत्यंत गरजेचे आहेत असे प्रतिपादन केंद्र मुख्याध्यापक डॉक्टर राजकुमार पाटील यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तम कुंभार यांनी केले सुत्रसंचालन विद्या पाटील व आसमा तोबोळी थाना केले योगासना मध्ये सुर्यनमस्कार, ध्यानधारणा, प्राणायाम, प्रात्यक्षिके उत्कृष्टपणे सादरीकरण केले. तमेजा मुजावर, हेमंतकुमार सुशिल जाधव, शिवशंभू गाटे. कार्यक्रमासाठी हेमांतकुमार पाटोळे, रणजित निवडे, रमेश सुतार यांनी सहकार्य केले. आभार तमेजा मुजावर यांनी मानले

हेरले येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील विहिरीचे पाणी पूजन उत्साहात


    हेरले / प्रतिनिधी                                                                         हातकणंगले तालुक्यामध्ये कृषी संजीवनी सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. हेरले येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून खुदाई करण्यात आलेल्या विहिरीच्या पाणी पूजन समारंभ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सरचिटणीस मुनीर जमादार यांच्या प्रमुख उपस्थितीत  गौतम दादू कुरणे यांच्या शेतामध्ये संपन्न झाला. 
   या कार्यक्रमासाठी हेरलेचे सरपंच प्रतिनिधी संदीप चौगुले,हातकणंगले पंचायत समितीचे कृषी अधिकारी  सतीश देशमुख, अभिजीत घोरपडे, विस्तार अधिकारी (कृषी).अर्चना कारंडे, सर्जेराव शिंदे, कृषी सेवा केंद्र चालक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावामध्ये विविध ठिकाणी रासायनिक खतांच्या संतुलित वापराबाबत जनजागृती करण्यात आली, तसेच पंचायत समिती कृषी विभागाकडील विविध योजनांची माहिती दिली.
     फोटो 
हेरले येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील विहिरीचे पाणी पूजन मुनीर जमादार  करतांना शेजारी अन्य मान्यवर

Monday, 27 June 2022

श्रीमती महाराणी ताराबाई शासकीय अध्यापक महाविद्यालय (बी टी कॉलेज) माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

कोल्हापूर / प्रतिनिधी
श्रीमती महाराणी ताराबाई शासकीय अध्यापक  महाविद्यालय (बी टी कॉलेज) या महाविद्यालयास ८८ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त १९३४ ते २०२२ या काळातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मेळाव्यास एकूण १७० माजी विद्यार्थी उपस्थित होते. प्रत्येक बॅचचे माजी विद्यार्थी दीर्घ कालावधीनंतर भेटले. वृध्दत्व गाठलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी हितगुज करत आपल्या आठवणींना उजाळा दिला.
येथील  प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या गडकरी सभागृहामध्ये हा स्नेहमेळावा  संपन्न झाला.
यावेळी प्रथम दिप प्रज्वलन व श्री महाराणी ताराबाईच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. बी.एड. प्रथम वर्षाच्या छात्राध्यापकांनी स्वागतगीत सादर केले. 
आपल्या स्वागत आणि प्रास्ताविकात माजी विद्यार्थी मंडळाचे समन्वयक डॉ. सर्जेराव चव्हाण यांनी या मेळाव्याचा उद्देश स्पष्ट करून प्रमुख मार्गदर्शक डॉ. बी. एम. हिर्डेकर यांचा परिचय करून दिला. 
                 याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक डॉ. बी.एम.हिर्डेकर,डॉ.पी.एस.पाटणकर, माजी प्राचार्य डॉ.एस.बी.कांबळे,डॉ. एम.एन.हंडाळ, अशोक जाधव, एस.के.देसाई, प्रभाकर हेरवाडे,बोराडे यांचा सत्कार करण्यात आला.
अरविंद देशपांडे लिखित सृजनाची स्वप्न जागवताना या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
   महाविदयालयामध्ये प्रथम क्रमांक आलेल्या बी.एड.विदयार्थीनींना मान्यवरांच्या हस्ते भागिरथी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.   यावेळी डॉ.पी.एस.पाटणकर,डॉ.एल.एस.पाटील,डॉ.एस.बी.कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख मार्गदर्शक डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सी.वाय. कांबळे यांनी माजी विदयार्थी मंडळ स्थापन करण्याचा उददेश स्पष्ट करून महाविद्यालयात वर्षातून तीन उपक्रम माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत होतील. असे त्यांने सांगितले.
  माजी विदयार्थी प्रभाकर हेरवाडे यांनी  आभार मानले. माजी विदयार्थीनी श्रीमती पी.एन. कुलकर्णी यांनी पसायदान सादर केले.माजी विदयार्थी मंडळाचे समन्वयक डॉ.सर्जेराव चव्हाण व  प्रभाकर हेरवाडे यांनी माजी विदयार्थी कार्यकारी मंडळाची स्थापनाकेली.यावेळीप्रा.डॉ.ए.बी.साळी,डॉ.एल.एस.पाटील,प्रा.जी.एम.माने, एस.ए.मोहिते, बी. जी. बोराडे आदी मान्यवरांसह विविध कार्यालयीन कर्मचाऱ्यांसह  माजी विद्यार्थी उपस्थित होते.
     फोटो 
माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात दीप प्रज्वलन आणि फो हेटो पूजन प्रसंगी प्राचार्य डॉ.सी वाय.कांबळे, डॉ.बी.एम. हिर्डेकर, डॉ. सर्जेराव चव्हाण, प्रभाकर हेरवाडे व इतर मान्यवर.

Saturday, 25 June 2022

संभापूर गावचे सरपंच प्रकाश झिरंगे यांना एल्फस राज्य सरकार विश्वविद्यालय दिल्ली यांच्या वतीने डॉक्टरेट प्रदान

हेरले / प्रतिनिधी

 एल्फस राज्य सरकार विश्वविद्यालय दिल्ली यांच्या वतीने हातकणंगले तालुक्यातील संभापूर गावचे कर्तव्यदक्ष व विविध पुरस्काराने सन्मानित लोकनियुक्त सरपंच प्रकाश विष्णू झिरंगे यांना रविवारी दिल्ली येथे उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल डॉक्टरेट पदवी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
  या कार्यक्रमास डॉ. के. डी.आर्या,जनरल सेक्रेटरी आय. एस. एस. सी. इंडिया युनिव्हर्सिटीचे कुलपती जनरल सेक्रेटरी एन.आय.सी. डी. एस. एस. सी. इंडिया डायरेक्टर जनरल ए.आय. आय. पी. पी. एच. एस. इन्स्टिट्यूट इंडिया प्रेसिडेंट यु.ए. डब्ल्यू सी इंडिया संभापुर गावचे माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष  विजय भोसले, तानाजी भोसले पापा, सुनिल झिरंगे ,सुभाष उर्फ प्रताप कोकाटे आदी संभापूरचे मान्यवर या कार्यक्रमास दिल्ली याठिकाणी ली मेरिडियन हॉटेलमध्ये उपस्थित होते.
   फोटो 
हातकणंगले तालुक्यातील संभापूर गावचे सरपंच प्रकाश झिरंगे यांना एल्फस राज्य सरकार विश्वविद्यालय दिल्ली यांच्या वतीने डॉक्टरेट पदवी प्रदान करतांना मान्यवर.

समता दिंडीमध्ये माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूरचा सहभाग मोठ्या प्रमाणात - दोन हजार विद्यार्थी सहभागी


        

कोल्हापूर /प्रतिनिधी

         दिनांक 26 जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती  'सामाजिक न्याय दिन' म्हणून साजरी करण्यात आली. शासन निर्देशानुसार आज समता दिंडीचे आयोजन दसरा चौक मधून करण्यात आले होते. या समता दिंडी मध्ये कोल्हापूर शहरातील माध्यमिक शाळांतील दोन हजार विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा व शालेय गणवेशासह सहभाग घेतला. यामध्ये चार चित्ररथ, एक लेझीम पथक, एक झांज पथक याचा समावेश होता. अशी माहिती प्रसिद्धीस पत्रकाद्वारे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली.
          दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या शाळा खालील प्रमाणे आहेत -  देशभूषण हायस्कूल ( १०० विद्यार्थी), नेहरू हायस्कूल ( १००विद्यार्थी), साई हायस्कूल ( १०० विद्यार्थी),  दादासाहेब मगदूम हायस्कूल (८० विद्यार्थी),  सेंट झेवियर्स हायस्कूल ( २०० विद्यार्थी),  होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल ( १०० विद्यार्थी),  प्रायव्हेट हायस्कूल ( २००विद्यार्थी),  नूतन मराठी विद्यालय ( ५०विद्यार्थी),  म. ल. ग. हायस्कूल ( १०० विद्यार्थी),  वि. स. खांडेकर प्रशाला ( १००विद्यार्थी),  एस्तर पॅटन हायस्कूल (५० विद्यार्थी),  राजर्षी शाहू हायस्कूल जुना बुधवार (१०० विद्यार्थी), छत्रपती शाहू विद्यालय न्यू पॅलेस ( १०० विद्यार्थी), महाराष्ट्र हायस्कूल ( २०० विद्यार्थी),  न्यू हायस्कूल ( १००विद्यार्थी),  पद्माराजे विद्यालय ( १००विद्यार्थी),  एस एम लोहिया हायस्कूल ( २००विद्यार्थी).
           खालील शाळांनी चित्ररथ तयार केले -  महाराष्ट्र हायस्कूल, एस एम लोहिया हायस्कूल, नेहरू हायस्कूल व साई हायस्कूल.  महाराष्ट्र हायस्कूलचे लेझीम पथकही होते. तसेच करवीर प्रशाला, विक्रमनगरने  ४०विद्यार्थ्यांचे झांज पथकासह सहभाग घेतला. याचे नियोजनासाठी दि. २१जून रोजी सहभागी शाळांच्या मुख्याध्यापकांची सभा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या दालनात झाली. सहभागी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व मुलांचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर  यांनी अभिनंदन केले.

Thursday, 23 June 2022

निधन वार्ता

पेठ वडगांव /प्रतिनिधी
शिगांव (ता.वाळवा)जि. सांगली येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती कमल विश्वासराव बारवडे यांचे   ( ७८ वय ) व्या  वृद्धापकाळाने आज गुरुवार दि. २३ जून रोजी निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात तीन मुले,सुना व नातवंडे असा परिवार आहे.
  सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी सरचिटणीस अजित बारवडे व वडगाव हायस्कूलचे शिक्षक मिलिंद बारवडे  यांच्या त्या आई होत.
शनिवार दि. २५ जून रोजी रक्षाविसर्जन कार्यक्रम शिगांव येथे सकाळी १० होणार आहे.

Tuesday, 21 June 2022

सरोली, ता.गडहिंग्लज,येथे *"शक्तिमान-पैडी रोपक"* भातरोप पेरणी यंत्राचे प्रात्यक्षिकाचे आयोजन

*

कोल्हापूर प्रतिनिधी

महाराष्ट्र शासन कृषी विभाग,शक्तिमान (तिर्थ ऍग्रो  टेक्नॉलॉजी प्रा.ली.-शक्तिमान शेती अवजारांचे उत्पादक) व ट्रेंडी एंटरप्राइजेस, कोल्हापूर (अधिकृत वितरक)* यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि.२२/०६/२०२२ श्री नागेश बामणे,सरोली, ता.गडहिंग्लज,येथे *"शक्तिमान-पैडी रोपक"* भातरोप पेरणी यंत्राचे  प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे, तरी आपण या प्रात्यक्षिक कार्यक्रमास उपस्थित राहून आधुनिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या भात लागवड पद्धतीची माहिती घ्यावी,ही विनंती..
वेळ: सकाळी ठीक १० वाजता. संपर्क- ९९२२५०७०८९,९९२२५०००८४

Saturday, 18 June 2022

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिये शिये हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचा दहावीचा निकाल शंभर टक्के

शिरोली / प्रतिनिधी

शिये येथील नवजीवन
 शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिये शिये हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला . 35 विदयार्थी उच्चोत्तम श्रेणी,27 प्रथम श्रेणी ,14 ब्दितीय श्रेणी ,5उत्तीर्ण श्रेणी .एकूण ८१ विदयार्थी परीक्षेस बसले होते सर्व विदयार्थी पास झाले.गुणानुक्रमे आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे:कु . निकिता संभाजी पाटील ( 95 टक्के ) कु . वृषाली प्रकाश शिसाळ ( ९३ .८० टक्के ) प्रथमेश प्रविण चव्हाण ( ९३टक्के) कु . अपेक्षा किरण कांबळे ( ९२ .८०टक्के ), कु .वेदिका मनोहर काशिद( ९२टक्के )या विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्था पक अध्यक्ष दत्तात्रय गाडवे , मुख्याध्यापक के.व्ही.बसागरे , माजी मुख्याध्यापक आर.बी. कुरणे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले

Wednesday, 15 June 2022

सलग एक तास छत्रपती शाहू महाराजांच्या वेशभुषेमध्ये स्केटींग करत भारतभूषण डॉक्टर केदार विजय साळूंखे याचे स्केटींग मध्ये नॅशनल रेकॉर्ड

हेरले /प्रतिनिधी

छत्रपती शाहू महाराज यांच्या 100 व्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा प्रशासन कोल्हापूर आयोजित वंदन लोकराजा 6 मे 2022 रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्धता पाळुन आदरांजली  वाहण्याचा तसेच विविध कार्यक्रमा आयोजित  करण्यात  आले होते  9 वर्षीय  भारतभूषण डॉक्टर  केदार विजय साळुंखे यांनी शाहू महाराजांची वेशभूषा करून 1 तास  लॉग स्केटिंग केले. त्याचा राष्ट्रीय रेकॉर्ड बुकमध्ये नोंद  झालेबाबत चा विक्रम आज माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर श्री राहुल रेखावार यांनी घोषित करून त्यांचा सत्कार केला. सदरवेळी स्केटींग  कोच सचिन इंगवले  यांचा तसेच हर्षल सावंत  नक्षत्र रियल इस्टेट व डेव्हलपर्स सांगली यांचा विशेष  सत्कार करण्यात आला.डाॅ.केदार साळुंखे यांने  अवघ्या सातव्या वर्षी सायकलिगमध्ये एकाच बुकमध्ये एका वेळी  चार रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय ठरला. आतापर्यंत   स्केटींग  व सायकलिंगमध्ये  18 विश्वविक्रम नोंदवले आहेत.डाॅ. केदार यास वयाच्या सातव्या वर्षी  'डॉक्टरेट इन ॲथलेटिक्स ' ही पदवी देऊन  द दायसेस ऑफ अशिया चेन्नई तामिळनाडू  सन्मानित केले असून मेजर ध्यानंचद राष्ट्रीय खेळाडू पुरस्कार ही मिळाला आहे.नुकतेच त्याला अटल युथ अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे. 
           डाॅ.केदार साळुंखे याला विबग्याेर स्कुल च्या प्राचार्या स्नेहल नावेॅकर,   प्रशिक्षक सचिन इगंवले, स्वप्निल काेळी, वडिल विजय साळूंखे व आई स्वाती गायकवाड साळूंखे यांचे  मार्गदर्शन लाभले आहे.

Tuesday, 14 June 2022

मौजे वडगाव येथील स्मशानशेडचे छत उघडेच, प्रेत दहन करण्यास अडचण - - ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष


 हेरले /प्रतिनिधी

 मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील सार्वजनिक स्मशान शेडचे वादळी वाऱ्यात उडालेले पत्रे ग्रामपंचायतीने बसविले नसल्याने प्रेत दहन करण्यास अडचणीचे होत आहे. पावसाचे पाणी थेट शवदाहिनी वरच पडत असून प्रेताला अग्नी द्यायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
   २८ एप्रिलला झालेल्या वादळी पावसामुळे मौजे वडगाव येथील सार्वजनिक स्मशानशेडच्या पत्र्याचे छत उडून वरील पत्रे अस्ताव्यस्त विस्कटलेले असून काही पत्रे उडून गेले आहेत. मात्र दीड महिना होऊन गेले तरीही ग्रामपंचायतीने अद्यापही या शेडची दुरूस्ती केली नाही. सध्यास्थितीत स्मशान शेड उघडेच असल्याने प्रेताला अग्नी देणे अडचणीचे होणार आहे. कारण वरून पडणारे पावसाचे पाणी थेट शवदायिनी वरच पडत आहे. त्यामुळे मोठा पाऊस पडण्या अगोदर या स्मशान शेडची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे .
 

     प्रतिक्रिया
 १)पावसाळ्याच्या तोंडावर स्मशान शेडचे पत्रे बसवलेले नाहीत ही फार लाजिरवाली गोष्ट आहे. मृत व्यक्तीचा शेवट तरी त्याची हेळसांड न करता व्हावा.
 सुरेश कांबरे
 शिवसेना शहरप्रमुख 
  
२)मी वेळोवेळी प्रशासनाला स्मशान शेड संदर्भात सूचना देऊन सुद्धा त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पावसाळ्यात होणारी लोकांची गैरसोय ग्रामपंचायतीने थांबवावी.
 अवधूत मुसळे
 ग्रामपंचायत सदस्य

फोटो 
 मौजे वडगाव येथील स्मशान शेड ची झालेली दुरावस्था

Monday, 13 June 2022

मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड ची स्मिता बुडके मुरगुड केंद्रात प्रथम.

ज्युनिअर कॉलेजचा एकूण निकाल 99.37 टक्के,
विक्रमी निकालाने पालक विद्यार्थी वर्गात समाधान

कोल्हापूर प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी 2022 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत मुरगूड केंद्रात मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड च्या स्मिता दिगंबर बुडके हिने 87.67 टक्के मार्क मिळवुन केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला .मुरगुड विद्यालय विज्ञान आणि वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून कला शाखेचा निकाल 98. 65 टक्के लागला आहे. शाळेचा यावर्षीचा एकूण निकाल 99.37 इतका विक्रमी लागल्याने पालक विद्यार्थी वर्गात समाधानाचे वातावरण आहे
  विज्ञान शाखा.
  सानिका संजय मगदूम 83.50,
साहिल चंद्रकांत बरकाळे 80.33,
 यश विजय हावळ 80 ,
जगदीश श्रीकांत बेलेकर 79.83,
 प्रतिक्षा प्रकाश जाधव 78.50,
तृप्ती दिगंबर कांदळकर 78.33,
दर्शना दत्तात्रय चंद्रेकर 78,
अनुराधा सागर दाभोळे 77.33,
आरती सागर दाभोळे 76 .33,
साक्षी नामदेव कोळी 75 .50 ,
सानिका बाजीराव देसाई 75 .50 
श्रुती जयवंत कुरडे 75.33,
अजिंक्य आनंदा मांगोरे 75 .17,
अनुष्का सुनील पाटील 75.17 
ऋतुजा शशिकांत मेंडके 75 .17

वाणिज्य शाखा..
 
स्मिता दिगंबर बुडके 87.67
 मधुरा बाळकृष्ण रावण 83.67 
साक्षी तुकाराम भराडे79.33
 श्रेया तानाजी गुरव 76 
साक्षी बाबासो ढेंगे 73 
सुप्रिया संजय तांबेकर 72.17
 सानिका दत्तात्रय वडडर 71,
सोनाली साताप्पा पाटील 70 .50,
वैष्णवी कृष्णात पाटील 70.50,
सानिका संजय मोरबाळे 69.83 ,
प्रज्ञा परशुराम जाधव 68 .50

कला शाखा.. 

सानिका शिवाजी पाटील 74.50,
ऋतुजा अरूण यमगेकर 71.33,
ऋतुजा मारुती ढेंगे 71.33,
जानव्ही नंदकुमार व्हरांबळे 70 .50 ,धनराज सागर गवळी 69.17 
माया बाबुराव धनगर 68.83,
अमृता हल्लापा खद्दी 68.67,
प्रतीक प्रकाश बेलेकर 67 .67 ,
सुप्रिया पांडुरंग कुंभार 67.17 
वैष्णवी विठ्ठल लोकरे 67.17 
सुहानी बळवंत बरकाळे 65.17 
सुशांत कृष्‍णा इंदलकर 65 .17

यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर चे सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई, अध्यक्ष श्रीमती शिवानी देसाई ,उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, प्रशासन अधिकारी डॉ. मंजिरीताई देसाई मोरे , कौन्सिल मेंबर युवा नेते दौलतराव देसाई, कोजिमाशी चे अध्यक्ष बाळ डेळेकर, प्राचार्य एस. आर. पाटील, उपप्राचार्य एस. पी .पाटील, उपमुख्याध्यापक एस.बी .सूर्यवंशी पर्यवेक्षक एस.एच. निर्मळे यांचे प्रोत्साहन तर सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले

खासदार धनंजय महाडिक यांचे पुलाची शिरोलीत जल्लोषात स्वागत

हेरले / प्रतिनिधी

सन २०१९ नंतर पराभवाचे अनेक धक्के महाडिक परिवार व कार्यकर्त्यांनी सहन केले आहेत. या पराभवामुळे आपले राजकीय खच्चीकरण झाले होते. पण आपण डगमगलो नाही. अखेर भारतीय जनता पक्षाने आपणास राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. सर्वांच्या सहकार्याने विजयी झालो. अशी प्रतिक्रिया नुतन खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली. ते पुलाची शिरोलीत स्वागत प्रसंगी बोलत होते.
 खासदार धनंजय महाडिक यांचे पुलाची शिरोलीत फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांना साष्टांग नमस्कार घालून खासदार महाडिक यांनी आशिर्वाद घेतला. त्यानंतर महाडिक कुटूंबाच्यावतीने फेटा, शाॅल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी खासदार महाडिक यांनी आमचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या मार्गदर्शनानुसार आपण जिल्हात राजकारण करीत आहे. त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी आपणास संकटात गंभीरपणे पाठीशी उभे राहून सहकार्य करीत आहेत.‌ भारतीय जनता पक्षाने आपणास खासदार करुन फार मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांच्या विश्वासास पाञ राहून जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन करणार असल्याचे सांगितले. 
ते पुढे म्हणाले, भारतीय जनता पक्षाने मला राज्यसभेची उमेदवारी दिली आणि  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चाणाक्ष राजकीय निती व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या सह टिम भाजपने केलेल्या सहकार्यामुळे आपला विजय झाला असे महाडिक यांनी सांगितले.
माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या निवासस्थानी रविवारी सकाळी अकरा वाजल्यापासून भाजप व महाडिक गटातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने जमा झाले होते. खासदार महाडिक यांचे दुपारी तीनच्या सुमारास महाडिक यांच्या बंगल्यात आगमन झाले. यावेळी फटक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
चौकट.....
गेली चार वर्षे झाली महाडिक परिवारातील व्यक्तीला निवडणूकीत गुलाल लागला नव्हता. पण येथून पुढे गुलाल लागणार असे खासदार महाडिक यांनी सांगितले.
  याप्रसंगी माजी आमदार अमल महाडिक, स्वरुप महाडिक, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक, सौ.‌ मंगलताई महाडिक, सौ.‌ग्रिष्मा महाडिक, विश्वास महाडिक, ओम महाडिक यांचेसह  दलितमित्र अशोकराव माने, नगरसेवक सत्यजित कदम, विजय सुर्यवंशी, छत्रपती राजाराम साखर कारखाना चेअरमन दिलीप पाटील, वडगाव बाजार समिती सभापती सुरेश पाटील, शिवाजी रामा पाटील, विजय पाटील,  भाजपचे तालुकाध्यक्ष राजेश पाटील, धनाजी पाटील, डॉ. सुभाष पाटील, सलिम महात, योगेश खवरे, प्रकाश कौंदाडे, बाळासो पाटील, धनाजी यादव, विजय जाधव, राजहंस पाटील, शितल पाटील, बबन संकपाळ, संदीप तानवडे, सचिन गायकवाड  आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,
फोटो.....
पुलाची शिरोली येथे नुतन खासदार धनंजय महाडिक यांचे औक्षंण करताना माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक,  प्रसंगी माजी आमदार महादेवराव महाडिक, स्वरुप महाडिक,अमल महाडिक,ओम महाडिक आदी.

Sunday, 12 June 2022

मौजे वडगांव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न


हेरले /प्रतिनिधी

मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथे रविवार दि. १२रोजी मारुती मंदिरामध्ये  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत, माने केअर हॉस्पिटल, जयसिंगपूर व भूपाल कांबळे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन भाजपा शाखा मौजे वडगांव यांच्या वतीने करण्यात आले होते.
   यावेळी दलितमित्र जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने ,भाजपा तालुका अध्यक्ष राजेश पाटील व इतर ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अशोकराव माने यांनी शासनाने दिलेल्या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा यासाठी स्वतः पुढाकार घेत असल्याचे सांगितले.तसेच तालुका अध्यक्ष राजेश पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये भागातील सर्व गोरगरीब, कष्टकरी जनतेने या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
  हे शिबिर‌ भूपाल कांबळे यांच्या प्रयत्नातून आयोजित ‌ करण्यात आले होते.या शिबिराचा २२६ लोकांना फायदा झाला .यावेळी भाजपा शाखाध्यक्ष पवन जाधव यांनी योजनेची ओळख करून दिली . डॉ.अभिजित माने व त्यांचे वैद्यकीय युनिट उपस्थित होते. अशोकराव माने यांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल ओंकार जाधव यांनी आभार मानले.यावेळी सुनील खारेपाटणे, अमोल झांबरे, राहुल चौगुले, अजमुद्दिन हजारी,शब्बीर हजारी,पवन सावंत,संकेत सोनवणे,सागर कांबळे,निहाल तराळ, विशाल तराळ ,प्रथमेश तोरसकर आदी उपस्थित होते.

Thursday, 9 June 2022

संजय घोडावत ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे एचएससी परीक्षेत यश


हेरले / प्रतिनिधी

मार्च २०२२  मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एच एस सी) परीक्षेत संजय घोडावत ज्युनिअर कॉलेज कॉमर्स व सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून १०० % निकालाची परंपरा कायम राखली आहे.
इयत्ता १२  वी सायन्स मध्ये ४९५ विद्यार्थ्यापैकी ४६९ विद्यार्थी व कॉमर्स शाखेच्या ५७ विद्यार्थ्यांपैकी ५४ विद्यार्थ्यांनी  ७५ % गुणांपुढे असून विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये कॉमर्स शाखेतून सृष्टी साखरे -९५ % गुण-प्रथम क्रमांक, समृद्धी अनाजे, पार्थ दाहोत्रे व श्रुती हुल्ले - ९३.५० % गुण-द्वितीय क्रमांक, विवेक चव्हाण  याने ९३.३३% %गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तसेच  स्नेहा पाटील-९२%, रिद्धी संघानी-९२%, रिया देशमुख-९१.८३%, सानिया जसुजा-९१.५०% व निकिता हरण-९०.३३% गुण मिळवून घवघवीत यश मिळविले आहे.
यामध्ये सायन्स शाखेतून सारा जाधव -९५.५० % गुण-प्रथम क्रमांक, आर्या आळवेकर -९४ %गुण-द्वितीय क्रमांक, कुलदीप पुजारी याने ९२.८३ %गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तसेच ऋता भणगे -९२.६६ %, सलोनी शिंदे- ९२.६६ % गुण मिळवून दैदीप्यमान यश संपादन केले आहे.
याचबरोबर सायन्स शाखेतून आय टी विषयात ३५ विद्यार्थी, कॉमर्स मधून १ विद्यार्थीनी तसेच कॉमर्स शाखेमध्ये गणित विषयात सृष्टी साखरे व स्नेहा पाटील यांनी  १०० पैकी १०० गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
याबद्दल बोलताना संचालक श्री.वासू सर म्हणाले '' जुनिअर कॉलेजने आपल्या उच्चांकी निकालाच्या माध्यमातून पालक व विद्यार्थी यांची विश्वासाहर्ता प्राप्त केली आहे आणि ही यशाची परंपरा कायम ठेवण्यासाठी आम्ही तत्पर राहू''.
या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी संचालक वासू सर, सेंटर हेड गुप्ता सर, प्राचार्या सौ.चैताली गुगरी व सर्व स्टाफ, विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

सुभाष सदाशिव पाटील यांची राष्ट्रसेवा प्रशाला या हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी निवड

कोल्हापूर / प्रतिनिधी
शिरोली येथील सुभाष सदाशिव पाटील यांची राष्ट्रसेवा प्रशाला या हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी  निवड करण्यात आली आहे.  सुभाष पाटील हे गेली तीस वर्ष या हायस्कूलमध्ये ज्ञानार्जनाचे  काम अविरतपणे  बजावत आहेत. हायस्कूलची निर्मिती करत असताना सुरुवातीची तब्बल एक दशकाहून अधिक काळ त्यांनी नाम मात्र पगारावर नोकरी केली. त्यानंतर अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील लोकांच्या संपर्कात राहुन शाळेला शासकीय मान्यता मिळवली व त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांचे सह सर्व शिक्षकांचे जीवनमान फुलले. या हायस्कूलचा दहावी बोर्डाचा निकाल शंभर टक्के लागण्याची परंपरा त्यांनी सर्वांच्या सहकार्याने अविरतपणे सुरू ठेवली आहे. या निवडीबद्दल त्यांचे शिरोली पंचक्रोशीत व शैक्षणिक संस्थांच्या वतीने अभिनंदन  होत आहे. याकामी संस्थेचे अध्यक्ष आनंदराव पोवार, उपाध्यक्ष बाजीराव सातपुते व संचालक मंडळ यांचे सहकार्य लाभले.


             "मैञीसाठी कायपण"

या शाळेचे मुख्याध्यापक शंकर बाबूराव चौगुले यांचा कालावधी दोन वर्षे शिल्लक होता. पण त्यांची व सुभाष पाटील यांची मैञी म्हणजे शोले मधील जय विरु सारखी. आपल्या नंतर सुभाषला अवघी दोन वर्षे मुख्याध्यापक पदी नियुक्ती होणार होती. शाळेच्या संपूर्ण उभारणीत दिलेले योगदान व मैत्रीचा विचार करून चौगुले यांनी पदाचा राजीनामा दिला व पाटील यांना मुख्याध्यापकाची संधी दिली. या त्यांच्या योगदानाच आदर्श इतरांनाही घेतला पाहिजे.

Tuesday, 7 June 2022

संजय घोडावत विद्यापीठाच्या ५२ विद्यार्थ्यांची विप्रो कंपनीमध्ये निवड


हेरले प्रतिनिधी

शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविलेल्या संजय घोडावत विद्यापीठाच्या  मेकॅनिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेकट्रीकल व एरोनॉटिकल इंजिनीरिंग विभागाच्या ५२ विद्यार्थ्यांची  विप्रो  कंपनीमध्ये निवड झाली आहे. घोडावत विद्यापीठाने अगदी कमी कालावधीत विविध मानांकने मिळवून आपला शैक्षणिक दर्जा उंचावला आहे.
या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री संजयजी घोडावत, विश्वस्त  विनायक भोसले, कुलगुरू डॉ. अरुण पाटील, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे , संचालक डॉ.व्ही.व्ही.कुलकर्णी, अकॅडमिक डीन डॉ. उत्तम जाधव  यांनी सर्वांचे अभिनंदन केले.


दरवर्षी संजय घोडावत विद्यापीठाच्या  ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत अनेक राष्ट्रीय  व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केले जातात.

विप्रो एक प्रख्यात कंपनी असून जगभरात विविध देशात या कंपनीच्या शाखा आहेत.आय टी क्षेत्रात  या कंपनीने आपला नावलौकिक प्राप्त केला आहे.  या पूल कॅम्पस ड्राईव्ह मध्ये सांगली व कोल्हापूर, जिल्ह्यातील इंजिनीरिंग विभागाच्या  विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

नैसर्गिक कलचाचणी, तांत्रिक फेरी, एच आर मुलाखत या निकषाच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

या निवडीसाठी संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा.स्वप्निल हिरीकुडे,  ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर मकरंद जोशी व फॅकल्टी कोऑर्डिनेटर्स प्रा. सुरभी गायकवाड ,प्रा. प्राची शिंदे, प्रा. विकास भंडारी व प्रा. पंकज गवळी, प्रा. व्ही.बाबू यांचे सहकार्य लाभले.

Monday, 6 June 2022

हेरले येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ वी जयंती उत्साहात संपन्न

हेरले /प्रतिनिधी

हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील समस्त धनगर समाज यांच्या वतीने
छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध व्याख्याते व इतिहास संशोधक प्रा.अरूण घोडके यांचे "शिवशाही व होळकरशाहीचे भारतीय इतिहासातील योगदान " या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे भूषणसिंहराजे होळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंतीनिमित्त गावातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीमध्ये गावातील  धनगर समाजतील अबाल वृध्दासह समाज बांधव सहभागी झाले होते.
     व्याख्यानानंतर  भव्य धनगरी ओवी स्पर्धा संपन्न झाल्या.प्रथम क्रमांक- संत बाळुमामाओविकार मंडळ खुपिरे,द्वितीय क्रमांक- बिरदेव टिव्ही स्टार ओविकार मंडळ वाशी,तिसरा क्रमांक- धुळसिद्ध बिरदेव ओविकार मंडळ भादोले,चतुर्थ क्रमांक- लक्ष्मी बिरदेव ओविकार मंडळ दानोळी,पाचवा क्रमांक- गैबी हालसीद्धनाथ हरोली,सहावा क्रमांक- मंगोबा ओविकार मंडळ उंचगाव,सातवा क्रमांक- बिरदेव मराठा संघ यलुर,उत्कृष्ट गन - गजनित्य ओविकार मंडळ वाशी,उत्कृष्ट वाद्य संगित - बिरदेव मराठा सनघ वाशी आदीनी यश संपादन केले.
   या प्रसंगी  प्रा.डॉ.संतोष कोळेकर ,  अंबाजी कोळेकर ,  दादासो कोळेकर , डॉ. विजय गोरड,  अण्णासो कोळेकर,  स्वप्निल कोळेकर, कुमार हराळे, पांडुरंग कोळेकर, सुकुमार कोळेकर व समस्त धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      फोटो 
राजमाताअहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करताना भूषणसिंहराजे होळकर, प्रा.अरुण घोडके , प्रा.डॉ.संतोष कोळेकर ,  अंबाजी कोळेकर ,  दादासो कोळेकर , डॉ. विजय गोरड,  अण्णासो कोळेकर,  स्वप्निल कोळेकर, शशिकांत कोळेकर आदी मान्यवर

Friday, 3 June 2022

गोकुळ दूध संघाची पशुखाद्य दरवाढ अपरिहार्य! :- विश्र्वास पाटील.



.
हातकणंगले / प्रतिनिधी

             युक्रेन - रशिया युद्धामुळे कच्च्या मालाची झालेली कमतरता ,त्यामुळे भारतीय बाजारपेठेत वाढलेल्या किंमती, वाहतूक भाड्यात झालेली  वाढ, कच्च्या मालामध्ये दहा टक्क्यापासून पस्तीस टक्क्यापर्यंत झालेली दरवाढ . यामुळे महिना सुमारे दीड कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे तसेच इतर संघानी अगोदरच केलेली दरवाढ . यामुळे गोकुळ दूध संघालाही पशुखाद्य दरवाढ करणे अपरिहार्य ठरत आहे . असे मत चेअरमन विश्र्वासराव पाटील यांनी व्यक्त केले. ते गोकुळ दुध  संघ संलग्न संस्था प्रतिनिधी व दुध उत्पादकांच्या मेळाव्यात बोलत होते . ही दरवाढ संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

        पाटील पुढे म्हणाले , हातकणंगले तालुक्यातील साठ हजार दुध इतरत्र जात आहे . तरी संचालक डॉ . मिणचेकर , शौमिका महाडीक व मुरलीधर जाधव यांनी प्रयत्न करून दुध संकलन वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची वार्षीक उलाढाल सात हजार कोटी रुपयांची तर एकट्या गोकुळ दूध संघाची तीन हजार कोटी रुपयांची आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खरी आर्थीक वाहीनी गोकुळ दूध संघ आहे. ती फक्त दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्र्वासामुळे.
२) गोकुळ दूध संघाचा गाय दूध दर हा शाश्वत आहे. तसा खाजगी संघांचा नाही. त्यामुळे संस्था प्रतिनिधींनी तात्पुरती दरवाढीच्या आमिषाला बळी पडू नये असे आवाहन पाटील यांनी केले.
             मेळाव्यात नुतन संचालक मुरलीधर जाधव यांनी मनोगत व्यक्त केले . स्वागत प्रास्ताविक माजी. आम . डॉ . सुजित मिणचेकर यांनी केले . यावेळी बाळगोंडा पाटील ( किणी ) , सुनिल भोकरे (कुंभोज ), अभिजित आरगे ( कुंभोज) , प्रताप पाटील ( माले )अस्लम मुल्लाणी ( किणी) , नितीन खाडे ( सावर्डे ) , नितीन सुर्यवंशी ( मनपाडळे) या दुध उत्पादकांचा सत्कार करण्यात आला .
           मेळाव्यामध्ये संकलन व्यवस्थापक शरद तुरंबेकर , पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. उदयकुमार  मोगले , वैरण विकास   व्यवस्थापक भरत मोळे , महालक्ष्मी पशुखाद्य व्यवस्थापक व्ही . डी . पाटील , केडीसी बँकेचे विभागीय अधिकारी बी.डी. चौगुले , आण्णासाहेब पाटील महामंडळाचे  ऋषीकेश आंग्रे , विमा सल्लागार के . वाय. पाटील आदींनी दूध संकलन, जनावरांचे आरोग्य, वैरण उत्पादन व आहार नियोजन, कर्ज प्रकरण, विमा, आदी बाबींवर मार्गदर्शन केले . आभार उपव्यवस्थापक दत्ता वाघरे यांनी मानले . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एम . पी .पाटील यांनी केले . तर मेळाव्याचे नियोजन आर . एन . पाटील , सुरेश पाटील व हातकणंगले विभागीय कार्यालयाच्या वतीने  करण्यात आले होते . मेळाव्यास गोकुळ दुध संलग्न संस्था प्रतिनिधी व दुध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नुकसानभरपाई न मिळाल्याने पाईपलाईन काम बंद पाडले

हेरले प्रतिनिधी
       
       जल जीवन मिशन योजने अंतर्गत चोकाक (ता. हातकणंगले ) येथे मंजूर असलेल्या एक कोटी ६७ लाखाच्या पाणी योजनेच्या कामाची वर्क ऑर्डरच नसतांनाही संबंधित कंत्राटदाराने विनापरवाना काम सुरू केले असून जॅकवेल, पाण्याची टाकी याचा थांगपत्ता नसतानाच थेट तीन ते चार किमीची पाईपलाईन पूर्ण केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच मिळाली नसल्याने काही शेतकऱ्यांनी काम बंद पाडले आहे. त्यामुळे ही योजना सुरू होण्यापूर्वीच वादाच्या भोव-यांत सापडली आहे.
        जल जीवन मिशन योजनेअंतर्गत हातकणंगले तालुक्यांत सुमारे ९५० कोटी रुपयांच्या एकूण ४१ योजना मंजूर आहेत. त्यापैकी कार्यारंभ आदेश योजना ९, निविदा कार्यवाही प्रगतीतील योजना ११, निविदा कार्यवाही प्रलंबित योजना १, तांत्रिक मान्यतेसाठी सादर योजना १०, तांत्रिक शेरे पूर्तता प्रगतितील योजना ३, प्रशासकिय मान्यता कार्यवाहितील योजना ०१, तत्वतः मान्यतेसाठी सादर योजना २ आणि मजीप्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना ४ यांचा समावेश आहे.
    यातील चोकाक गावांसाठी १ कोटी ६७ लाखाची योजना मंजूर झाली असून याची निविदा कार्यवाही प्रगतित आहे. असे असतांना मात्र संबंधित ठेकेदाराने परस्पर काम सुरू केले आहे. वास्तविक काम सुरू करण्यांपूर्वी संबंधित जागा मालकांना नुकसानभरपाई देणे अपेक्षित आहे. मात्र एकालाही नुकसान भरपाई न देता परस्परच काम सुरू केले आहे. त्यामुळे नुकसान भरपाई न मिळाल्याने काही शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले आहे. 


     संबंधित कंत्राटदाराने वर्क ऑर्डर नसताना परस्परच काम सुरू केले आहे. याबाबत तेथील सरपंच, लोकप्रतिनिधी, प्रशासनाने त्या कंत्राटदाराला रोकायला पाहिजे होते. याबाबत तक्रार आल्यास माहिती घेऊन कारवाई केली जाईल....
सुरेश कुलकर्णी...
उपअभियंता... पाणीपुरवठा विभाग
पंचायत समिती, हातकणंगले...

     फोटो..
 बंद पाडलेले पाईपलाईनचे काम..

Thursday, 2 June 2022

मौजे वडगाव फाट्यावर स्व. बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार कमान उभारणीसाठी निधी द्या - शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजयजी राऊतसाहेब यांना निवेदन


 हेरले /प्रतिनिधी
 हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव फाट्यावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची प्रवेशद्वार कमान उभारणीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीचे निवेदन शिवसेनेचे शहरप्रमुख सुरेश कांबरे व शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य अवधूत मुसळे यांनी शिवसेना मुख्य प्रवक्ते खासदार संजयजी राऊतसाहेब यांना कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या उपस्थितीत शिवसंपर्क अभियान दरम्यान देण्यात आले.
       निवेदनात म्हटले आहे की, शिरोली सांगली फाटा ते सांगली रोड या राज्य महामार्गावर  तीन किलोमीटर आत मौजे वडगाव गाव आहे. पूर्वी फाट्यावरती भले मोठे चिंचेचे झाड होते त्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांना मोठ्या झाडाची खून लक्ष वेधत होती.परंतु रोडच्या चौपदरीकरण कामाच्या वेळी सदर चे चिंचेचे झाड तोडल्यामुळे गावचे लक्ष  वेधत असलेल्या झाडाची खून नष्ट झाली आहे. त्यामुळे गावातील तमाम शिवसैनिकांच्या मागणीनुसार मौजे वडगाव फाट्यावरती हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने प्रवेशद्वार कमान उभारणीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी खासदार संजयजी राऊतसाहेब यांनी खासदार धैर्यशील माने यांच्याशी संपर्क साधून सदर प्रवेशद्वार कमानीचे अंदाज पत्रक, ठराव, द्या त्यांच्याशी संपर्क करून कमानी साठी लागणारा निधी उपलब्ध करून देतो अशी ग्वाही दिली.
 फोटो 
 मौजे वडगाव फाट्यावरती स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या कमानीसाठी निधी उपलब्ध व्हावा या मागणीचे निवेदन खासदार संजयजी राऊतसाहेब यांना देताना व स्वागत करताना मौजे वडगाव शिवसेना शहर प्रमुख सुरेश कांबरे व शिवसेना ग्रा.पं. सदस्य अवधूत मुसळे

मौजे वडगाव श्रीदत्त सोसायटीच्या चेअरमनपदी नीता वाकरेकर तर व्हा. चेअरमनपदी महालिंग जंगम


हेरले /प्रतिनिधी 
मौजे वडगाव (ता.हातकणंगले) येथील श्री दत्त विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी नीता वाकरेकर यांची तर व्हा. चेअरमनपदी महालिंग जंगम यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला .
         प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक माजी उपसरपंच सुरेश कांबरे यांनी केले. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .यावेळी बोलताना नूतन चेअरमन नीता वाकरेकर म्हणाल्या की, सर्व संचालकांना विश्वासात घेऊन संस्थेचा कारभार पारदर्शक करणार आहे. तसेच कोल्हापूर या शाहूमहाराजांच्या जिल्ह्यामध्ये  व मौजे वडगाव च्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला प्रथम चेअरमन होण्याचा मान दिल्याबद्दल कोअर कमिटीचे सदैव ऋणी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले .यावेळी संचालक मंडळ  एड .विजय चौगुले, विलास सावंत, शिवाजी जाधव, मधुकर अकीवाटे, दीपक थोरवत ,रामचंद्र चौगुले, जमीर पटेल, बापू शेटे, प्रकाश कांबळे, अंबाजी कोळेकर, दीपा सावंत, यांच्यासह कोअर कमिटी सदस्य माजी सरपंच सतीशकुमार चौगुले, शिवसेनेचे सुरेश कांबरे, विजय चौगुले ,सामाजिक कार्यकर्ते सुनील खारेपाटणे, ग्रा.पं. सदस्य अविनाश पाटील, सतीश वाकरेकर, आनंदा थोरवत, स्वप्नील चौगुले, अमोल झांबरे, उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हातकणंगले उपनिबंधक डॉ. प्रगती बागल, मकसूद सिंधी, सचिव पोपट बेडेकर, यांनी काम पाहिले आभार माजी सरपंच सतीशकुमार चौगुले यांनी मानले.

Wednesday, 1 June 2022

संजय घोडावत अकॅडमीचे एमपीएसी स्पर्धा परीक्षामध्ये घवघवीत यश

** 

हातकणंगले प्रतिनिधी

             महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या एमपीएसी राज्यसेवा अंतिम परीक्षेतून कोल्हापूर  जिल्ह्यातून 7 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. त्यामध्ये संजय घोडावत इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेसच्या 4 विद्यार्थ्याची अंतिम यादीत निवड झाली आहे.
              अंतिम निकालामध्ये घोडावत अकॅडमीच्या अपर्णा जयसिंग यादव निगवे दुमाला ( ता. करवीर) यांची नायब तहसीलदारपदी निवड झाली आहे, ही ईडब्ल्यूएस महिला प्रवर्गातून राज्यात पहिली आली आहे. अपर्णाला संपूर्ण मार्गदर्शन संजय घोडावत इन्स्टिट्यूट फोर एडमिनिस्ट्रेटिव सर्व्हिसेसचे लाभले.
             पूजा संजय अवघडे हिची नायबतहसीलदारपदी निवड झाली असून तिने अनुसूचित जाती प्रवर्गात महिलांमध्ये राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. ती मूळची राजारामपुरी, कोल्हापूर येथील आहे.
            म्हाळुंगे (ता. करवीर) गावचा विश्वजीत जालंदर गाताडे यांची सहाय्यक राज्यकर आयुक्तपदी निवड झाली असून त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले.
          हळदी (ता. करवीर) येथील ऐश्वर्या जयसिंग नाईक यांची भूमिअभिलेख उपअधीक्षकपदी निवड झाली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर SGIAS कोल्हापूर ब्रँचमध्ये एकच जल्लोष व आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
            अपर्णा यादव हिने SGIAS मध्ये पूर्व, मुख्य व मुलाखत असे मार्गदर्शन मिळाले. तर विश्वजीत, ऐश्‍वर्या, पूजा या तिघांनी SGIAS कडून मुलाखतीसाठी मार्गदर्शन घेतले होते.
             वरील यशस्वी विद्यार्थ्यांना SGIAS चे विश्वस्त मा. विनायक भोसले सर, डायरेक्टर विराट गिरी, कोल्हापूर ब्रांच प्रमुख अक्षय पाटील, अमोल पाटील, सचिन सिलवत, सूर्यकांत कांबळे, भरत साबळे सर तसेच इतर सर्वांचे सहकार्य लाभले.