येरला :- गावालगत असलेल्या गोठ्याने अचानक पेट घेतल्याने गोठ्यात असलेले शेती अवजारे व गुराचा चारा कडबा, कूटार, व तनिस जळुन खाक झाले. ही घट्ना हिंगणघाट तालुक्यातील येरला येथे घडली.
ता.23 ला दुपारी 12 वाजता गावालगत असलेल्या बालाजी माधो ठावरी यांच्या गोठ्याला आग लागली हे कळताच गावकर्यंच्या मदतीने ही आग विझवण्यात आली.
आगिमध्ये गोठ्यात असलेले नागर,वखर, कडबा,कूटार, तनिस जळाल्यने खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गोठ्याला लागूनच घरे होती पण गावकर्याच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.
घटनास्थळी पट्वारी श्री बिमरुट,श्री राऊत यांनी पंचनामा करण्यात केला.