राजापूर येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा अनेक वर्षे दुरूस्ती च्या प्रतिक्षेत होता.या बंधाऱ्यातुन महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात होते.यामुळे उन्हाळ्यामध्ये पाण्याचा तुटवडा शिरोळ तालुक्यातील सुमारे ४0 पेक्षा अधिक गावाला जाणवत होता. याची दखल घेत तत्कालीन आमदार उल्हासदादा पाटील यांनी या बंधाऱ्याच्या दुरुस्ती साठी शासन दरबारी पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणामध्ये निधी खेचून आणला.
माजी आमदार उल्हास दादा पाटील यांच्या प्रयत्नातून राजापूर बंधाऱ्याच्या डागडुजीसाठी दोन टप्प्यात साडेसात कोटींचा निधी उपलब्ध झाला होता. या कामी माजी मंत्री गिरीश महाजन विजय बापू शिवतारे यांचे सहकार्य लाभले होते . या बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे , शिरोळ तालुक्यातील 40 गावांसह कुरुंदवाड , शिरोळ, इचलकरंजी नगरपालिकेच्या सुमारे चाळीस लाख लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि साडेसोळा हजार हेक्टर शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे,गेल्यावर्षी उन्हाळ्यात लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता. यावेळी बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यामुळे पाण्याची पातळी साडेचौदा फुटावर आहे.