आयुर्वेदाप्रमाणे ज्या व्यक्तीचे कफ आणि वात हे दोष बिघडलेले असतात,त्यांना सोरायसिस या विकाराचा त्रास निर्माण होऊ शकतो. सोरायसिस याला मराठीत कंड रोगही म्हणले जाते तसेच याला सर्व त्वचा रोगांचा बादशहा म्हणले जाते .सोरायसिसचा आजार जडलेली व्यक्ती ही सार्वजनिक जीवनाला मुकते. घरचेही या व्यक्तीपासून दूर पळतात.हा रोग संसर्गजन्य नसला तरी वेळीच योग्य ते उपचार करून घेणं गरजेचं असतं.या आजाराचा उपचार आयुर्वेदात आहे ,हा आजार जसा औषधोपचाराने बरा होऊ शकतो तसाच योग्य आहार व पथ्य पाळल्याने आटोक्यातही येऊ शकतो .
सोरायसिस म्हणजे काय ?
चा लाल व जाडी होते. जाड झालेल्या त्वचेवर अर्धवट सुटलेले पापुद्रे असल्याने त्वचेचं स्वरूप माशांच्या खवल्यांसारखं होतं. म्हणून त्या पापुद्रयांना शकल (खवले) असं म्हणतात.
पथ्थ्य ----
आहारात जास्त खारट (लोणचं, पापड, चिवडा, वेफर्स, फरसाण, खारेदाणे, खारवलेला सुकामेवा इ.), आंबट (चिंच, टॉमेटो, लिंबू, आमचूर, कैरी, दही, आंबट ताक, आंबट पेय, आंबवलेले पदार्थ इ.), अतिशय गोड चवीचे पदार्थ असणं. खाण्याचा सोडा किंवा इतर क्षार.
शिळे पदार्थ खाणं.
चहात बिस्किटं किंवा पोळी-चपाती बुडवून खाणं.
दूध आणि फळं एकत्र करून केलेले पदार्थ.
दूध आणि माशांचे पदार्थ एकाच वेळी खाणं.
वरील सर्व पदार्थ टाळणे हे सोरायसिस बरा होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे .
या विकारात त्वचा कोरडी पडते. त्यामुळे तेल लावून त्वचा तेलकट ठेवणं महत्त्वाचं असतं. कफ आणि वात दोष बिघडून हा विकार झाला असल्यास कोवळ्या उन्हात सकाळी बसल्याने हा विकार बरा होण्यास मदत होते.
सोरायसिसच्या आजारात तेलाचं मालिश अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण तेलामुळे कफ तर वाढत नाही. पुन्हा वाताचं शमन होतं. शिवाय त्वचेवर तेलाचा थर आल्यामुळे तिला भेगा पडत नाही. पापुद्रे सहज सुटतात. तेलामुळे त्वचा नरम पडल्यामुळे खाज येत नाही. खोबरेल तेलाचा वापर केल्यास चालते.
‘कॉर्टिकोस्टेरॉइड’सारख्या औषधाने या आजारात गुण येतो. परंतु यांचा उपयोग जाणकार डॉक्टरांच्या सल्ल्याने केला पाहिजे. कारण या औषधाचा चुकीचा किंवा अतिप्रमाणात वापर धोकादायक असतो.
यापेक्षा आयुर्वेदिक औषधोपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केल्यास अधिक उत्तम .