Sunday, 5 July 2020

mh9 NEWS

आंतरजिल्हा बदल्या लवकरच - - शिक्षक संघाच्या महिला आघाडीस ना.हसन मुश्रीफ यांची ग्वाही

कोल्हापूर प्रतिनिधी - 
 परजिल्ह्यात कार्यरत असणार्‍या शिक्षकांना आपापल्या जिल्ह्यात जाता यावे यासाठी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया लवकरात लवकर राबिवण्याचे निर्देश संबधित अधिकार्यांना देण्यात येतील अशी ग्वाही राज्याचे ग्रामविकास मंत्री मा.ना.हसन मुश्रीफ साहेब यांनी शिक्षक संघाच्या कोल्हापूर महिला आघाडीस दिली असल्याची माहिती महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा लक्ष्मी पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
         तसेच गेल्या दोन वर्षात विस्थापित होऊन गैरसोयीत असलेल्या महिला शिक्षिकांची सोयीच्या शाळेत बदली होणेबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असेही आश्वासन ना.मुश्रीफ साहेब यांनी शिष्टमंळास दिले.
      आज गुरू पौर्णिमेच्या दिवशी शिक्षक बँक संचालिका तथा शिक्षक संघ महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ लक्ष्मी पाटील यांच्या नेतृत्वाखालील महिला शिक्षिकांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात बदलीसाठी असलेली रिक्त पदांची 10% ची अट रद्द करून ज्या जिल्ह्यात एखाद्या प्रवर्गाच्या जागा उपलब्ध नसतील तर त्यांना शुन्य बिंदूवर तात्पुरते विनाअट सामवून घ्यावे व भविष्यात सेवानिवृत्ती व पदोन्नती मुळे जसजसे बिंदू उपलब्ध होतील तसतसे त्यांना मुळ बिंदूवर सामावून घ्यावे. गेल्या दोन वर्षात झालेल्या ऑन लाईन बदली प्रक्रियेत विस्थापीत झालेल्या गैरसोयीत असलेल्या शिक्षकांना स्वतालुक्यात पदस्थापना देण्यात यावी. यामध्ये प्राधान्यांने महिलांची सोय करावी. बदलीमुळे रिक्त होणार्या जागा भरतीद्वारे भरण्यात याव्यात. आदी मागण्या करण्यात आल्या.
      आज भेटलेल्या शिष्टमंडळात महिला आघाडी जिल्हध्यक्षा सौ लक्ष्मी पाटील यांच्यासह माधुरी यादव , रोहिणी लोकरे , नूतन सकट , वैशाली कोंडेकर , निता पोतदार , सविता येरूडकर , मनीषा चौगुले, मीना चव्हाण , जयश्री माने , सी जे मोरे, प्रेमा डवरी , पल्लवी परिट , मिनाक्षी पोटले , योगिता कुंभार , शारदा पाटील , संपदा चावरेकर , मैथिली नाईकवाडे आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :