चेकपोस्टवर तपासणी होणार : जिल्हाधिकार्यांचे आदेश
वाशीम - (m आरिफ पोपटे )आपल्या धोरणी निर्णयाने जिल्हयावरील कोरोनाचे संकट परतवून लावणारे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी ह्षीकेश मोडक यांनी केवळ शासकीय ओळखपत्राच्या आधारे जिल्हयाबाहेर अप-डाऊन करुन कोरोना संकटाला अनाहूतपणे आमंत्रण देणार्या अधिकारी, कर्मचार्यांवर आपली वक्रदृष्टी वळविली आहे. जिल्हयात नोकरी करणारे व जिल्हयाबाहेर राहणारे जिल्हयातील काही अधिकारी, कर्मचारी केवळ शासकीय ओळखपत्राच्या आधारे जिल्हाबंदीचा नियम मोडून ये-जा करतात. अशांना शासकीय सेवा देण्यासाठी जिल्हयातच राहणे आवश्यक असून केवळ पोलीस विभागाची परवानगी असल्यासच अशांना जिल्हयाबाहेर जाता किंवा जिल्हयात येता येईल अशा सुचना जिल्हाधिकारी श्री मोडक यांनी आज, (दि. २८ एप्रिल) दिल्या. यासोबतच जिेल्हयाबाहेर अशाप्रकारे अपडाऊन करणार्या अधिकारी कर्मचार्यांची माहिती पोलीस विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी, अशा सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या आहेत.
कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचार्यांना जिथे ते सेवा देतात त्या मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. परंतु अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी बाहेरगावी किंवा जिल्ह्याबाहेर राहून वाहनाने ये-जा करतात. त्यांच्या येण्याजाण्याच्या अनियंत्रित वेळेमुळे कार्यालयीन वेळेचा अपव्यय होत असून या अधिकार्यांच्या लेटलतिफीमुळे नागरीकांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो. शासनाचे अनेक परिपत्रक, अनेक शासन निर्णय, वरिष्ठांच्या अनेक सुचनांना केराची टोपली दाखवून अधिकारी, कर्मचार्यांच्या अपडाऊनच्या या फेर्या आतापर्यत बिनधास्तपणे सुरु होत्या. मात्र जिल्ह्यावर कोरोना संकटाचे सावट पसरताच या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आतापर्यत अनेक कठोर व चांगले नर्णय घेणारे जिल्हाधिकारी श्री मोडक यांनी जिल्ह्याबाहेरुन येणारे जाणारे अधिकारी, कर्मचारी कोरोनाचे संकट आपल्यासोबत घेवून येवू नये या दृष्टीकोनातून आज मोठा निर्णय घेतला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाशीम जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. मात्र, तरीही काही शासकीय, निमशासकीय अधिकारी शासकीय सुट्टीच्या दिवशी तसेच दररोज जिल्ह्याबाहेरून ये-जा करीत आहेत. अशा अधिकारी, कर्मचार्यांची माहिती पोलीस विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज दिल्या आहेत.
लॉकडाऊन काळात सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी जिल्ह्यातच राहणे आवश्यक आहे. तरीही काही अधिकारी, कर्मचारी कार्यालयाच्या ओळखपत्राच्या आधारे जिल्ह्याबाहेरून ये-जा करीत आहेत. यापुढे अशा अधिकारी, कर्मचार्यांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येवू नये. तसेच वाशिम जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना जिल्ह्याच्या बाहेर जावू देवू नये. ज्यांच्याकडे पोलीस विभागाची परवानगी असेल अशाच अधिकारी, कर्मचारी यांना जिल्ह्याबाहेर जाण्यास किंवा जिल्ह्यात येण्यास परवानगी द्यावी. तसेच चेकपोस्टवर तपासणीअंती जिल्ह्याबाहेरून ये-जा करीत असल्याचे आढळून आलेल्या अधिकारी, कर्मचारी यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास द्यावी, असे पोलीस प्रशासनाला कळविण्यात आले आहे.