हेरले / प्रतिनिधी दि. १९/२/१९
अवधूत मुसळे
विकास कामापासून वंचित असणाऱ्या मौजे वडगांवास ११ कोटी रूपयांचा विकास निधी मंजूर करून विकास कामातून व सार्वजनिक सोयी सुविधांची सेवा पुरवून गावाचा कायापालट केला आहे. या गावची शान व मान राखता येईल असे सदैव कार्य असेल असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले. त्या मौजे वडगांव (ता. हातकणंगले) येथील भव्य नागरी सत्कार व विविध विकास कामांचा शुभारंभ आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या. प्रमुख उपस्थिती पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत यांची होती. प्रथमतः पुलवामा येथील भ्याड हल्यातील शहिद जवानांना श्रद्धाजंली वाहिली.
पुढे त्या म्हणाल्या मौजे वडगांवच्या विकास कामासाठी भाजपा तालुका उपाध्यक्ष अविनाश पाटील ,स्वप्नील चौगुले, सुनिल खारेपाटणे यांचा सातत्याने पाठपुरावा असल्याने हे शक्य झाले आहे. माझ्या जिपच्या निवडणूकीत विजयी होण्यासाठी या गावचा सिंहाचा वाटा असल्याने कृतज्ञतापूर्वक शक्य तितकी विकास कामे केली जातील. राज्य शासनाने रस्ते, पाणी, सार्वजनिक सोयीसुविधां नागरिकांना देण्यासाठी विकास निधी भरभरून दिला असल्याने दोन वर्षात ११ कोटीची विकासकामे करू शकलो आहे.
महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून विविध व्यवसाय व उदयोगांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करण्यासाठी तत्पर आहे. प्लास्टिक मुक्त पर्यावरणासाठी कापडी पिशव्यांचा वापर वाढला आहे. म्हणून विविध कापडी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण आयोजित करणार आहे. त्याचा लाभ महिला वर्गाने घेऊन व्यवसाय सुरू करावेत असे आवाहन केले.
प्रथमतः जि.प. अध्यक्षा शौमिका महाडिकांच्या हस्ते विविध ठिकाणी विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांचा नागरी सत्कार ग्रा.पं. सदस्या माधुरी सावंत, सरिता यादव, मायावती तराळ, सुनिता मगदुम यांच्या हस्ते मानपत्र, शाल श्रीफळ, बुके देऊन झाला. त्यांचा गावातील विविध संस्थांच्या वतीने पदाधिकाऱ्यांने सत्कार केला.पं.स. सदस्य उत्तम सावंत यांचा सत्त्कार रावसाहेब चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला.
गायरान बचाव कृती समितीचे समन्वयक माजी उपसरपंच शिवसेना शहरप्रमुख सुरेश कांबरे यांचा सत्कार अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या हस्ते झाला.यावेळी अवधूत मुसळे, अवीनाश पाटील,सतीश चौगुले, प्रदीप लोहार, श्रीकांत सावंत यांनी मनोगते व्यक्त केली.
प्रस्तावित रिंगरोड नागांव ते मौजे वडगांव फाटा रस्ता ( ५ कोटी ४० लाख रू.), सार्वजनिक बांधकाम विभागामार्फते मौजे वडगांव ते पेठ वडगांव रस्ता ( 3 कोटी रू. ) राष्ट्रीय पेयजल योजना (९१.९९ लाख रू.), तांडा वस्ती योजनेअंतर्गत धनगर गल्ली येथे रस्ता व गटर्स ( ७ लाख रु.),२५ /१५ फंडातून नरसिंह मंदिर सभागृह ( ५ लाख रू.) नाविण्यपुर्ण योजनेतून दलित वस्तीमध्ये पाणी शुध्दीकरण उपकरण ( ३ लाख ५ हजार रू.), नविन वसाहत व चर्मकार समाज डांबरीकरण ( १०लाख रू.) गावातील अंतर्गत पाईपलाईन बदलणे ( ७ लाख) सार्वजनिक स्मशानभूमी संरक्षक भिंत (५ लाख) आदी विकास कामे सुरू आहेत.
यावेळी ग्रामसेवक व्ही.व्ही. कांबळे, अॅड. विजय चौगुले, अवधूत मुसळे, धोंडिबा चौगुले, बाळासो चौगुले, माजी सरपंच यासीन मुल्ला, संजय सावंत, अविनाश पाटील, सुनिल खारेपाटणे, आनंदा थोरवत आदीसह ग्रा.पं. सदस्या व मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनी उपस्थित होते.स्वागत स्वप्नील चौगुले यांनी केले.
फोटो
मौजे वडगांव मध्ये जि.प. अध्यक्षा शौमिका महाडिक यांचा नागरी सत्कार करतांना ग्रामपंचायत सदस्या व मान्यवर