मूळचा अमरावती येथील रहिवासी
कामरगाव येथील 200 कुटूंब व 3 शिक्षक व 1 महिला व 1 पुरुषांच्या संपर्कात
कारंजा लाड प्रतनिधि m आरिफ पोपटे दि.26 कारंजा तालुक्यातील ग्राम कामरगाव येथील जिल्हा परिषद उर्दु शाळेतील मुख्याध्यापक यांनी 2 एप्रिल 2020 रोजी शालेय पोषण आहार अंतर्गत तांदूळ वाटप करण्यासाठी आला होता. त्या वेळी त्या मुख्याध्यापकाणे 200 पालकाना तांदूळ वाटपाचे केले. दरम्यान तो 3 शिक्षक व एक खिचडी शिजवणारी महिला व एका व्यक्तीच्या संपर्कात आल्याची माहिती आज प्रशासनाला प्राप्त झाली. त्या मुख्याध्यापकला मागील आठ दिवसासापूर्वी त्रास झाल्यानंतर त्याला दि.25 एप्रिल रोजी अमरावती येथील सरकारी रुग्णालयात तपासणी करिता दाखल केले असता त्याला कोरोना झाल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे तो कामरगाव येथील ज्या लोकांच्या संपर्कात आला. त्या लोकांची आरोग्य व महसूल विभागाने तात्काळ दखल घेऊन दि.26 एप्रिल रोजी गावातील 200 कुटूंबातील सदस्यांची प्राथमिक तपासणी केली. तपासणी दरम्यान कोणतेही लक्षण आढळून आले नाही. मात्र जर शिक्षक थेट संपर्कात आले. त्या 3 शिक्षकांना व 1 महिलेला तसेच 1 व्यक्तीला वाशिम येथे पाठविण्यात आल्याची असल्याची माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली.
सविस्तर असे की अमरावती येथिल रहिवासी असलेला मुख्याध्यापक जिल्हा परिषद उर्दू शाळा कामरगाव येथे कार्यरत आहे. शासनाच्या सुचने प्रमाणे शाळेतील शालेय पोषण आहार वाटपासाठी तो 2 एप्रिल 2020 रोजी शाळेत आला असता त्यांनी शाळेतीळ तांदूळ काही विद्यार्थी व पालकाणा जवळपास 200 लाभार्थाना दिला. त्यामुळे तो त्याच्या संपर्कात आला. तसेच 2 शिक्षिका कामरगाव च्या व 1 कारंजातील शिक्षक व 1 महिला खिचडी शिजवणारी व ज्या व्यक्तीने अमरावती ला पोचून दिले दिले असे एकूण 5 व्यक्तीच्या तो थेट संपर्कात आल्याने आज महसुल व आरोग्य यंत्रणेने 200 कुटूंबाच्या प्राथमिक सर्वेक्षण केले. मात्र कोणालाही तश्या प्रकारचा त्रास दिसून आला नाही. मात्र 5 व्यक्ती जे सर्पकात आले त्यांना तपासणी करिता दि.26 राेजी वाशिम येथे पाठवण्यात आल्या ची माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली.
त्या 5 व्यक्तीचा अहवाल काय येतो या कडे जिल्हावासीयचे लक्ष लागले आहे.