सिद्धनेर्ली(वार्ताहर)बामणी(ता.कागल)येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नेहमीच बंद अवस्थेत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. ग्रामपंचायतीच्या हाकेच्या अंतरावर असणार्या या आरोग्य केंद्राकडे ग्रामपंचायतिचे दुर्लक्ष आहे. त्या मुळे येथील कर्माचारी व अधिकारी यांचा मनमानी कारभार करीत आहेत. त्या मुळे बामणी येथील नागरिकाना सिद्धनेर्ली येथील आरोग्य केंद्राचा आधार घ्यावा लागत आहे. बामणी येथील आरोग्य केंद्र हे ग्रामपंचायतीच्या समोरच हाकेच्या अंतरावर असताना देखील ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्या मनमानी कारभाराला खत पाणी मिळत आहे. आरोग्य केंद्रात येणार्या जाणार्या लोकाना कोणत्याही प्रकारची नोंद नसल्यामुळे नागरिकांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.काही दिवसापूर्वी असेच सिद्धनेर्ली येथील आरोग्य केंद्रावर कागल पंचायत समितीचे उप सभापती रमेश तोडकर यांनी अचानक भेट दिल्यावर तेथील हि हजेरी पत्रकावर सह्या करून कर्मचारी व अधिकारी जाग्यावर नसान्याचा प्रकार समोर आला होता. हा प्रकार ताजा असतानाच बामणी येथील आरोग्य केंद्र हि कायम बंद अवस्थेत असल्याने या आरोग्य केंद्रावर कोणाचा वचक आहे कि नाही असा प्रश्न आता पुढे येत आहे. खालावत चाललेल्या या आरोग्य केंद्राच्या सुविधेमुळे सामान्य नागरिकांचा मात्र आता विस्वास उठत जात आहे असून याचा नाहक त्रास मात्र सर्व सामान्य जनतेला सोसावा लागत आहे. बामणी येथील आरोग्य केंद्रावर कदि कर्मचारी व अधिकारी असनार याचा फलक लावण्याची मागणी आता जनतेतून होत आहे. त्या मुळे सर्व सामान्यांना कळेल आणि त्यांच्या वेळेची बचत होईल.
फोटो – बामणी येथील कार्यालयीन वेळेतच आरोग्य केंद्र टाळे ठोकून बंद अवस्थेत असताना.