हेरले /प्रतिनिधी
मौजे वडगाव ( ता. हातकणंगले)सत्ताधारी जय शिवराय ग्रामविकास आघाडी कडून स्वप्नील चौगुले यांची मौजे वडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली . यापूर्वीचे उपसरपंच रघूनाथ गोरड यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते . आघाडीच्या ठरलेल्या रोटेशन पद्धतीनुसार चौगुले यांना संधी मिळाली . स्वप्नील चौगुले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सरपंच कस्तुरी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हि बिनविरोध निवड करण्यात आली . यासाठी जयशिवराय ग्रामविकास आघाडीच्या नेतेमंडळीनी प्रयत्न केले. यावेळी माजी उपसरपंच सुनिल खारेपाटणे , सुरेश कांबरे , रघुनाथ गोरड, ग्रा प . सदस्य नितिन घोरपडे ,सविता सावंत , सुनिता मोरे, सुवर्णा सुतार , दिपाली तराळ, मधुमती चौगुले, मिनाक्षी आकिवाटे , ग्रामपंचायत अधिकारी भारती ढेंगे - पाटील, यांच्यासह जय शिवराय ग्रामविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी , व ग्रामस्थ उपस्थित होते.