एक हात मदतीचा, 100 कुटुंबाला अन्नधान्याचे किटचे वाटप.
उदगीर प्रतिनिधी गणेश मुंडे:-
सध्या मराठवाड्यात कोरोना या आजाराने बघता बघता शंभरचा आकडा पार केला. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक,मोलमजुरी, निराधार,अपंग,गोरगरीब विधवा आदी नागरिक सध्या संकटात सापडले असुन उदगीर तालुक्यातील वाढवणा (खु) येथून तरुण युवा उद्योजक ज्ञानेश्वर शंकर भांगे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
ग्रामीण भागात सध्याही आनेक मजुर,कामगार यांचे हातावरचे पोट असलेल्या कुटंबाला मदत देऊन सामाजिक दायित्व निभावत आहेत. गावातील जवळपास 100 कुटंबाला त्यांनी 5 गहू आटा,1 किलो हरभरा दाळ,1तेलपुडा,मिठपुडा,एक मिरची पावडर अशाप्रकारे अन्नधान्याच्या स्वरूपात मदत केली, त्याचबरोबर गावकऱ्यांना कोरोना सारख्या रोगापासून सुरक्षा मिळावी म्हणून मास्क ,सँनिटाईझर देऊन वैयक्तिक पातळीवर स्वच्छता राखण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच सदरील आवश्यक अन्नधान्य किट घरपोच पुरवठा केला. यावेळी सोशल डिस्टन्सींग पाळण्यात आला. तसेच गावातील सध्याच्या संकटाच्या परिस्थिती त 100 कुटुंबातील सदस्य यांना मायेचा पाठबळ म्हणून मदत दिल्याने ज्ञानेश्वर शंकरराव भांगे यांचे कौतुक होत आहे.यावेळी युवा उद्योजक ज्ञानेश्वर शंकरराव भांगे, सरपंच व्यंकट भिंगोले,पोलीस पाटील प्रमोद मद्देवाड,लखन कानवटे, परमेश्वर भांगे,कैलास वासरे, भाऊराव कानवटे, बाळासाहेब कानवटे, भंडारे गुरुजी, रमेश भांगे,राम मुसने,राम भांगे, माधव तिरकमटे,पुंडलिक मुसने,रामा कानवटे, विशाल भांगे,आदी उपस्थित होते.
1 comments:
Write commentsMusale N.R highschool teacher m.p.vidyalaya,Ahmedpur
Reply9404681267