अवधूत मुसळे
हेरले / प्रतिनिधी दि. २/१/१९
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशन (सलंग्न मराठी पत्रकार परीषद) च्या वतीने शिरोळ तालुक्यातील "खिद्रापूर" येथे रविवार १३ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या पत्रकार दिन कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्रीमंत शाहू छत्रपती महाराज भूषवणार आहेत. प्रमुख पाहुणे पद्ममश्री डॉ. शिवराम भोजे आहेत. प्रमुख उपस्थिती मराठी पत्रकार परीषद विभागीय सचिव समीर देशपांडे, जिल्हा अध्यक्ष चारूदत्त जोशी, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे, उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे.
या कार्यक्रमाचे संयोजन कौन्सिल मेंबर दगडू माने, शिरोळ तालुका अध्यक्ष संतोष तारळे , कार्याध्यक्ष संतोष बामणे , विनोद पाटील यांनी केले आहे. प्रथम सत्रात सकाळी ११ वाजता सभासद नोंदणी, खिद्रापूर पर्यटन स्थळास भेट व स्नेहभोजन, द्वितीय सत्र १.३० वा."जागल्या" स्मरणिकेचे प्रकाशन, जिल्हा व तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वितरण मान्यवरांचे हस्ते व त्यांचे मौलीक मार्गदर्शन आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत .
जिल्हा व तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राप्त पत्रकार खालीलप्रमाणे आहेत.
जिल्हा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार -नंदकुमार राजाराम कांबळे (कागल ),महालिंग दत्तात्रय पाटील ( जि. बेळगांव) जिल्हा उत्कृष्ट सेवा पुरस्कार - प्रा.रवींद्र बाबासो पाटील (कबनूर)
तालुका उत्कृष्ट पत्रकार - संपत रामाणा पाटील (चंदगड ) मुकुंद चंद्रकांत पवार (शाहुवाडी)इकबाल महंमदहनिफ रेठरेकर --(गगनबावडा) डॉ. निवास महादेव वरपे (करवीर), प्रकाश आनंदराव खतकर (भुदरगड)मधुकर शिवाजी किरुळकर (राधानगरी)विवेक यशवंत दिंडे (हातकणंगले)विनायक हिंदुराव पाटील (गडहिंग्लज)धनाजी सदाशिव गुरव (पन्हाळा) संतोष सुभाष बामणे (शिरोळ ) समीर जीवनराव कटके (कागल )रमेश श्रीपती चव्हाण (आजरा)अनिल राजू तोडकर (हातकणंगले)
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशच्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमास जिल्हयातील सर्व पत्रकारांनी उपस्थित राहावे. असे आवाहन संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.