Friday, 29 September 2023

ए.वाय.कदम यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय 'आदर्श ग्रामविकास अधिकारी' हा पुरस्कार जाहीर

हेरले / प्रतिनिधी
पुलाची शिरोली
येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी ए.वाय.कदम यांना महाराष्ट्र शासनाचा  राज्यस्तरीय 'आदर्श ग्रामविकास अधिकारी' हा  पुरस्कार जाहीर झाला आहे. 
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने आदर्श ग्रामविकास पुरस्कारासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एकाच व्यक्तीची निवड केली जाते. सन २१- २२ या सालाकरीता आनंदा यशवंत उर्फ ए.वाय . कदम यांची निवड करण्यात आली आहे. या कालावधीत त्यानी किणी व पुलाची शिरोली ता. हातकणंगले येथे यशवंत पंचायत राज यासह शासनाच्या वेगवेगळ्या योजना राबवून आदर्श गाव बनविण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. तसेच कदम यांनी पन्हाळा व हातकणंगले तालुक्यातील नामांकीत ग्रामपंचायतीमध्ये कामाचा ठसा उमटविला आहे.
या निवडीमुळे कदम यांच्यावर संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होवू लागला आहे.

Thursday, 28 September 2023

कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचाशनिवार दि. ३० रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा.


कोल्हापूर / प्रतिनिधी
 कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व कोल्हापूर जिल्हा माध्य. व उच्च माध्य. शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शासनाचे शिक्षण विरोधी आदेश व धोरणांना विरोध करण्यासाठी
शनिवार दि. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शिक्षक आमदार प्रा जयंत आसगावकर, व्यासपीठ अध्यक्ष  एस. डी.लाड शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. ही पत्रकार परिषद विद्याभवन येथे संपन्न झाली.
  मोर्चात जिल्ह्यातील सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक सामील होणार आहेत. मोर्चाचा मार्ग टाऊन हॉल दसरा चौक - व्हीनस कॉर्नर - बसंत बहार टॉकीज मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय असा राहील.
या मोर्चाचे नेतृत्व शिक्षक आमदार जयंत आसगांवकर करतील. कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले जाईल
  अलिकडच्या काळात महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्र उद्घवस्त करण्यासाठी शासनाच्या शिक्षण विभागातर्फ अनेक जाचक, चुकीचे, अन्यायकारक आदेश सातत्याने काढले जात आहेत. या सर्व बाबींमुळे शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटक म्हणजे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक यांच्यात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
 शिक्षण क्षेत्रावर अन्याय करणा-या महत्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे :-
    शासकीय शाळांमध्ये कंत्राटदाराच्या माध्यमातून शिक्षण भरती केली जाणार आहे.  महाराष्ट्र राज्यातील ६२ हजार शासकीय शाळा कार्पोरेट कंपन्याना चालविण्यासाठी दत्तक दिल्या जाणार असल्याचे धोरण जाहीर झाले आहे.
 भारतीय राज्यघटनेच्या कलम ४५ अंतर्गत १४ वर्षांखालील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणासाठी
शिक्षणाच्या सुविधा पुरविणे हे राज्य व केंद्र शासन यांच्यावर बंधनकारक आहे. शिक्षण कायदा २००९नुसार शिक्षण मिळणे हा १४ वर्षाखालील बालकांचा मुलभूत हक्क अधिकार आहे व ती जबाबदारी राज्य शासनाची आहे. कोर्पोरेट कंपन्यावर या जबाबदा-या टाकून शासन पळवाट शोधत आहे.
   शिक्षकांची व शिक्षण सेवकांची रिक्त पदे भरण्यास शासन टाळाटाळ करत आहे.नवीन पेन्शन योजना अन्यायकारक असल्याने जुनी पेन्शन योजना सर्वांसाठी लागू न करणे. शिक्षकांच्यावर अलिकडे असंख्य अशैक्षणिक कामे लादून त्यांना अध्यापन प्रक्रीयेपासून वंचित केले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे. नवभारत साक्षरता अभियानाची शाळा सुरु होण्यापूर्वी व शाळा सुटल्यांवर करावी लागत आहेत. सदरच्या कामांमुळे शिक्षकांचे शारिरीक व मानसिक खच्चीकरण होत आहे. शिक्षण क्षेत्र वाचविण्यासाठी हे नवभारत साक्षरता अभियान स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबविणे आवश्यक आहे. राष्ट्राच्या प्रगतीसाठी जीडीपीच्या ६% शिक्षणांवर खर्च झाला पाहिजे. परंतु शासन प्रत्येक वर्षी शिक्षणावरचा खर्च कमी करु पहात आहे.२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून शाळा समुह योजना सुरु करणे गोरगरीब, मध्यमवर्गीय बहुजनांचे शिक्षण बंद पाडण्यासाठी शासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत ही बाब निषेधार्ह आहे.
   प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे असतील
     शिक्षणाचे खाजगीकर व कंत्राटीकरण रद्द करावे, शाळा चालविण्याचे अधिकार कार्पोरेट कंपन्याना देण्याचे अधिकार रद्द करावेत,अशैक्षणिक कामे रद्द करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे,
 जूनी पेन्शन त्वरीत लागू करावी,नवभारत साक्षरता योजना स्वंतंत्र यंत्रणेमार्फत राबवावी, शिक्षक व शिक्षण सेवकांची रिक्त पदे त्वरीत भरावीत,
कनिष्ठ महाविद्यालयाकडील विद्यार्थी संख्येची अट शिथील करावी.

    या बैठकीस शिक्षक नेते दादासाहेब लाड, बी. जी. बोराडे, चेअरमन सुरेश संकपाळ , सचिव दत्ता पाटील, राजाराम वरुटे, भरत रसाळे, बाबासाहेब पाटील, मोहन भोसले, सुधाकर निर्मळे,पी एस हेरवाडे,खंडेराव जगदाळे, शिवाजी माळकर, प्रा. सी. एम. गायकवाड, सुंदर देसाई, सुधाकर सावंत, उमेश देसाई, राजेंद्र कोरे, संतोष आयरे, आर. डी. पाटील, काकासाहेब भोकरे, के. के. पाटील, उदय पाटील, प्रसाद पाटील, इरफान अन्सारी,रविंद्र पाटील,प्रमोद तौंदकर, संभाजी बापट, गौतम वर्धन, मिलिंद पांगिरेकर, मनोहर पाटील आदीसह शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
  फोटो 
पत्रकार परिषदेत बोलतांना शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर अध्यक्ष एस. डी. लाड शिक्षक नेते दादासाहेब लाड चेअरमन सुरेश संकपाळ आदी

Wednesday, 27 September 2023

. वैशाली करके यांना नेशन बिल्डर पुरस्कार (उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार)

हेरले / प्रतिनिधी

हेरले (ता. हातकणंगले) येथील 
सौ. वैशाली विशाल करके सहायक शिक्षिका बालावधूत हायस्कुल, मौजे वडगाव यांना रोटरी क्लब ऑफ हॉरिसन कोल्हापूर यांच्या वतीने नेशन बिल्डर पुरस्कार(उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार)
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.शाहू स्मारक दसरा चौक कोल्हापूर येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

   सौ. वैशाली विशाल करके म्हणाल्या,
हा पुरस्कार लोकसेवा शिक्षण संख्येचे अध्यक्ष  बाळासो करके, उपाध्यक्ष  नारायण संकपाळ ,शालेय समिती चेअरमन  सदाशिव चौगुले, सेक्रेटरी  संजय चौगुले, मुख्याध्यापक पी. बी. खांडेकर व माजी मुख्याध्यापक आर. बी. पाटील यांचे वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शन  व प्रेरणेमुळे हा पुरस्कार मिळाला आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.

   फोटो 
रोटरी क्लब ऑफ हॉरिसन कोल्हापूर यांच्या पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी पुरस्कारकर्तेसह क्लबचे पदाधिकारी.

Tuesday, 26 September 2023

प्रा. अभिनंदन आलमान यांना डॉक्टरेट

हेरले /प्रतिनिधी
संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी, महागांव (ता. गडहिंग्लज) येथे कार्यरत असलेल्या प्रा. अभिनंदन अशोक आलमान (हेरले ) यांनी पी. एच. डी. (डॉक्टरेट) पदवी प्राप्त केली.
मध्यप्रदेशातील मंदसौर युनिव्हर्सिटी मंदसौर मध्ये सादर केलेल्या डॉकिंग स्टडीज, सिंथेसिस अँड इव्याल्युएशन ऑफ अँटी कॅन्सर अॅक्टिविटी ऑफ चालकोन बेस्ड इमिइयाझो थायाडायाझोल डेरीव्हेटिव (Docking Studies synthesis and evaluation of anticancer activity of chal cone based imidazo thiadiazole derivatives) या प्रबंधास डॉक्टरेट पदवी मिळाली.
या साठी त्यांना गाईड म्हणून डॉ. विशाल सोनी आणि सह गाईड म्हणून डॉ. एस्. जी. किल्लेदार यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. तसेच महागाव कॉलेज मधील प्राचार्य व प्राध्यापक यांचेही सहकार्य लाभले.

येवतीत कृषीकन्यांकडून 'मेटारायसिम 'बुरशीच्या वापराचे प्रात्यक्षिक सादर


कोल्हापूर / प्रतिनिधी

डॉ डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांनी ग्रामीण (कृषी) जागरूकता आणि कृषी 
औदयोगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत हुमनी कीड नियंत्रणासाठी मेटारायझिम' बुरशीचा वापर कसा करावा, याचे प्रात्याक्षिक येवती (ता. करवीर) येथे सादर  केले. हुमनीचा जीवनक्रम तसेच मेटारायझिम बुरशीच्या वापराची मात्रा व दक्षता आणि त्याची आळवणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक कृषी कन्या तन्वी चव्हाण, माधुरी भोर, अश्विनी सानप, अमृता पवार, श्रद्धा  सनस, श्वेता गोसावी, निकिता चव्हाण यांनी करून दाखवले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डी. एन. शेलार , अकॅडमीक इंचार्ज आर आर पाटील , प्रोग्रॅम को- ऑर्डीनेटर डॉ. एस. एम. घोलपे , प्रोग्रॅम ऑफिसर एम. एन. केंगरे  यांचे मार्गदर्शन लाभले.
    फोटो 
येवतीत कृषीकन्यां 'मेटारायसिम 'बुरशीच्या वापराचे प्रात्यक्षिक सादर करतांना

राजर्षी शाहू विद्यामंदिर मध्ये मेरी माटी मेरा देश उपक्रम उत्साहात

कोल्हापूर प्रतिनिधी 

  राजर्षी शाहू विद्यामंदिर  शाळा क्र ११मध्ये केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील, उत्तम कुंभार आरोग्य मित्र राजू कदम मुकादम यांच्या प्रमुख उपस्थिती त मेरी माटी मेरा देश हा उपक्रम संपन्न झाला.

सुशिल जाधव सर  यांनी पंचप्राण शपथ विद्यार्थ्यांना दिली.शाळेतील शिक्षिक आसमा तांबोळी, उत्तम पाटील , मीनाज मुल्ला  तमेजा मुजावर , कल्पना पाटील,सावित्री काळे  यानी सहकार्य केले
 
तसेच विद्यार्थ्यांनी मंगला लाखे प्राची रानगे तनिष्क कुंभार भक्ती सीसाळ,यश कांबळे,गणेश घाटगे,साइराज दाभाडे, संस्कृती पोवार, दिव्या नाझरे,आरव लोंढे,प्रणव पाटील,दिया पाटोळे या विशेष विद्यार्थिनींनी सहकार्य केले इरय्या गणेकोपा याने आभार मानले फायर ब्रिगेड कसबा  बावडा भगतसिंग वसाहत मध्ये प्रभात फेरी काढण्यात आली आभार आरव कोरवी याने मानले.

Sunday, 24 September 2023

श्री सद्गुरु निरंजन महाराज आश्रम, मौजे वडगांव यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

हेरले / प्रतिनिधी

श्री सद्गुरु निरंजन महाराज आश्रम, मौजे वडगांव (ता. हातकणंगले) येथे
ब्रह्मलीन श्री. सद्गुरु विनयानंद महाराज यांची तृतीय पुण्यतिथी मंगळवार दि. २६ सप्टेंबर  रोजी संपन्न होत आहे.या निमीत्ताने आश्रमामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
 : 'श्री' चे पादुकांना अभिषेक सुर्योदय ६:३० वा., नोंदणी व चहापान सकाळी ८:०० ते ९:००,९:०० ते ११:०० भजन श्री भजनी मंडळ, डॉ. गुंडोपंत कुलकर्णी व शौकत बहुरुपी, हेरले,सकाळी ११:०० ते १२:००: प्रवचन ह.भ.प.  हभप मधुकर पाटील महाराज कावणे,
दुपारी १२:०० ते १२:०५श्री सद्गुरु विनयानंद महाराज पुण्यतिथी सोहळा
दुपारी १२:०५ ते १:०० प्रवचन परमार्थभूषण ह. भ. प. श्री. नारायण महाराज एकल, जोगेवाडी
दुपारी १:०० ते १:१५ : आर्शिवचन ह.भ.प. श्री. दिपक (नाना) महाराज केळकर, सांगली दुपारी १:१५ ते १:३० : सत्कार समारंभ : ह.भ.प. गुरुवर्य श्री. शामनाथ बत्ते महाराज, इचलकरंजी
( अमृतहस्ते ) ह.भ.प. स्वामीभक्त श्री. नंदुआण्णा माणगावकर, शिरोळ : ह.भ.प. गुरुवर्य श्री. मधुकर पाटील महाराज, कावणेह.भ.प. गुरुवर्य श्री. स्वामी सेवानंद महाराज, भादोले.
दुपारी १:३० ते ३:३० महाप्रसाद,
दुपारी ३:३० ते ५:३० : विनयांजली अभंगवाणी, सादरकर्ते स्वरबहार ग्रुप, पेठ वडगाव,सायं. ५:३० ते ६:३०: प्रवचन ह.भ.प. गुरुवर्य श्री भाऊसाहेब महाराज पाटील, शेकीन हासुर,सायं. ६:३ सुर्यास्त व आरती या कार्यक्रमास कोल्हापूर जिल्ह्यातील सद्भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन श्री सद्गुरु निरंजन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Saturday, 23 September 2023

शिरोली पोलिस ठाणे व मौजे वडगांव ग्रामपंचायतीच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न


हेरले / प्रतिनिधी 
शिरोली एम. आय.डी.सी. पोलिस ठाणे व ग्रामपंचायत  मौजे वडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व महात्मा गांधी हॉस्पीटल ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने गणेशोत्वानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये एकूण ४३ रक्तदात्यानी रक्तदान केले. या शिबिराचे उद्‌घाटन शिरोली एम. आय. डी. सी. पोलिस ठाण्याचे सपोनि पंकज गिरी व सरपंच कस्तुरी पाटील यांनी केले. 
              यावेळी प्राथमिक आरोग्य उपकेद्र मौजे वडगाव येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी मार्गदर्शन केले . ते म्हणाले की , भारत देशामध्ये दिवसेंदिवस रक्ताचा तुटवडा भासत आहे. रक्त ही आशी गोष्ट आहे की ती कृत्रिमरित्या बनविता येत नाही. त्यामुळे रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे. एका रक्तदात्यामुळे पाच लोकांचा जीव वाचू शकतो.  गणेशोत्वानिमित्त या रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याने गावातील तरुण मंडळापुढे सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले आहे. यावेळी बाळासो पाटील व रुपाली पाटील या पती पत्नीने रक्तदान करुण समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे . यावेळी पोलिस स्टेशनच्या वतीने प्रमाणपत्र व रक्तदात्यांना मोफत हेल्मेट देण्यात आले.
             यावेळी सपोनि पंकज गिरी , सरपंच कस्तुरी पाटील, उपसरपंच सुनिल खारेपाटणे, ग्रामसेविका भारती ढेंगे , ग्रा.पं. सदस्य सुरेश कांबरे, रघूनाथ गोरड, स्वप्नील चौगुले, तंटामुक्त अध्यक्ष मधुकर आकिवाटे , सतिश वाकरेकर , अमोल झांबरे, अविनाश पाटील, पीएसआय इम्रान मुल्ला, पोलिस कर्मचारी निलेश कांबळे, जगन्नाथ महाले, नितिन भंडारे, अनिल पाटील, ऋषीकेश पवार आदी उपस्थित होते.

एका रक्तदात्यामुळे पाच लोकांचा जीव वाचू शकतो त्यामळे रक्तदान करणाऱ्याचीही सुरक्षितता महत्वाची आहे. म्हणून पोलिस ठाण्याच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यांना मोफत हेल्मेट देण्यात आले आहे .
               सपोनि पंकज गिरी
              शिरोली एमआयडीसी
                पोलिस स्टेशन

फोटो 
    रक्तदान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी उपास्थित मान्यवर

Friday, 22 September 2023

मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेजच्या राजवर्धन पुजारी ची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर / प्रतिनिधी

कोनवडे ता. भुदरगड येथे संपन्न झालेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड च्या पै. राजवर्धन पांडुरंग पुजारी याने 70 किलो फ्री स्टाइल कुस्ती प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला त्याची बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.पै.विवेक घाटगे यांने 82 किलो वजनी गटात तृतीय क्रमांक पटकावला.क्रीडा शिक्षक व्ही. आर. गडकरी यांचे मार्गदर्शन लाभले.विश्वनाथराव पाटील लाल आखाडा कुस्ती संकुलात तो वस्ताद  तुकाराम चोपडे, पांडुरंग पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.
       शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव  जयकुमार देसाई साहेब, अध्यक्षा श्रीमती शिवानी देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत , चेअरमन डॉ. मंजिरी देसाई मोरे, पेट्रन कौन्सिल मेंबर, युवा नेते दौलतराव देसाई, कौन्सिल मेंबर बाळ डेळेकर,शाळा समिती चेअरमन प्रवीणसिंह पाटील प्राचार्य एस. आर. पाटील, उपप्राचार्य एस. पी .पाटील, उपमुख्याध्यापक एस.बी.सुर्यवंशी, पर्यवेक्षक एस बी.साठे यांचे प्रोत्साहन लाभले.

फोटो

राजवर्धन पुजारी

शिक्षणाचे कंत्राटीकरण कंपनीकरण खाजगीकरण, अशैक्षणिक कामे रद्द करा व जुनी पेन्शन योजना सुरु करा या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा शनिवार दि. ३० सप्टेंबर रोजी कोल्हापूरात भव्य मोर्चा निघणार.


कोल्हापूर / प्रतिनिधी
  शिक्षणाचे खाजगीकरण, कंत्राटीकरण कंपनीकरण, अशैक्षणिक कामे रद्द करा व जुनी पेन्शन योजना ताबोडतोब सुरु करा. शिक्षण ही मुलभूत गरज असून शासनाने अलिकडेच शिक्षण क्षेत्रात घेतलेल्या चुकीच्या व अन्यायकारी निर्णयाने शिक्षण ही मुलभूत गरज या संकल्पनेचा कडेलोट झाला आहे. आपण शिक्षक विद्यार्थी बेरोजगार युवक व समाजाने शिक्षणाच्या कंपनीकरणास व कंत्राटीकरणास तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या अशैक्षणिक व ऑनलाईन कामास विरोध न केल्यास केवळ गोर गरिबांचेच नव्हे तर मध्यम वर्गिय बहुजनांच्या पाल्यांचे आतोनात नुकसान अटळ आहे. औपचारिक शिक्षणाचे क्षेत्र नष्ट केले जात आहे. शिक्षणाचे कंपनीकरण तातडीने माघे घ्या, सक्तीचे मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे प्रत्येक बालकाचा हक्क आहे. त्यासाठी केवळ शिक्षकांना शिकवू दया. कमी पटसंख्येचे कारण देऊन कोणतीही शाळा बंद करू नका, शिक्षकांच्या रिक्त जागा तात्काळ भरा व शिक्षणावर उत्पन्नाच्या ६ टक्के खर्च करा व जुनी पेन्शन योजना ताबोडतोब मंजूर करा या मागण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठच्या वतीने शनिवार दि. ३० सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता टाऊन  हॉलपासून जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय  शिक्षक आमदार जयवंत आसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष एस. डी. लाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
         चौकट
संस्थाचालक संघ , मुख्याध्यापक संघ,प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक संघटनांनी व विद्यार्थी  पालक, बेरोजगार संघटनांनी शनिवार दि. ३० सप्टेंबर रोजीच्या भव्य मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने करण्यात आले आहे.
   या सभेस शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर, अध्यक्ष एस. डी. लाड,शिक्षक नेते दादा लाड, बी. जी. बोराडे, बाळ डेळेकर, अनिल लवेकर, 
प्रा. किसनराव कु-हाडे,राजाराम वरुटे ,बाबा पाटील, दत्ता पाटील, डॉ.डी.एस. घुगरे, सुधाकर निर्मळे,व्ही. जी. पोवार, आर वाय पाटील, उदय पाटील,के. के. पाटील, काकासाहेब भोकरे, आर.डी. पाटील,सुधाकर सावंत, मिलींद बारवडे, उमेश देसाई, राजेंद्र कोरे, मिलींद पांगिरेकर,बी. के. मडिवाळ, संदीप पाथरे,अरुण मुजुमदार, इरफान अन्सारी आदी पदाधिकारीसह ३२ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 
        फोटो 
बैठकी प्रसंगी बोलतांना शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर, शेजारी अध्यक्ष एस. डी. लाड,शिक्षक नेते दादा लाड, बी. जी. बोराडे आदी मान्यवरांसह अन्य.

Wednesday, 20 September 2023

कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा 15% लाभांश

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना 15% लाभांश देण्याची घोषणा पतसंस्थेचे चेअरमन श्री उमर जमादार यांनी 60 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थाना वरुन बोलताना केली.                          संस्थेस 2022-23 साली ऑडिट वर्ग अ मिळाला आहे. संस्थेकडे मार्च 2023 अखेर 40 कोटी च्या ठेवी असून अहवाल सालात 17 लाख 58 हजार नफा झाला असल्याचे जाहीर केले.

संस्थेचे सचिव सुधाकर सावंत यांनी अहवालाचे वाचन केले संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला व सभसदांच्या प्रश्नाबाबत माहिती दिली.ई-बाईक,सोलर करीता 1 लाख 50 हजार रुपये 8.25 % ने देण्याचा उपविधी दुरुस्तीस जनरल सभेने मंजुरी दिली. 
 या सभेस व्हाईस चेअरमन कुलदीप जठार,खजानीस संजय पाटील,वसंत आडके,भारती सूर्यवंशी,मनीषा पांचाळ,लक्ष्मण पोवार,राजेंद्र गेंजगे,मनोहर सरगर,सुनील नाईक,विजय माळी,विलास पिंगळे,प्रभाकर लोखंडे,नेताजी फराकटे ,प्रदीप पाटील,विजय सुतार उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार उमेश देसाई यांनी मानले.

पुलाची शिरोलीत गरजू मुलींना सायकल वाटप

हेरले / प्रतिनिधी
सावित्रीबाई बहुउद्देशीय महिला सामाजिक संस्थेने हा राबविलेला उपक्रम समाज कार्यासाठी दिशा देणारा ठरेल. असे मत सरपंच सौ.  पद्मजा करपे यांनी व्यक्त केले. त्या शिरोली येथील वीर सावरकर नगर मध्ये आयोजित गरीब व गरजू मुलींना सायकल वाटप कार्यक्रमात बोलत होत्या. 
 मानव हक्क सुरक्षा संघटनेच्या कोषाध्यक्ष सौ. राणी  खोत, व भाजपच्या महिला आघाडी जिल्हा चिटणीस सौ. अश्विनी पाटील  या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
 त्या पुढे म्हणाले सामाजिक कार्यकर्ते व मानव हक्क संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा सौ .अनिता रावण यांनी सावित्रीबाई बहुउद्देशीय महिला सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून येथील गोरगरीब मुलींना शाळेला ये- जा करण्यासाठी सुमारे २० सायकली उपलब्ध करून दिल्या . हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून  सामाजिक चळवळीला दिशा देणारा ठरेल. 
 यावेळी सौ. राणी खोत, सौ. कमल कौंदाडे,  महमद महात आदींची भाषणे झाली.
 या कार्यक्रमास माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे, सोनाली पोवार, नेत्रदिपा पाटील, चित्रलेखा पाटील, आशा जाधव, छाया खोत, माया घोरपडे, शाहीन भालदार, शितल मगदूम, छाया थोरवत,  सुवर्णा  शिंदे, गिता पोवार, अर्चना झांबरे, श्रीकांत कांबळे, प्रकाश शिंदे, संदीप शिंदे ,योगेश खवरे, विनोद आंची, राजू देसाई, आरीफ सर्जेखान, सागर कौंदाडे, बाळू पाटील  आदीसह ग्रामपंचायत सदस्य,  विद्यार्थी पालक व  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक मानव हक्क व सुरक्षा संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा सौ. अनिता रावण यांनी केले, सुत्रसंचालन विजय जाधव यांनी केले, आभार
फोटो.....
पुलाची शिरोलीत गरीब मुलींना सायकल वाटप करताना सरपंच पद्मजा करपे, जिल्हा अध्यक्षा अनिता रावण, कमल कौंदाडे, अश्विनी पाटील, राणी खोत आदी.

Sunday, 17 September 2023

नेहरुनगर विद्यालयत तृणधान्य पाककला स्पर्धेत पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद




कोल्हापूर प्रतिनिधी :

 म.न.पा.नेहरुनगर विद्यामंदिर क्र.61 मध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत तृणधान्य पाककला स्पर्धा घेण्यात आली.

 या स्पर्धेमध्ये शाळेच्या पालकांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला.
पाककला स्पर्धे मधील  विजेते
 प्रथम क्रमांक -भाग्यश्री नार्वेकर 
 द्वितीय क्रमांक- करिष्मा शेख 
 तृतीय क्रमांक- शाकिरा  शेख  व मधुरा रवींद्र बोनगे विभागून. या सर्व विजेत्या स्पर्धकांना बक्षिस  मुख्याध्यापिका नलिनी साळुंके मॅडम यांच्या हस्ते देण्यात आले.
या स्पर्धेचे परीक्षण शैलजा पाटील व सुप्रिया सदरे यांनी केले.
याप्रसंगी शाळेचे शिक्षक सेवक , पालक उपस्थित होते.
पाककला उपक्रामाचे संयोजन सविता जमदाडे व मनाली सातोसे मॅडम यांनी केले.

मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेजच्या दोन मल्लांची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर /प्रतिनिधी

कोनवडे ता. भुदरगड येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड च्या पै. राजवर्धन पांडुरंग पुजारी याने 70 किलो फ्री स्टाइल कुस्ती प्रकारात प्रथम क्रमांक व पै. विवेक सुनील घाटगे यांने 82 किलो ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. या दोन्ही ही पैलवानाची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. क्रीडा शिक्षक व्ही. आर. गडकरी यांचे मार्गदर्शन लाभले.
       शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव जयकुमार देसाई , अध्यक्षा श्रीमती शिवानी ताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत , चेअरमन डॉ. मंजिरी देसाई मोरे, पेट्रन कौन्सिल मेंबर युवा नेते दौलतराव देसाई, कौन्सिल मेंबर बाळ डेळेकर, मुख्याध्यापक एस. आर. पाटील, उपप्राचार्य एस. पी .पाटील, उपमुख्याध्यापक एस.बी.सुर्यवंशी, पर्यवेक्षक एस बी.साठे यांचे प्रोत्साहन लाभले.

हेरलेत अमृत कलश यात्रा‘माझी माती, माझा देश’ अभियानाला प्रतिसाद


हेरले /प्रतिनिधी

  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत ‘माझी माती, माझा देश’ या मोहिमेअंतर्गत १ ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये अमृत कलशांमध्ये माती गोळा करण्यासाठी अमृत कलश यात्रा आयोजन करण्याची सूचना केंद्र व राज्याकडून केली होती. या पार्श्वभूमीवर हेरले (ता. हातकणंगले) येथे प्रभात फेरी काढून  अमृत कलशांमध्ये माती गोळा करण्यासाठी अमृत कलश यात्रा काढण्यात आली.
     अमृत कलश यात्रेची सुरुवात शनिवार (ता.१६) ग्रामपंचायत कार्यलयाकडून सरपंच राहुल शेटे उपसरपंच 
महंमदबक्तीयार जमादार  ग्रामविकास अधिकारी बी. एस. कांबळे  सर्व 
ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी राहूल निंबाळकर, संजय खाबडे यांच्या हस्ते झाली.या यात्रेमध्ये केंद्र शाळा, कन्या शाळा व शाळा नंबर दोनचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.माळभागावरून  वाजत गाजत सुरवात करण्यात आली. ‘माझी माती, माझा देश’ या मोहिमेत प्रभागनिहाय फिरुन अमृत कलशांमध्ये माती गोळा करण्यात आली.या कार्यक्रमास गावातील नागरीकांकडून मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे अमृत कलश यात्रा यशस्वी झाली.

       फोटो
हेरले येथे माझी माती माझा देश या मोहिमांतर्गत माळभाग येथे महिला 
अमृत कलशामध्ये माती घालत असताना

Friday, 15 September 2023

राजर्षी शाहू मध्ये पाककला उत्साहात संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी 
म न पा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11 कसबा बावडा येथे प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत माता पालकांच्या पाककृती स्पर्धा उत्साहात संपन्न झाली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इनरव्हील क्लब ऑफ सनराइजच्या अध्यक्ष माननीय मनीषा जाधव माननीय सुरेखा जाधव व माननीय वृषाली बाड त्याचबरोबर परीक्षक म्हणून रेवती कुंभार आणि अनिता पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. 

  शाळेचे केंद्र मुख्याध्यापक अजितकुमार पाटील सर यांनी सर्व मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले यानंतर उत्तम कुंभार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच तमेजा मुजावर यांनी तृणधान्यातील आहाराचे महत्त्व सांगितले आजच्या पाककृती स्पर्धेत तृणधान्यापासून पराठा धपाटे इडली आंबोळी, मोदक शिरा वडी खीर चकली, वडा यासारखे आकर्षक व चविष्ट पदार्थ बनवण्यात आले होते यानंतर सर्व पदार्थांचे रेवती कुंभार व अनिता पाटील यांनी परीक्षण करून क्रमांक काढले पाककृती स्पर्धेतील विजेता स्पर्धकांना बक्षीस वाटप करण्यात आले
 विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे प्रियांका अजय गायकवाड प्रथम क्रमांक निशा महेश माळी द्वितीय क्रमांक शुभांगी जगदीश चौगुले तृतीय क्रमांक प्रज्ञा प्रदीप रणदिवे उत्तेजनार्थ पुनम युवराज कुंभार उत्तेजनार्थ विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी डॉअजितकुमार  पाटील उत्तम कुंभार मीनाज मुल्ला सुशील जाधव उत्तम पाटील आसमा तांबोळी तमेजा मुजावर विद्या पाटील कल्पना पाटील सावित्री काळे तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अनुराधा गायकवाड दिपाली चौगुले कोमल कासे शुभांगी चौगुले नीलम पाटोळे वर्षा दाभाडे सारिका वडर  यांनी विशेष सहकार्य केले उत्तम कुंभार सर यांनी उपस्थित त्यांचे आभार मानले

मनपा.नेहरुनगर शाळेत 'मेरी माटी,मेरा देश' अभियानाअंतर्गत रॕली संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी                                                  कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक के.मंजुलक्ष्मी व उपायुक्त दरेकर मॕडम यांचे प्रेरणेतून आज मनपा.नेहरुनगर शाळेत मेरी माटी ,मेरा देश अभियानअंतर्गत रॕली काढण्यात आली.
       शालेय परिसरातील मातीचे संकलन करण्यात आले..रॕलीदरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर बॕनर तयार करुन सदर विषयावर भागातून घोषणा देण्यात आल्या.मेरी माटी,मेरा देश विषयावर विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली....                                                या अभियानासोबतच शाळेत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष अंतर्गत विविध तृणधान्य नमुने गोळा करण्यात आले होते. पालकांच्या घरी जाऊन मुठभर तृणधान्य जमवण्यात आले..
यामध्ये गहू,मका,ज्वारी,नाचणी इत्यादी तृणधान्यांचा संग्रह करण्यात आला..विद्यार्थ्यांनी घोषणा देऊन तृणधान्यांचे आहारातील महत्व  सांगितले.तृणधान्य ओळखण्याचे माॕडेल विद्यार्थ्यांनी बनवले होते.शिवाय तृणधान्याच्या प्रत्यक्ष रोपांचे शाळेत  प्रदर्शन मांडले होते.... 
   सर्व मुलांना खाऊ वितरण उपायुक्त मा.शिल्पा दरेकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.                          यावेळी शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, मुख्याध्यापिका नलिनी साळुंके,शिक्षक ,विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे फलकलेखन मच्छिद्र बगाड सर यांनी केले. वैविध्यपूर्ण तृणधान्यावर आधारीत भिंत्तिपत्रिका पल्लवी लाड यांनी तयार केले होते. आभार संजय पाटील यांनी मांडले...शालेय परिसर स्वच्छता सेवक अनिल साळोखे यांनी केली. या कार्यक्रमाचे नेटके संयोजन सरिता कांबळे ,सविता जमदाडे व विठ्ठल दुर्गुळे यांनी केले

Thursday, 14 September 2023

मौजे वडगाव येथे आयुष्यमान भव मोहिमेला सुरुवात


हेरले / प्रतिनिधी 
 मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयुष्यमान भव मोहिमेला सरपंच कस्तुरी पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत आयुष्यमान भव नामफलकाचे आनावरण करून सुरुवात करण्यात आली. तसेच या मोहिमेच्या आनावरण प्रसंगी अवयव दानाची शपथ घेण्यात आली. हि मोहिम दि. १ सष्टेंबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
            यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोलीच्या मेडिकल ऑफिसर जेसिका अँड्रयूज यांनी मार्गदर्शन केले व म्हणाल्या की, आयुष्यमान भव आपल्या दारी, स्वच्छता अभियान , अवयव दान जागृती यासह आभा कार्डचे महत्व सांगितले. या योजनेत सर्व कुटूंब सामाविष्ट होऊ शकते .तसेच या लाभार्थ्यांना संपूर्ण देशात कोणत्याही खाजगी व सरकारी हॉस्पीटल मध्ये मोफत उपाचार घेऊ शकतात. यावेळी आभा कार्ड व गोल्डन कार्डचे लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामसेविका भारती ढेंगे यांनी डेग्यू मुक्त विषयीची माहिती व जनजागृतीव स्वच्छाता संदर्भात माहिती दिली. यावेळीसुरेश कांबरे यांनी आपले मनोगत व्यक्त केली.
            यावेळी उपसरपंच सुनिल खारेपाटणे , ग्रामसेविका भारती ढेंगे ग्रा.पं. सदस्य सुरेश कांबरे , स्वप्नील चौगुले, रघूनाथ गोरड , सविता सावंत, दिपाली तराळ, तंटामुक्त अध्यक्ष मधूकर अकिवाटे, सतिश वाकरेकर , अविनाश पाटील , अमोल झांबरे , आरोग्य सेवक पी.एन. काझी, आरोग्य सहाय्यक मोहन साळवी, यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी , आशा वर्कर , अंगणवाडी सेविका व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो 
आभा कार्ड व गोल्डन कार्डचे वाटप तसेच मार्गदर्शन करतांना डॉ. जेसिका अँड्रयूज व मान्यवर

Tuesday, 12 September 2023

प्राथमिक शिक्षणातून स्री पुरुष समानता कशी रुजवता येईल - डॉ.अजितकुमार पाटील सर

               सामाजिक असमानता
शिक्षणामुळे सामाजिक समता प्रस्थापित होण्यात मदत होईल असा सिद्धांत आहे. सामाजिक समतेतील महत्त्वाचा भाग म्हणजे स्त्रीपुरुष समानता. तेव्हा जातीजमाती- मधील विषमता आणि स्त्रीपुरुष विषमता ही जी दोन आपल्या समाजातील ठळक वैगुण्ये आहेत त्यांचा प्रतिकार शिक्षणप्रक्रियेतून व्हायला हवा. हे काम सहज होणारे नाही. कारण विषमता तशीच चालू रहावी यासाठी त्याला बळकटी आणणाऱ्या अनेक यंत्रणा समाजात सतत कार्यरत आहेत. शिक्षण याचा येथील अर्थ शालेय औपचारिक शिक्षण असा आहे. हे शिक्षण आजतरी शंभर टक्के मुलांपर्यंत पोचतच नाही. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातही साक्षरता जेमतेम ५०% माणसांपर्यंत पोचली आहे. आणि तीसुद्धा साक्षरतेची व्याख्या लवचिक आणि पातळ करूनच. उलट विषमता कायम ठेवण्याची यंत्रणा शंभर टक्क्यांपर्यंत आयुष्यभर पोचते कारण तिचे मूळ आपल्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेत आहे. हे सहज शिक्षण जन्मापासून मरणापर्यंत घरीदारी आणि सामाजिक व्यवहारातून माणसांना मिळते. इतकेच नव्हे तर शालेय शिक्षण जे ६ ते १४ वयापर्यंत सक्तीचे आहे ते देणारी, त्याची आखणी करणारी मंडळीही या विषमतेच्या प्रभावातून मुक्त नाहीत. तेव्हा शिक्षणामुळे सामाजिक समता येईल असे समजणे हा आशावाद आहे. परंतु त्याची उभारणी मजबूत पायावर करायची झाली तर शिक्षण देताना सध्यापेक्षा कितीतरी डोळस आखणी आणि अंमलबजावणी हवी हे उघड आहे.

शिक्षण कुणाला मिळतं ?

सुरुवात हवी शिक्षण कुणाला कुणाला मिळतं इथपासून. प्रत्येक मूल शाळेत जातं का ? का जात नाही? शाळांचा विस्तार आता सर्वदूर आहे. पण शाळेत यायची मोकळीक सर्व मुलांना नाही. कितीतरी मुलं आर्थिक कारणांसाठी शाळेत पोचत नाहीत. पोचली तरी १-२ वर्षांत शाळा सोडून देतात व नंतर पुन्हा निरक्षरच राहतात. यामध्ये मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण जास्त आहे. मुलींना आईबाप रोजगारावर गेल्यावर घरकाम व लहान भावंडे सांभाळणे यासाठी घरी ठेवले जाते. प्रत्यक्ष पाहणीत असे आढळले की ५-६-७ वर्षांच्या मुलींवर सुद्धा कामाची जबाबदारी टाकली जाते व काम नीट झाले नाही तर त्याना मारहाण होते. एका दृष्टीने ही स्थिती बालकामगारांपेक्षा भयावह आहे. कारण कामगार घराबाहेर काम करत असल्याने त्यांना 
थोडी तरी रोख मजुरी मिळते. मुलींना या कामाचा मोबदला मिळत नाही, मान्यता नाही व जवळजवळ रोजच मारहाण होते. कारण वयाच्या मानाने काम जास्त व जबाबदारीचे असते. ते नीट होणे अशाच स्वतःची खेळण्याची कमी दाबून टाकावी त्यामुळे आत्मविश्वास खच्ची होती व कमी महत्वाचा हे भोवतालच्या माणसांच्या वागणुकीतून जाते. भी विषमतेच्या दृढमूलनाचे सहन शिक्षण म्हणते

परिसरातच शाळा हवी

या प्रवाहाविरुद्ध जाऊन मुलींना शिक्षण प्रवाहात ओढायचे तर दोन अटी आहेत. एक म्हणजे शाळा परिसरातच हवी आणि जोडून सांभाळण्याची व्यवस्था हवी. कोसबाडला असा यशस्वी प्रयोग ताराबाई मोडक व अनु वाघ यांनी केला. परंतु आज अशा प्रयोगांची शहरातूनसुद्धा अतिशय गरज आहे. काम जाताना घरातली सर्व मुले शाळेच्या आवारात सोपवून जाता आलं तरच शिक्षण संधी सर्व मुलींना मिळेल. अर्थात अशा शाळांना जोडून आरोग्य केंद्रही हवेच. कारण मुलांचे आरोग्य उत्तम नसले तर ती शिकण्याचा उत्साह कुठून दाखवणार? कित्येक मूल मतिमंद नसले तरी अपुल्या आहारामुळे व सततच्या आजारामुळे मागासलेलेच राहते. याच आरोग्यकेंद्रातून कुटुंब नियोजनाचेही शिक्षण पालकांना देता येईल. थोडक्यात म्हणजे प्रत्येक वस्तीत शाळा हे महत्त्वाचे, नवीन जीवन पद्धतीचे केंद्र ठरले पाहिले, आज तभी परिस्थिती नाही. शाळा वस्तीमध्ये हवी व आजूबाजूच्या सर्वांनी तिथेच शिकायला हवे. कारण लहानपणीच जर आज उच्च नीच समजली जाणारी मुले एकत्र मिसळली, खेळली, त्यांची मैत्री झाली तरच त्यांच्या मनात समतेचे बी रुजेल. आपल्याकडे शाळा या विषमता जोपासण्यात अग्रभागी आहेत. कारण शाळेपासूनच श्रीमंत व गरीब यांच्यात दरी रुंदावते व ती पुढे वाढतच जाते. परिसर शाळा व लहान मुले सांभाळणे ही पहिली गरज. दुसरी महत्त्वाची गरज म्हणजे आहाराची सोय. पालक या मुलांना 'डवा' देऊ शकणार नाहीत. तेव्हा शाळातून जेवणाची सोय हवी.

स्त्री- शिक्षिका अत्यावश्यक

मुलींना शिक्षण द्यायचे तर या दोन प्रमुख गरजा आहेत. त्याखेरीज आणखी गरज म्हणजे शाळेत एक तरी स्त्री-शिक्षिका हवीच. कारण मुलींना आपल्या घरगुती अडचणी बोलून दाखवता आल्या पाहिजेत. टोलेजंग माध्यमिक शाळांवर खर्च करण्यापेक्षा वर दिलेल्या किमान सोयी असलेली एक प्राथमिक शाळा दर हजार मुलांमागे उपलब्ध करून देणे अधिक महत्त्वाचे आहे. किंबहुना ज्या नावाजलेल्या खाजगी शाळा आज आहेत त्यांनी अशा तन्हेचे परिसर शिक्षण देणारी प्राथमिक विद्यालये सुरू करावी यासाठी त्यांना अनुदान देण्यास हरकत नाही. ज्या संस्था फक्त उच्चवर्गीय श्रीमंतांनाच सांभाळतात त्या बंद झाल्या तरी चालेल अशा मताची मी तरी आहे. कारण अशा शाळांतली मुले पुढे विषमतेचे दुष्टचक्र चालू ठेवायला स्वतःच्या अधिकारासनांच्या मोठे झाल्यावर वापरत तरी राहतात त्यांचा दृष्टिकोनात विषमता वर्ग असतो त्यामधून सर्व मुलींनी आपल्या क्षमतेनुसार शिकले पाहिजे तरच आपण एकविसाव्या शतकातीला न्याय देऊ असे मला सार्थ वाटते.

   ----जय हिंद---!

डॉ अजितकुमार पाटील,कोल्हापूर
 ( पीएच डी मराठी )

Sunday, 3 September 2023

सार्वजनिक गणेशोत्सव हा आरोग्योत्सव म्हणून साजरा करा : सपोनि पंकज गिरी


हेरले / प्रतिनिधी 

 गणेशोत्सवामध्ये सामाजिक उपक्रमासह रक्तदान सारख्या शिबिरांचे आयोजन करून एखाद्या व्यक्तीचा जिव वाचवून पुण्याईचे काम करावे व गणेशोत्सव आरोग्यत्सव म्हणून साजरा करावा असे मत शिरोली पोलिस ठाण्याचे सपोनि पंकज गिरी यांनी व्यक्त केले ते मौजे वडगांव (ता. हातकणंगले) येथे ग्रामपंचायत कार्यालयात सार्वजनिक गणेशोत्सव तरुण मंडळाच्या बैठकी प्रसंगी बोलत होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच सुनिल खारेपाटणे होते.
             ते पुढे म्हणाले की, इंग्रजांच्या जुलमी अन्याया विरुद्ध लढण्यासाठी भारतीय तरुणांमध्ये शक्ती निर्माण झाली पाहिजे व देशहितासाठी भारतीय तरुणांनी एकत्रीत यावे या दुरदृष्टीने लोकमान्य टिळकांनी शिवजयंती व सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांनी स्त्रीशिक्षणाचा पाया रोवला आशा विषयावर जिवंत देखावे तरुण मंडळांनी करून समाजापुढे आदर्श निर्माण करावा असे मत व्यक्त केले .
             यावेळी तंटामुक्त अध्यक्ष मधुकर आकिवाटे , ग्रा. पं. सदस्य रघूनाथ गोरड, स्वप्नील चौगुले, नितिन घोरपडे, सतिश वाकरेकर, जयवंत चौगुले, अमोल झांबरे , महादेव शिदे, महादेव चौगुले, गणेश मोरे, गोपनिय विभागाचे निलेश कांबळे, अभिषेक गायकवाड, यांच्यासह तरुण मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक ग्रा.पं. सदस्य सुरेश कांबरे यांनी केले .  आभार माजी. ग्रा.पं. सदस्य अविनाश पाटील यांनी मानले.

फोटो 
सार्वजनिक गणेशोत्सव निमित तरुण मंडळांना मार्गदर्शन करतांना सपोनि पंकज गिरी व ग्रा पं.. पदाधिकारी