Sunday, 26 March 2017

mh9 NEWS

एड्स रोग प्रतिबंधातून शून्यावर आणण्यासाठी जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक पथकाचे विविध माध्यमातून औदयोगिक वसाहतीत सुरु.



हेरले/प्रतिनिधी दि.२६/३/१७                                                   
                                    राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था,महाराष्ट्र एड्स नियंत्रण सोसायटी,अशासकीय सामाजिक संस्था,जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध पथक यांच्या माध्यमातून एच आय व्ही/ एड्स जनजागृती साठी पथनाट्य, माहिती ,शिक्षण, संवाद,कंडोम प्रात्यक्षिक,कंडोम सोशल मार्केटिंग, इव्हेंट्स,पिअर लीडर,आरोग्यमित्र,सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून कागल पंचतारांकित व गोकुळ शिरगाव एमआयडीसी परिसरातील  युवा ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने  एच. आय. व्ही शून्यावर आणण्यासाठी प्रकल्प स्तरावर राबवत असलेल्या कार्यक्रमामुळे यश येत असलेतरी  स्थंलातरीत कामगार लक्षगट हस्तक्षेप प्रकल्प अंतर्गत सुरु असलेल्या कार्यक्रमाकडे उद्योग, व्यापार, औद्योगिक वसाहतीतील  मायग्रंट्स कामगार ,कंपनी मालक ,ठेकेदार,मुक्कादम यांनी कानाडोळा केला आहे तर  मनमानी कारभारामुळे अनेक कामगार गुप्तरोग,एच आय व्ही,एड्स,लेंगिक समस्या या विषयी कंपनीत जनजागृतीच्या उपक्रमांना एंट्री न मिळाल्याने अनभिदन्य आहेत. याची माहिती कंपनीतील कामगारांना आरोग्य शिबीरातून मिळावी याकरिता परवानगीची गरज निर्माण झाली आहे.
                                 एकीकडे शून्य गाढण्याची चढाओढ सुरु असताना एच .आय .व्ही संसर्गित लोकांची संख्या वाढत आहे.काही लुप्त घटक यामध्ये जोखमीचा बनला आहे.तृतीय पंथी,देहविक्रय स्त्रिया,
एमएसएम,डीडी, कोती, पणती,या सारख्या घटकामुळे औद्योगिक वसाहतीतील स्थंलातरीत कामगार,ट्रक चालक,वेठबिगार,हॉटेल कामगार या समस्येच्या आहारी जाऊन धोका पतकरत आहेत.दारू,व्यसन,गांज्या,सिगरेट या चैनीसारख्या व्यसनामुळे सेक्स सारख्या प्रकाराकडे आकर्षित होऊन  एचआयव्ही व गुप्तरोगाच्या जाळ्यात अडकले जात आहेत.
एम्पलायर लीड मॉडेल प्रकल्प कंपनी त राबविल्यास याची सर्व कल्पना कामगारांना होईल आणि ते या आजारापासून वाचू शकतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे
एकीकडे राज्य सरकार व केंद्र सरकार सी एस आर या महत्वकांक्षी 15 टक्के अनुदानातून सामाजिक बांधिलकी उपक्रम राबवण्याचा हट्ट करत असताना मोठमोठ्या कंपनीमध्ये मात्र कामगारांसाठी कोणताच कार्यक्रम राबवत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे
विटभट्टी,हॉटेल,माथाडी,मजूर,हमाल गंवडी ,बांधकाम,सूत गिरणी,गारमेंट्स,ट्रक डायव्हर,किंनर,फेरीवाले हे कामगार अनेक आजारांना बळी पडत आहेत तर कमी शिक्षण आणि कोणतीही माहिती मिळत नसल्याने रोजदारीवर काम करणारे हे घटक मालकी हक्काच्या जाचामध्ये अडकून आरोग्य जनजागृतीपासून अलिप्त राहत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मोठं मोठ्या कंपनीमध्ये अनेक कामगार काम करत आहेत एका एका कंपनी मध्ये एक हजार ते पंधराशे पर्यंत कामगार कामाला आहेत तरीही कंपनी व्यवस्थापन एनजीओ मार्फत सुरु असलेल्या स्थं ला त रीत कामगार लक्षगट हस्तक्षेप प्रकल्पाच्या कार्यक्रमांना कंपनी मध्ये एंट्रीही देत नाहीत त्यामुळे हे कामगार माहितीपासून दूर जात असल्याने जास्त धोका,कमी धोका,मध्यम धोका या वर्गवारीत अडकून पडले असून सुट्टीच्या दिवशी ते सेक्सुयल ऍक्टिव्हिटीकडे प्रवाहित होत असल्याने एच आय व्ही एड्स व गुप्तरोग याचा धोका वाढत चालला असून याची वेळीच माहिती त्याच्या पर्यंत पोहचली नाहीतर एच आय व्ही च्या विळख्यात कामगार सापडण्याची चिंता व्यक्त केली जात आहे

                   ###  कोल्हापूर जिल्ह्यात एनजीओ च्या माध्यमातून जनजागृती होत आहे.जिल्हाधिकारी डॉ अमित सैनी यांनी तसे कंपनी मालकांना हा उपक्रम राबवण्यासाठी पत्र दिले आहे तरीही काही कंपनीत एंट्री मिळत नसेल तर कंपनी व्यवस्थापनाने कामगारांचे आरोग्य धोक्यात घालण्याऐवजी मोफत उपक्रमांना प्राधान्य देण्याची गरज आहे
       ------रमेश वर्धन, विभागीय कार्यक्रम अधिकारी एम्सँक्स,मुबई


               ### स्थं ला त रीत कामगार लक्ष गट हस्तक्षेप या प्रकल्पाच्या माध्यमातून एच आय व्ही,गुप्तरोग, एड्स,क्षयरोग या विषयी मोफत माहिती मिळते,तर एच आय व्ही तपासणी रिपोर्ट पॉझिटीव्ह आला तर शासकीय दवाखान्यात मोफत औषधे मिळतात तर अनेक योजना ही सुरु आहेत त्यामुळे हा उपक्रम कंपनीत राबवण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे.
-----मोहन सातपुते
प्रकल्प अधिकारी युवा भरारी

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :