सेनापती कापशी / वार्ताहर -
माऊली क्रिएशन प्रस्तुत अवधूत विलास मोहिते दिग्दर्शित घंटी या लघुपटा चे प्रथम पोस्टर चे अनावरण कार्यक्रम मांगणूर (ता - कागल ) येथे पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनाजी तोरसकर होते तर प्रमुख उपस्थितीत गारगोटी चे माजी उपसरपंच अरुण शिंदे, चित्रपट लेखक संदीप मेंगाने, ग्रामपंचायत सदस्य अजित मोहिते होते.
यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना धनाजी तोरसकर म्हणाले, ग्रामीण भागातून अशा चांगल्या समाज प्रबोधनपर विषयांच्या लघुपटांची निर्मिती होत असून मला आज दिग्दर्शक व सर्व कलाकारांचा सार्थ अभिमान वाटत आहे. यापुढेही लघुपट करत करत तीन तासाच्या चित्रपटाची निर्मिती व्हावी व काही मदत लागल्यास आम्ही तुमच्या सोबत सदैव आहोत असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी, अरुण शिंदे, अवधूत आठवले, अवधूत मोहिते यांनी मनोगते व्यक्त केली. दरम्यान गुरुप्रसाद जोशी यांनी घंटी या लघुपटाचा आशय व कथा कोणत्या विषयावर आधारित आहे याची संपुर्ण माहिती दिली.
या लघुपटाचे संपूर्ण चित्रीकरण कॅमेरामन किरण पोवार व संकलन पॅडी पाटील यांनी केले आहे.
यावेळी, कलाकार रवींद्र सुतार, बालकलाकर समर्थ आठवले, प्रिया कोळी, अवधूत आठवले, धनाजी शिरगुप्पीकर, यशवंत बुवा, प्रशांत नांदेकर, सचिन सुतार, विश्वजित दोडमनी, गुरुप्रसाद जोशी, विजय मेस्त्री, भगवान गोरे, अमर सव्वाशे, क्रांती मंडळाचे सर्व सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मंडळांचे अध्यक्ष संजय तेलवेकर यांनी केले.
फोटो - मांगणूर ता - कागल येथे घंटी लघुपटाचे पोस्टर अनावरण प्रसंगी अरुण शिंदे, धनाजी तोरसकर, अवधूत मोहिते संदीप मेंगाने व सर्व कलाकार.