शिवकृपा फौंडेशनची सामाजिक बांधिलकी, मास्क व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप !
कसबा बावडा प्रतिनिधी
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वत्र मास्कचा तुटवडा जाणवत आहे याच पार्श्वभूमीवर मंथरा बचत गट व शिवकृपा फौंडेशन एकत्र येऊन स्वतः मास्क निर्मिती करत आहेत.
शिवकृपा फौंडेशनच्या संस्थापिका सौ.सविता भिमराव रायकर यांच्या हस्ते सेवा बजावत असणाऱ्या पोलीस, पत्रकार ,आरोग्य/सफाई कर्मचारी, बँक कर्मचारी तसेच लॉकडाउनमुळे अडकलेल्या नागरिकांना, महानगरपालिकेच्या बेघर महिला निवासस्थानी व शहरातील विविध भागांतील गरजुंना मोफत मास्क वाटप केले.
कसबा बावडा परिसरामधील हातावरील पोट असणाऱ्या गरजु कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.