. हेरले/ प्रतिनिधी
दि. २७/३/१७
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस आणि गाईडस राज्य संस्थेच्या सहाय्यक राज्य आयुक्त (स्काऊट) ,कोल्हापूर विभाग या पदावर शिक्षण उपसंचालक एम.के. गोंधळी यांची निवड झाली आहे.त्यांना राज्य मुख्य आयुक्त भा.ई.नगराळे यांनी नुकतेच निवडीचे पत्र दिले आहे.
शिक्षण उपसंचालक एम. के.गोंधळी यांनी कोल्हापूर विभागामध्ये शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय कार्य केलेले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची या पदावरती निवड करण्यात आली आहे. सहाय्यक राज्य आयुक्त हे पद राज्यसंस्थेच्या कामकाजातील अत्यंत महत्वाचे पद असून कोल्हापूर विभागातील स्काऊटस आणि गाईडस या चळवळीचा गुणात्मक तसेच संख्यात्मक विकास होण्यास शिक्षण उपसंचासक एम.के. गोंधळी आपल्या प्रदीर्ध अनुभवाच्या जोरावर आणि जिद्द व प्रामाणिक कामाची हातोटी यातून ही चळवळ पूढे नेतील.
यावेळी दैनिकांशी बोलताना शिक्षण उपसंचालक एम.के. गोंधळी म्हणाले, स्काऊटस आणि गाईडस ही जागतिक चळवळ आहे.या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात मुल्यसंवर्धनाचं मोठ काम देशातील व राज्यातील शाळांमध्ये सुरू आहे.त्यास अधिक गती देवून गुणात्मक व संख्यात्मक प्रगती करण्यासाठी मी कटीबध्द आहे.या पदापूळे माझी जबाबदारी अधिक वाढली आहे.त्यासाठी मी क्रियाशील आहे.