कोल्हापूरात लॉकडाऊन संपल्यासारखे विना मास्क खरेदीसाठी गर्दी करणाऱ्या बेजबाबदार नागरिकांनो हे वाचाच. या महिन्यात सोलापुरात 12 तारखेपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता आणि 13 ला पहिला बळी गेला तर आजअखेर एकूण रुग्ण संख्या 39 झाली आहे. तेथे कर्फ्यू संचार बंदीची मुदत 27 एप्रिल पर्यंत वाढवली आहे
सोलापूर शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आज 39 झाली आहे. काल ही संख्या 33 होती, यात आज दिवसभरात 6 ची भर पडली आहे .
सोलापूर शहर हद्दीमधील सध्याची सुरु असलेली संपूर्ण संचारबंदी आता 27 एप्रिल च्या रात्री 12 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. सोलापूर शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांत कोणालाही घरा बाहेर पडता येणार नाही. येथील नागरिकांसाठी सध्या सुरू असलेल्या पद्धतीने सर्व अत्यावश्यक सेवा घरपोच उपलब्ध करून देण्यात येत आहेत .
संचार बंदीच्या काळात रोज सकाळी 6 ते 9 या वेळेत दूध वाटप व विक्री करण्यास मुभा आहे.
संचार बंदी चे नियम कोणीही मोडू नयेत, पोलिसांची गस्त सुरू आहे. याचबरोबर ड्रोन कॅमेरानेही गल्लीबोळा वर नजर ठेवण्यात येत आहे. जे कोणी सापडतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिला आहे. म्हणून एकच सांगणे आहे कोल्हापूरात परिस्थिती अजूनही आटोक्यात आहे. आपण बेजबाबदारपणे वागून कोरोना संकटात वाढ करू नये. घरीच रहा सुरक्षित रहा आणि दुसर्यानाही सुरक्षित ठेवा.