आजच्या धावपळीच्या युगात फास्टफूड या नव्या खाद्य संस्कृतीची भुरळ सर्वांनाच पडली आहे. त्यामुळे कोल्हापुरात ठिकठिकाणच्या खाद्यपदार्थांच्या गाडय़ांवर आपल्याला रोजच गर्दी पहायला मिळते व त्यात चायनीज पदार्थांचे वेड तरुणाईत खूपच लागले आहे. पण जिभेचे चोचले पुरवणार्या या चायनीज पदार्थ आरोग्यास किती घातक आहेत, याची जराही कल्पना आजच्या तरुणाईला नाही. पण कोल्हापूरा तील चायनीज हॉटेल व रस्त्याच्या कडेला लागणार्या चिकन 65 व चायनीज गाडय़ांवर बनवल्या जाणार्या पदार्थांमध्ये `अजिनोमोटो’ नामक पावडर वापरली जात असल्याची बाब आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे.
चिकन 65 व चायनीज पदार्थांमध्ये वापरण्यात येणारे कृत्रिम रासायनिक रंग, सॉस व नूडल्स आरोग्यास घातक असल्याचे तज्ञ डॉक्टरांकडून वारंवार सांगितले जाते.अन्नपदार्थांमधील भेसळीच्या वाढत चाललेल्या प्रकरणांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न हा दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालला आहे. कारण आज चिकन 65 व चायनीज पदार्थांचे स्टॉलवाले स्वतःचे खिसे भरण्यासाठी ग्राहकांच्या जीवाशी खेळ करत आहे.
रस्त्यावर अतिक्रमण करून राजरोसपणे धंदा करणाऱ्या अश्या चिकन 65 व चायनीज पदार्थांचे स्टॉलवर महानगर पालिका अतिक्रमण विभागाने कधीही कारवाई केल्याचे ऐकिवात नाही ना आरोग्य विभागाला याची फिकीर आहे
अजिनोमोटो म्हणजेच एम एस जी या पदार्थावर जरी खाद्यपदार्थात वापरास बंदी असली तरी हा चव येण्यासाठी सर्रास वापरला जातो याचे कॅन्सर व मेंदूवर घातक परिणाम होतात , आरोग्य विभागाला जरी याची फिकर नसली तरी सुजाण नागरिकांनीच जागरूक होऊन आपण होऊन या पदार्थांवर बहिष्कार घातला पाहिजे , यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करणे महत्वाचे ठरेल .