कसबा बावडा दि. 20 एप्रिल 2020 संदिप पोवार
संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. अशा बिकट काळातही पोलीस बांधव व म.न.पा. सफाई कामगार आपले कर्तव्य एकनिष्ठपणे पार पाडत आहेत. कोल्हापूर मध्ये कसबा बावडा रोडवरील न्यू पॅलेस परिसरातील शिंदे मळा, पुंगावकर मळा, बेडेकर मळा, माळी मळा, इंगवले मळा, पाटोळे मळा, न्यू पॅलेस कॅम्प व महावीर काॅलेज चौक आणि नागरिकांच्या वतीने पोलीस बांधवांचा सत्कार करून आभार मानले तसेच म.न.पा. सफाई कामगारांना धान्य स्वरूपात मदत करण्यात आली. याचे नियोजन गणेश शिंदे, वीरधवल शिंदे, सुनिल कांबळे, यांनी केले. या प्रसंगी हेमंत बोडके, रावसाहेब पाटील, संजय मोहिते, तानाजी पाटोळे, संग्राम पाटील, महेश गाडगीळ, भरत पाटोळे, संदीप गायकवाड, राहूल भोसले, प्रशांत जाधव उपस्थित होते.