Tuesday, 27 September 2022

शिरोली ग्रामपंचायतच्या वतीने तंटामुक्त अध्यक्षपदी राजू पाटील यांची निवड झाल्याबद्दल सत्कार

शिरोली प्रतिनिधी 

     गावातील तंटे गावातच मिटावेत त्यातून  जनतेचे आर्थिक नुकसान टळावे याकरीता महाराष्ट्र शासनाच्या प्रेरणेतून महात्मा गांधी तंटामुक्त समितीची निर्मिती झाली.या समितीच्या अध्यक्षपदी राजू पाटील या योग्य व्यक्तीची निवड झालेने ते या पदाचे माध्यमातून जनतेला नक्कीच न्याय देतील असा विश्वास शिरोली लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे यांनी व्यक्त केला.                         
      शिरोली ग्रामपंचायतच्या वतीने तंटामुक्त अध्यक्षपदी राजू पाटील यांची निवड झाल्याबद्दल सत्कार  प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे जिल्हाध्यक्ष एस डी लाड होते.                        
        यावेळी उर्मिलाताई जाधव, कृष्णात पाटील, ग्राम वि. अधिकारी व्ही .बी. भोगण यांची भाषणे झाली . स्वागत प्रकाश कौंदाडे  यांनी केले. सूत्रसंचालन बाबासो कांबळे,अविनाश कोळी यांनी केले. प्रस्ताविक सलीम महात, विनायक कुंभार यांनी केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्या पुष्पा पाटील, संध्याराणी कुरणे, श्वेता गुरव, मीनाक्षी खटाळे, न्यामतभी  मुल्ला ,अनिता कांबळे उपस्थित होत्या. आभार उपसरपंच सुरेशराव यादव यांनी मानले.       
    
फोटो 
शिरोलीच्या तंटामुक्त अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजू पाटील यांचा लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे व उपसरपंच सुरेशराव यादव यांच्या हस्ते  सत्कार

Monday, 26 September 2022

मौजे वडगांव (ता. हातकणंगले)येथे जलजीवन योजना लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

हेरले / प्रतिनिधी

मौजे वडगांव (ता. हातकणंगले)येथे मोठया उत्साहात भव्य जलजीवन योजना लोकार्पण सोहळा प्रमुख उद्घाटक माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आमदार 
राजूबाबा आवळे माजी आमदार
राजीव आवळे माजी जिल्हा परिषद सदस्य दलित मित्र अशोकराव माने,
माजी सभापती राजेश पाटील आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.
   या प्रसंगी सरपंच काशिनाथ कांबळे, उपसरपंच सुभाष आकिवाटे, नौशाद मुबारक बारगीर, डॉ.विजय गोरड, सरताज बारगीर,ग्रामपंचायत सदस्य वैशाली गोरड, अश्विनी लोंढे, तंटामुक्त अध्यक्ष महेंद्र कांबरे,  पोलीस पाटील आमिर हजारी,आघाडी प्रमुख मानसिंग रजपूत,उदय चौगुले,सुधाकर परमाज, बाबुराव सावंत,रांजा पटेल, राजकुमार थोरवत, सुभाष काकडे, विजय मगदूम, नितीन घोरपडे, संतोष लोंढे,हसन बारगीर, सचिन शेटे, अनंत जाधव,संकेत सोनवणे, विनोद चौगुले, रमेश लोंढे, सचिन थोरवत,सुभाष कांबळे, मंगेश गोरड, ग्रामसेवक एस. एम. कांबळे. चंदू बारगीर, सतीश कांबरे, महिला बचत गट अध्यक्ष पूनम खाडे, प्रताप रजपूत, महिला बचत गट,गावातील सर्व तरुण मंडळी सर्व पदाधिकार व ग्रामस्थ उपस्थित होते .

शैक्षणिक परिवर्तनाच्या पाऊलवाटा या पुस्तकास संकल्प फौडेशन यांचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर

कोल्हापूर / प्रतिनिधी

 कागल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांच्या 'शैक्षणिक परिवर्तनाच्या   पाऊलवाटा ' या पहिल्या पुस्तकास संकल्प फौडेशन तिरपण महागाव ता. गडहिंग्लज यांचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर झाला आहे.
      गटशिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनी विविध तालुक्यात गरशिक्षणाधिकारी पदावर काम करत असताना विद्यार्थी व शिक्षक गुणवत्ता वाढीसाठी विविध नावीन्य पूर्ण उपक्रमांची अमल बजावणी केली आहे. यासाठी त्यांना न्युपाचा २०१५ चा नैशनल इनोव्हेशन अवॉर्ड देखील मिळाला आहे. अशा नावीन्य पूर्ण उपक्रमां ची माहिती त्यानी शैक्षणिक परिवर्तना च्या पाऊल वाटा या पुस्तकात दिली आहे.
   संकल्प फौडेशन तिरपण महागाव ता. गडहिंग्लज यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील विविध साहित्यप्रकार समृद्ध करण्याच्या दृष्टीकोनातून तसेच साहित्यिकांच्या लेखणीला बळ देण्याच्या उद्देशाने व मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या लिहित्या हातांचा गौरव करण्याच्या उद्देशाने संकल्प परिवाराने या वर्षापासून राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सुरु केले आहेत.सध्या काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. कोरोनानंतरचा पहिलाच कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे.
महागाव ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर येथे एका भव्य कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात करण्यात येणार आहे, अशी माहिती निवड पत्रकाद्वारे संस्थेचे अध्यक्ष  युवराज आनंदराव सरनोबत, उपाध्यक्षा सौ. आदिती युवराज सरनोबत तसेच सचिव सौ. वैशाली जयंत मिसाळ यांनी दिली आहे.

Saturday, 24 September 2022

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच खरे शिक्षण - डॉअजितकुमार पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी 
 प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर संचलित राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11 कसबा बावडा सीआरसी क्रमांक सात मध्ये शिक्षण परिषद संपन्न झाली त्यामध्ये सीआरसी प्रमुख डॉक्टर अजित कुमार पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले  ,ज्येष्ठ तज्ञ कविता पाटील ,आरती नाईक , किशोर शिणगारे यांनी आपल्या विषयासंदर्भात व्याख्या नवोपक्रम ,मूलभूत संख्याज्ञान, माता पालकांचे गट या विषयावर मार्गदर्शन केले.

प्रास्ताविकेमध्ये डॉक्टर अजितकुमार पाटील यांनी "  विद्यार्थी देशाचे भवितव्य आणि संपत्ती आहेत त्यांचा सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. भारत सरकारच्या निपून भारत प्रकल्पांतर्गत राज्यात पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान अभियानाचे अंमल बजावणी सुरू आहे त्या अंतर्गत इयत्ता पहिलीत येणाऱ्या मुलांसाठी पहिले पाऊल शाळा पूर्व तयारी देखील राबविण्यात येत आहे.

 पहिले पाऊल यशस्वी करण्यासाठी व्हिडिओ, कार्डद्वारे  आणि विविध उपाय योजना करून माता पालक गटांना मार्गदर्शन करून प्रशिक्षण देण्यात येत आहे.

 2026 व 27 पर्यंत राज्यातील तीन ते नऊ वर्षे वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांसाठी निर्धारित शिक्षण लक्ष पूर्ण करतील व इयत्ता पाचवी पर्यंत कोणते मूल शैक्षणिक प्रवाहात मागे राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे या संदर्भात मार्गदर्शन केले

 शिक्षण परिषदेसाठी प्रमुख गोरख वातकर, टी आर पाटील, प्रदीप जानकर ,उत्तम कुंभार, मुख्याध्यापिका छाया हिरगुडे, सुनिता कांबळे, विमल जाधव, विजय कुरणे, सरदार पाटील ,दत्तात्रय डांगरे इत्यादी  शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते आभार अनिल सरकसर यांनी मानले.निपुण भारत प्रतिज्ञा जोतिबा बामणे यांनी दिली.

तणावमुक्त जगण्यासाठी निसर्गाची सोबत महत्त्वाची : प्रा. टी. एस. पाटील

600 विद्यार्थ्यांचा समावेश, मंदीर परिसराची स्वच्छता

कोल्हापूर प्रतिनिधी
 
    विकारमुक्त व तणावमुक्त जीवन जगता येण्यासाठी आपण निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्ग नियमाला बांधिल राहून वर्तन करणे गरजेचे आहे. निरोगी शरीर व ज्याचे मन प्रसन्न आहे, तोच आरोग्यसंपन्न होय. सुखासमाधानाच्या दीर्घायुषी जीवनासाठी पर्यावरण वाचवा, असे प्रतिपादन प्रा.टी.एस.पाटील यांनी केले.
       त्या मुरगूड विद्यालय ज्युनियर कॉलेजच्या वतीने चिमगाव (ता. कागल) येथील चिमकाई देवी मंदिर येथे आयोजित पर्यावरण व समाजसेवा शिबिरप्रसंगी 'निसर्गाचे सान्निध्य हीच आरोग्याची गुरुकिल्ली' या विषयावर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य एस. पी. पाटील होते.
    प्रारंभी दसरा सणाचे औचित्य साधून मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. प्रा. एस. एस. पाटील यांनी स्वागत केले. प्रा. पी. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. यु. पी. कांबळे, प्रा. एम. ए.बसर्गे,एम.डी.खांटागळे,जे.टी.पवार यांची भाषणे झाली. . यावेळी प्रा. टी. आर. शेळके, व्ही. आर. गडकरी, ए. जी. मुजावर, व्ही. व्ही. कुंभार, एल. के. पाटील, डी. एस. पाटील, आर. सी. कांबळे, राजकुमार हराळे आदी उपस्थित होते. अजित सावंत यांनी सूत्रसंचालन केले.. आनंदा मांगोरे यांनी आभार मानले..
फोटो.. 
चिमगाव... येथे पर्यावरण, समाजसेवा क्षेत्र भेट प्रसंगी तुळशी रोपांची लागण करताना उपप्राचार्य एस. पी. पाटील, सौ. टी. एस. पाटील, एम. ए. बोर्गेस आदि.

रा. शाहू विद्यामंदिर मध्ये राष्ट्रीय पोषण माह संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी 
 राष्ट्रीय पोषण माह सप्ताह अंतर्गत आज शुक्रवार दिनांक 22/09/2022 मनपा  राजर्षी शाहू विद्या मंदिर क्र 11 कसबा बावडा कोल्हापूर येथे पाककृती स्पर्धा  घेणेत आल्या. पाककृती साठी फळभाज्या व पालेभाज्या पासून तयार केलेले पदार्थ बनवून आणण्यास सांगितले होते.
या उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थी व पालकांनी नाविन्यपूर्ण पद्धतीचे खाद्यपदार्थ व विद्यार्थ्यांनी स्वतः सजावट करून उस्फुर्त सहभाग नोंदवला. सदर पाककृती स्पर्धेचे परीक्षण  नगरसेविका सौ माधुरी लाड मॅडम, गीतांजली ठोंमके,स्नेहल सरगर ,उज्ज्वला चौगले,वैशाली जाधव मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटील सर, उत्तम कुंभार  यांनी मदत केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना मैलारी या विद्यार्थिनीने केले व आभार तमेजा मुजावर यांनी मानले.कार्यक्रमाची तयारी व नियोजन विद्या पाटील व कल्पना पाटील यांनी केले.
पाककला स्पर्धेतील विजेते पालक
रुपाली बडेकर - प्रथम
अनुराधा गायकवाड - द्वीतीय
वैशाली कोरवि- तृतीय
श्रावणी बेळवी- चौथा
संगीता ताटे - पाचवा

Thursday, 22 September 2022

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कोल्हापूर ग्रामीण बीट हेरले एक अंतर्गत हेरले येथे सुदृढ बालक बालिका स्पर्धा व पाककृती स्पर्धा

हेरले / प्रतिनिधी

  एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कोल्हापूर ग्रामीण बीट हेरले एक अंतर्गत हेरले येथे अनुसया मंगल कार्यालय मध्ये दिनांक 21 सप्टेंबर रोजी पोषण माह अंतर्गत सुदृढ बालक बालिका स्पर्धा व पाककृती स्पर्धा घेण्यात आल्या.  प्रमुख उपस्थिती माजी महिला बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी राजेश पाटील  प्राथमिक आरोग्य केंद्र हेरलेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाल्या.
     या स्पर्धेत पाककृती तयार करून आणणाऱ्या महिलांचे तीन क्रमांक काढण्यात आले. तसेच स्वस्थ बालक बालिका स्पर्धेमध्ये सहा महिने ते तीन वर्षे वयोगट तीन क्रमांक व तीन ते सहा वर्ष वयोगट तीन क्रमांक डॉक्टर राहुल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आले. तसेच पोषण महा - अंतर्गत पोषक आहाराविषयी डॉक्टर राहुल देशमुख यांनी तसेच  माजी महिला बालकल्याण सभापती  पद्माराणी पाटील यांनी मार्गदर्शन केले.
   या प्रसंगी हेरले ग्रामपंचायत सदस्या विजया घेवारी , आशा उलसार, आरती कुरणे , निलोफर खतीब , रिजवाना पेंढारी,  अपर्णा भोसले, ए एन एम, आर. मुल्लानी, आशा गटप्रवर्तक  दीपा भोसले अंगणवाडी पर्यवेक्षिका  ए. व्ही. पोवार ,अंगणवाडी सेविका व मदतनीस बीट हेरले -१ तसेच माता बालक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाची प्रस्तावना अंगणवाडी पर्यवेक्षिका  ए .व्ही.पोवार यांनी केली तर सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका लता कदम यांनी केले.
        फोटो
हेरले येथे माजी महिला बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी राजेश पाटील  मार्गदर्शन करतांना शेजारी वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल देशमुख व अन्य मान्यवर.

Wednesday, 21 September 2022

मौजे वडगावची खंडित बससेवा पुर्ववत सुरु करा :शौमिका महाडिक यांच्या शिफारस पत्राद्वारे मागणी

हेरले /प्रतिनिधी 
 मौजे वडगाव ते कोल्हापूर के . एम . टी . बस सेवा काही दिवसापासून खंडित झाली असून ती पुर्ववत सुरु करावी अशी मागणी जि.प . च्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या शिफारस पत्राद्वारे गावातील पदाधिकाऱ्याच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर  महानगरपालिकाच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली.
            मागील काही दिवसा पासून कोरोणाच्या कारणास्तव व कमी उत्पन्न मिळत आसल्याचे कारण देत मौजे वडगावात येणाऱ्या बसच्या सर्व फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत . कोल्हापूर हून संध्याकाळी मौजे वडगावात मुक्कामी येणारी बस सकाळी ६ वा ४५ मी  , 
९ .०० वा, १२ . ०० वा , ४  ०० वा .
 ६ . ० ० वा , यावेळेत ये - जा करित होती . हि बससेवा विध्यार्थांना अतिशय उपयुक्त ठरत होती . कारण सकाळी व दिवसभर भरणाऱ्या शाळेच्या तसेच शासकीय कामासाठी ये - जा करणाऱ्या नागरिकाना सोयीस्कर होती . परंतू कोरोणा काळात बंद झालेली बससेवा कोरोणानंतर उत्पन्न कमी मिळत आहे म्हणून बंद करण्यात आली आहे . त्यामुळे विध्यार्थांची गैरसोय होऊ लागली असून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे . गावापासून फाट्यापर्यंत ये - जा हे ६ कि.मी. चेअंतर विध्यार्थांना पायपीट करणे जिकिरीचे झाले आहे . त्यामुळे ही बस सेवा पुर्ववत सुरु करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने गावातील पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने केली आहे
          या शिष्टमंडळामध्ये माजी सरपंच सतिश चौगुले , माजी उपसरपंच सुरेश कांबरे ' ग्रा पं . सदस्य अवधूत मुसळे ' अविनाश पाटील , सामाजिक कार्यकर्ते सुनिल खारेपाटणे ' शौमिका महाडिक यांचे स्वीय सहाय्यक युवराज पुजारी , स्वप्नील चौगुले , महादेव चौगुले, अमोल झांबरे ,उपस्थीत होते . 

फोटो 
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ . कांदबरी बलकवडे यांना पुर्ववत बससेवा सुरु करणे संदर्भात निवेदन देताना शिष्टमंडळ

Friday, 16 September 2022

शौमिका महाडिक यांच्या फंडातून विविध विकास कामांचे उदघाटन व पाण्याच्या टँकरचा लोकार्पण सोहळा


हेरले /प्रतिनिधी 
पदभार स्विकारणे म्हणजे सगळं होत नसतं तर कार्यभार हा तितकाच महत्वाचा असतो त्यामुळे तो प्रामाणिक पणे उचलला पाहीजे. जितक्या प्रामाणिक पणे काम कराल तितक्या प्रामाणिक पणे दुसऱ्याच्या मनापर्यंत पोहचत असते हे मला माहित आहे . म्हणून मी माझं काम प्रामाणिक पणे करत राहते असे उदगार जि.प.च्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी काढले त्या मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथे जि .प . फंडातून झालेला विकास कामाच्या उदघाटन व पाण्याचा टँकर च्या लोकार्पण सोहळा प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या . कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकांत सावंत होते . तर प्रमुख उपस्थितीत रावसो चौगुले व सरपंच काशीनाथ कांबळे होते .
           त्या पुढे म्हणाल्या की, मी जो पाण्याचा टॅकर दिला आहे. त्याच्या मागे एक उदात्त हेतू आहे की ज्यावेळी कोल्हापुरात महापूर आला व चौहोकडे पाणीच पाणी होते पण माणसांना पिण्यासाठी पाणी नव्हते त्यासाठी आपण काहीतरी व्यवस्था केली पाहीजे पण ती ग्रामपंचायतीच्या हक्काची असवी त्यामुळे माझ्या मतदार संघामध्ये पाच गावे येतात त्या प्रत्येक गावात पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली आहे.
      माझ्या मतदार संघातील प्रत्येक गावातील ग्रामस्थ माझ्या सोबत राहून मला मतदान केले . त्यामुळे मी तुमच्या मतावर जि.प मतदार संघाचे नव्हे तर जि .प .चे अध्यक्ष होऊन नेतृत्व करण्याची संधी दिली आहे . त्यामुळे भविष्यात मी पदावर असो वा नसो पण आपल्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी तत्पर असेन . यावेळी जि.प शाळेतील खोली ,  प्राथमिक आरोग्य केंद्रातील खोली , मातंग समाज येथील आरसीसी गटर्स' व रस्ता , इत्यादी कामाचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गावासाठी कोट्यावधीची कामे करून वचनपूर्ती केलाचे समाधान वाटत आहे असेही त्या यावेळी म्हणाल्या . यावेळी माजी सरपंच सतिशकुमार चौगुले , . सविता सावंत , . अविनाश पाटील ,यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
         यावेळी  अँड विजयकुमार चौगुले , सुनिल खारेपाटणे ,सतिश वाकरेकर ' माजी पोलिसपाटील मनोहर चौगले , आनंदा थोरवत , सुरेश कांबरे ' दादू अतिग्रे ,अमोल झाबरे , भूपाल कांबळे , पवन जाधव , माधूरी सावंत सरिता यादव , मायावती तराळ , आश्विनी लोंढे , यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .स्वागत व प्रास्ताविक प्रदिप लोहर यांनी केले. तर आभार स्वप्नील चौगुले यांनी मानले .

फोटो 
शौमिका महाडिक यांच्या निधीतून पाण्याच्या टँकरचा लोकार्पण सोहळा प्रसंगी गावातील मान्यवर

Wednesday, 14 September 2022

हेरले येथे वर्षावास निमित्त श्रुंखलाबद्ध धम्म प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन

हेरले / प्रतिनिधी

हेरले येथे वर्षावास निमित्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण बौद्ध समन्वय समितीच्या माध्यमातून श्रुंखलाबद्ध धम्म प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन  केले होते.
  रविवारी दि. ११सप्टेंबर २०२२ रोजी धम्म प्रवचन मालिकेतील ९ वे पुष्प कार्यक्रम संपन्न झाला
   धम्म चळवळ कृतिशील उपक्रमाने गतिमान होईल यावर विश्वास ठेऊन, वर्षावास निमित्ताने गावनिहाय धम्म प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले. यामध्ये किमान १०० गावांचे उद्दिष्ट ठेवले आहे. आपण धम्म चळवळीतील प्रचारक, अभ्यासक, उपासक, उपासिका, कार्यकर्ता म्हणून या उपक्रमामध्ये सहभागी होऊन कोल्हापूर जिल्ह्यातील धम्मकार्य वाढीसाठी प्रयत्न सुरू आहे. या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती- श्रीमती जयश्री  कुरणे व सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती. उर्मिला  कुरणे यांच्या हस्ते करण्यात आले.
 कार्यक्रमास प्रवचनकार आयु. कुलदीप जोगडे सर,   यांनी धम्मदेसना  देण्यात आली. त्यावेळी  कार्यक्रमाचे प्रस्तावना संदीप कोले यांनी केली व आभार हातकणंगले पंचायत समिती माजी सभापती- श्रीमती जयश्री कुरणे यांनी केले. त्यावेळी अक्षय कटकोळे , निखिल कुरणे, उर्मिला कुरणे, कृष्णात कटकोळे, नागावकर सर, सुरेश कदम ,प्रभुदास खाबडे, सुनील कुरणे, रवी लोकरे, मच्छिंद्र लोकरे, देवदान कांबळे, अमोल खाबडे, सतीश भोसले, राहुल कटकोळे,व  बौद्ध बांधव उपस्थित होते.

Tuesday, 13 September 2022

निधन वार्ता




हेरले / प्रतिनिधी
हेरले (ता. हातकणंगले ) येथील अतिष बाळासाहेब भोसले (वय ३४ ) यांचे मंगळवार दि. १३ रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांचे पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, भाचे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दि. १५ सप्टेंबर रोजी आहे.

Monday, 12 September 2022

ग्रंथदान करणारी मंडळीच समाजाचे खरे हितचिंतक.... दादासो लाड


मुरगुड विद्यालयात ग्रंथ दान, प्रदर्शन उत्साहात संपन्न

कोल्हापूर / प्रतिनिधी

"वर्षानुवर्षे सातत्याने हजारो रुपयाचे ग्रंथ दान करणारे गुरुवर्य हेच विद्यार्थी, शिक्षक,शाळा आणि समाजाचे खरे हितचिंतक असतात. वाचनातून येणारी 'प्रगल्भता' आणि 'विवेक' ही आयुष्यभर न सरणारी संपत्ती आहे. असा संपन्न खजिना समाजासाठी खुला करणारे गुरुवर्य जीवन साळोखे यांचे कार्य सतत प्रेरणादायी ठरेल."असे गौरवोद्गार शिक्षक नेते दादा लाड यांनी काढले. 
   ते   शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगूड विद्यालय ज्यूनिअर कॉलेजमध्ये लेखक,पत्रकार,माजी मुख्याध्यापक जीवन साळोखे यांच्या पुढाकाराने ग्रंथदान आणि ग्रंथ प्रदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.  अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. आर.पाटील होते.
     शिक्षक नेते दादा लाड, कोजिमाशीचे जेष्ठ संचालक, शिक्षक प्रतिनिधी बाळ डेळेकर यांच्या हस्ते पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.याप्रसंगी जीवन साळोखे यांनी मुरगूड विद्यालयाच्या स्थापनेस 75 वर्ष पूर्ण झाली त्या निमित्त 25 हजार रुपयांची, शंभरावर ग्रंथ संपदा भेट दिली.
   माजी  प्राचार्य जीवन साळोखे म्हणाले," वाचन हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. वाचनामुळे वाचा आणि मस्तक प्रगल्भ होते.मस्तक परिपूर्ण असणाऱ्या माणसाच्या हातातून चुकीची कृती होत नाही बदलत्या परिस्थितीत शिक्षकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सामना करताना स्वतःला ग्रंथ वाचनातून अद्ययावत ठेवावे लागेल.'शिवीगाळ' आणि 'अर्वाच्य भाषा' ही आपल्या समाजाची ओळख बनत चालली आहे. वाचन संस्कृती वाढली तर हा सामाजिक दुर्गुण घालवताता येईल". असे मौलिक मार्गदर्शन त्यांनी केले.
    यावेळी नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनचा 'आदर्श शिक्षक' पुरस्कार प्राप्त शिक्षक एम बी टिपुगडे व विक्रमसिंह घाटगे फौडेशनचा 'आदर्श शिक्षक' पुरस्कार विजेते आर.जी.पाटील यांचा सत्कार करण्यात आला.तसेच एन.एम.एम.एस.तसेच इयत्ता पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप परीक्षेतील यशस्वितांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
    कार्यक्रमास कोजिमाशीचे संचालक अविनाश चौगले,अभय वंटे,मुख्य लिपीक के.बी. वाघमोडे,इस्माईल नायकवडी,शिवाजीराव मोहिते,बाळासो किल्लेदार,उपमुख्याध्यापक संजय सूर्यवंशी,उपप्राचार्य एस.पी.पाटील,पी.बी. लोकरे,ए.एच.भोई, पी. एस. पाटील, जीवरक्षक दिनकर कांबळे, आदि मान्यवर हजर होते. स्वागत प्रास्ताविक एस. आर. पाटील यांनी तर सुत्रसंचालन अनिल पाटील यांनी तर आभार पर्यवेक्षक सुधाकर निर्मळे यांनी मानले.

Sunday, 11 September 2022

मुरगुड विद्यालयाचे एन एम एम एस साठी 18 तर सारथी शिष्यवृत्तीसाठी 52 विद्यार्थ्यांची निवड.29 लाखाची मिळणार


 कोल्हापूर प्रतिनिधी

मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड मधील एन एम एम एस 18 तर सारथी शिष्यवृत्तीसाठी 52 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या 70 विद्यार्थ्यांना चार वर्षासाठी 29 लाखाची शिष्यवृत्ती रक्कम प्राप्त होणार असल्याने पालक विद्यार्थी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत विविध विभागातील 75 लाखांवर शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना प्राप्त केली आहे. 
 एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी...  स्वयम विजयकुमार जाधव, धनश्री बाळासो आगंज, श्रद्धा रामचंद्र पाटील  नेहा तानाजी गुरव, हर्षद तुलसीदास कुभांर  समृद्धी राजेंद्र नांदवडेकर, पृथ्वी राजाराम जठार, चिन्मय तानाजी कुभांर, धीरज अश्विनकुमार कांबळे,मुगेंद्र गणेश खांटागळे,आरती सर्जेराव कुभांर,ऋग्वेद विजय कांबळे, जीवन युवराज कांबळे, सिद्धीराज रोहिदास वाघमारे,सुशांत विलास कांबळे,ज्ञानेश्वर नामदेव लाड,साई संदीप वाडकर,पियुषा अशोक गुरव यांचा समावेश आहे.  
    सारथी शिष्यवृत्तीसाठी--  मगदूम सागर रंगराव ,गोरुले समृद्धी सुरेश ,तोरसे वेदांत विठ्ठल ,रेडेकर सार्थक जयवंत,पाटील नेहा विलास ,शिंदे अक्षता कृष्णात ,आरडे अथर्व दिलीप ,शिंदे प्रियांका विजय ,गोरुले उत्कर्षा सुनील,चौगुले सिद्धेश भैरवनाथ,पाटील नैतिक सुधीर,पाटील राजनंदिनी तानाजी
,पाटील समीक्षा सदानंद,कळमकर यश राजेंद्र,भोगले आदर्श मुकुंद,खराडे अर्जुन अरविंद,जठार प्रथमेश ज्योतीराम,आमते संचिता संदीप,सोरप श्रेया राजेंद्र,कळमकर वेदांत साताप्पा,जाधव स्वराली रवींद्र,ा रमल जानवी तानाजी,पाटील वेदिका विनायक,पाटील प्रथमेश दिलीप
 आरडे ऋग्वेद सर्जेराव,चव्हाण यश चंद्रकांत,भारमल साईराज सचिन,रेंदाळे अनुज आकाश,मिसाळ समीक्षा मोहन,पाटील अमृता अरुण,हळदकर ओंकार तानाजी,पाटील प्रणवी आनंदा, बाबर ऋग्वेद अमर,मातुगडे सोहम युवराज, हिरुगडे कोमल कृष्णात,पाटील प्रतीक उत्तम,पाटील अनिकेत विकास,पाटील सार्थक पांडुरंग,पाटील वेदांत राहुल,पाटील वेदांत अशोक,पाटील शुभंकर बाळासो,कोंडेकर आदर्श पुंडलिक
 ,मांडवे आदर्श परशराम,पाटील मंदार तानाजी,शेळके आदर्श विश्वनाथ,ताटे सुरज बापू ,नरके प्रतीक अविनाश,पाटील हर्षवर्धन राजेंद्र,खंडागळे रोहित नामदेव
 ,पाटील साक्षी धनाजी,पाटील समीक्षा दिनकर,पाटील कीर्ती बाळकृष्ण यांचा समावेश आहे. 
         या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, अध्यक्षा श्रीमती शिवानीताई देसाई, 
उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, चेअरमन डॉ. प्रा. मंजिरी मोरे देसाई, युवा नेते दौलतराव देसाई, कोजीमाशी चे ज्येष्ठ संचालक शिक्षक प्रतिनिधी बाळ डेळेकर ,शालेय समिती चेअरमन प्रवीणसिंह पाटील प्राचार्य एस .आर.पाटील, उपप्राचार्य एस. पी. पाटील, उपमुख्यद्यापक एस. बी. सूर्यवंशी, पर्यवेक्षक एस. एच. निर्मळे, तंत्र विभाग प्रमुख पी. बी. लोकरे यांचे प्रोत्साहन तर एन. एन. गुरव,  ए. एस. चंदनशिवे ,सौ. एन. एम. पाटील सौ. के .एस.पाटील सौ. एस. जे. गावडे , श्री कचरे सर सर्व शिक्षक शिक्षकेतर यांचे मार्गदर्शन लाभले.

मुलीच्या शिक्षणासाठी सायकल भेट


 हेरले /प्रतिनिधी 
घर आणि शाळेतील अंतर हे मुलीच्या शिक्षणावर विपरित परिणाम करणारे ठरू नये या उद्देशाने कोल्हापूर येथील दानशूर व्यकतीमत्व व हॉटेल २४ K चे मालक राजेश करंदीकर मोहन पाटील संदीप सोनवलकर यांनी सायकल भेट दिली .
            नागाव (ता. हातकणंगले) येथील सुजाता कुंभार ही मुलगी आपल्या शेतमजूरआई वडिलांसह गावाबाहेर , शेतात  राहतात . तीने दहावीचे पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून कोल्हापूर येथे महाविद्यालयात प्रवेश घेतला . पण तीला शेतातल्या घरापासून ते के . एम . टी . बस पकडण्यसाठी दररोजसुमारे पाच ते सहा किमी चे अंतर पायपीट करित जावे लागत होते. त्यामुळे तीचा वेळ वाया जाऊ नये व शिक्षणावर परिणाम होऊ नये तसेच तीला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने तीला सायकल भेट देण्यात आली.
          यावेळी माजी सरपच सतिश कुमार चौगुले , जयवंत चौगुले (अतिग्रे ), बाळासो थोरवत , माजी उपसरपंच सुरेश कांबरे , अविनाश पाटील ,गंगाराम कुंभार , ओंकार चौगुले , विनोद सौदे ' शुभम घुगरे , यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .


आई वडील शेतमजूर असल्याने सायकल घेण्याची सुद्धा माझी परिस्थीती नव्हती दररोज पाच ते सहा किमी पायपीट करित मी के एमटी पर्यत पोहचत असे. आशा अडचणीच्या काळात मला सायकल दिल्याने माझा वेळ व शिक्षणाची चागली सोय झाली .
        सुजाता कुंभार ( विद्यार्थीनी 
)
फोटो 

हॉटेल २४ K चे मालक राजेश करंदीकर यांनी आपला मित्रांच्या व मान्यवराच्या हस्ते सायकल भेट दिली .

Monday, 5 September 2022

हेरले ( ता. हातकणंगले ) येथील श्री छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्थेची २७ वी सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात व खेळीमेळीत संपन्न

हेरले / प्रतिनिधी 
हेरले ( ता. हातकणंगले ) येथील श्री छत्रपती शिवाजी विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा  संस्थेची २७ वी  सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात व खेळीमेळीत संपन्न झाली.  संस्थेचे सचिव नंदकुमार माने  यांनी अहवाल वाचन केले तर सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन उदय चौगुले होते .

    यावेळी बोलताना चेअरमन उदय चौगुले म्हणाले,गेली काही वर्षांमध्ये संस्थेमध्ये अत्यंत काटकसरीने कारभार केला असल्याने ठेवी  व कर्जामध्ये वाढ झाली असल्यामुळे संस्थेस ४ लाख ३  हजार इतका नफा झाला आहे. या प्रसंगी सभासदांना ५% डिव्हिडंट देण्याचे जाहीर करत,मयत सभासदाला अंत्यविधीसाठी   तीन हजार रुपयांची तरतूद केल्याचे जाहीर केले. या प्रसंगी माजी सभापती राजेश पाटील, माजी उपसभापती अशोक मुंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना सरचिटणीस मुनिर जमादार,सुरेश चौगुले  यांनी मनोगते व्यक्त केली.

        या सभेस चेअरमन  उदय चौगुले, व्हा .चेअरमन कपील भोसले, संचालक माजी सभापती राजेश पाटील , आदगोंडा पाटील,प्रकाश पाटील,सुनील खोचगे, शशिकांत पाटील , महावीर चौगुले, राजेंद्र कदम,स्वप्नील कोळेकर, अशोक मुंडे,श्रीमती शांतादेवी कोळेकर, श्रीमती रोहिणी पाटील आदी मान्यवरांसह  सभासद, संस्थेचे कर्मचारी, हितचिंतक मोठया संख्येंनी उपस्थित होते . आभार व्हा. चेअरमन कपिल भोसले  यांनी मानले.

Sunday, 4 September 2022

लम्पी स्किन या आजाराची लागण झालेल्या जनावरांना गोकुळ दूध संघाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत उपचार

हेरले / प्रतिनिधी
लम्पी स्किन या आजाराची लागण झालेल्या अतिग्रे गावातील शेतकऱ्यांच्या गोठ्यास कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक गोकुळ संघाचे जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी भेट दिली. यावेळी गोकुळ दूध संघाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या आयुर्वेदिक औषधाचे वाटप डोंगळे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.
हा आजाराची सुरुवात राजस्थान राज्यातून झाली आहे. हा संसर्गजन्य आजार असुन जनावरांचे आरोग्य धोक्यात येवू शकते व दूध उत्पादनात घट होते. या आजाराची भिती बाळगण्याची गरज नाही. हा आजार योग्य उपचार केल्यास बरा होतो.‌असे सांगून गोकुळ दूध संघाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत योग्य ती काळजी घेतली जाईल असे आश्वासन डोंगळे यांनी दूध उत्पादक शेतक-यांना दिले.
यावेळी डॉ. मगरे व संतुलित आहार कार्यक्रमाचे प्रतिनिधी मुबारक हजारी उपस्थित होते.
फोटो......
अतिग्रे येथील आजारी जनावरांच्या गोठ्यास भेटी प्रसंगी माहिती घेताना अरुण डोंगळे,  डॉ. मगरे व मुबारक हजारी.

Saturday, 3 September 2022

आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांची माफी न मागितल्यास कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार : आमदार प्रा. जयंत आसगावकर


कोल्हापूर / प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार प्रशांत बंब यांनी २३ऑगस्ट २०२२ रोजी शिक्षका विरोधी केलेल्या वक्तव्य विषयी त्यांना समज देऊन त्यांनी शिक्षकांची क्षमा याचना केली नाही तर कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ त्यांच्या विरोधात आंदोलन करणार असा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी.लाड होते तर शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली.
      महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार प्रशांत बंब यांची शिक्षकांविरोधी वक्तव्य त्यांचे शासनाचे शैक्षणिक धोरण व प्रचलित आदेश याविषयी अज्ञान सिद्ध करणारी आहेत. शिक्षकांना मुख्यालयी ठिकाणी राहणे  अनिवार्य करताना त्यांच्यासाठी शाळेजवळ निवास व्यवस्था करणे, शाळेतील मुला मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारणे, आदी बाबी आरटी कायद्यानुसार शासनावर बंधनकारक आहेत. यासाठी शासन असमर्थ ठरले आहे. शासनाने दिनांक  ७ ऑक्टोबर  २०१६ रोजीच्या आदेशानुसार ग्रामीण विभागात शिक्षकांना मुख्यालयाच्या  ठिकाणी राहणे अनिवार्य नसल्याचा निर्णय घेतलेला आहे. शिवाय विद्यार्थ्यांची प्रगती कमी अधिक असण्यास केवळ शिक्षकांना जबाबदार धरण्याचा आमदार बंब यांचा जावई शोध त्यांच्या शैक्षणिक आकलन क्षमते विषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. तसेच सभागृहातील व व्हायरल ऑडिओ मधील त्यांची शिक्षका विषयी वक्तव्य आमदार या नात्याने सभ्यता व विषयाचे गांभीर्य  या संबंधी त्यांची बेफिकिरी व सत्तेचा उन्माद दर्शवणारी आहे. तसेच प्रगतीशील महाराष्ट्रात असभ्य व बेमुर्वतखोर व अभ्यास न करता सवंग बकवास करणारे लोकप्रतिनिधी असणे हा महाराष्ट्राला लागलेला सांस्कृतिक कलंक असल्याने अशा वृत्तीचा व प्रवृत्तीचा निषेध होणे व त्यास प्रोत्साहन मिळणार नाही यासाठी  कारवाई होणे सामाजिक दर्जेदारपणा सुरक्षित  ठेवण्यासाठी आवश्यक आहे. अशी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची धारणा आहे म्हणून आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभा सभागृहात दिनांक २३ ऑगस्ट  २०२२ रोजी शिक्षकविरोधी जी मुक्ताफळे उधळी  याबद्दल कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आमदार प्रशांत बंब यांचा समस्त शिक्षकांच्या वतीने जाहीर निषेध करीत आहे. तसेच त्यांनी शिक्षकांची क्षमा याचना करावी अशी मागणी करीत आहोत.जर त्यांनी शिक्षकांची क्षमा याचना केली नाही तर त्या विरोधात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ तीव्र आंदोलन करणाच्या निर्णय घेण्यात आला.
      तसेच महाराष्ट्र शासनाने शाळेतील प्रत्येक वर्गात वर्गशिक्षकांचे  फोटो लावण्याचा जो निर्णय घेतला आहे तो शिक्षकांच्यावर अविश्वास निर्माण करणारा आहे. शाळेतील गुणवत्ता राखण्यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करत असतात. फोटो लावल्याने गुणवत्ता राखली जाईल हे धोरण असंविधानात्मक  आहे. कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठांनी या विरोधात  झालेल्या बैठकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही शाळेमध्ये शिक्षकांचे फोटो लावू नयेत असा निर्णय घेण्यात आला.  
५ सप्टेंबर रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर कायम विनाअनुदानित शाळातील प्रश्नांसाठी शिक्षक दिन काळा दिन म्हणून साजरा करण्याचा जो निर्णय कायम विनाअनुदानित संघटनांनी घेतलेल्या निर्णयास पाठिंबा देण्याचा शैक्षणिक व्यासपीठाने निर्णय घेतला.
   या सभेस बी .जी. बोराडे, पी. एस. हेरवाडे, खंडेराव जगदाळे, बाबासाहेब पाटील, सुधाकर निर्मळे, उदय पाटील, शिवाजी माळकर, उमेश देसाई, सुधाकर सावंत, राजेंद्र कोरे, आदी मान्यवरांसह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
    फोटो 
शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देतांना व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड यांच्यासह शिक्षक संघटनेंचे प्रमुख पदाधिकारी.