बदनापुर वार्ताहर
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग वाढु नये या करिता विविध जनजागृतीचे उपक्रम चनेगाव ता.बदनापुर येथे राबविण्यात येत आहे. आपण गावाच,समाजाच काही देण लागतो म्हणून चनेगाव येथील तरुन सामाजिक कार्यकर्ते कोमल अशोक जायभाये यांच्या वतीने गावातील पासष्ट वर्षावरील शंभर वयोवृद्धांना घरोघरी जाऊन मोफत मास्क वाटप करुन जनजागृती करण्यात येत आहे.यात घरीच राहा सुरक्षित राहा,खोकलतांना किंवा शिंकतांना मास्क ,रुमाल वापरा,शासनाच्या आदेशाचे पालन करा,वेळोवेळी हात स्वच्छ धुवा,अनावश्यक घराबाहेर पडू नका,गर्दी करु नका अशाप्रकारे सोशल डिस्टन्स ठेवून व मास्क वापरुन गावात घरोघरी जाऊन जागृती करण्यात आली.
कोरोना विषाणू संसर्गाचा जास्त धोका साठ पासष्ट वर्षे वयोगटातील व्यक्तींना असल्यामुळे चनेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते कोमल अशोक जायभाये यांच्या वतीने शंभर नागरीकांना मोफत मास्क वाटप करुन जनजागृती करण्यासाठी तेजस जनविकास संस्थेचे अध्यक्ष शिवाजी तायडे,सरपंच उद्धव जायभाये,धनराज घुगे,केशव कोल्हे,मंता तायडे,गजानन जायभाये यांनी विशेष प्रयत्न केले.